कर्जप्रकरणाच्या गुन्ह्यात अटकेतील डॉ. शेळकेंच्या अडचणीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- शहर सहकारी बँकेतील बोगस कर्जप्रकरणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या डॉ. निलेश शेळके याला पोलिसांनी फसवणूकीच्या तिसर्‍या गुन्ह्यात वर्ग करून घेतले आहे. डॉ. शेळके सध्या पोलीस कोठडीत आहे. दरम्यान रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याचा शोध घेत असताना डॉ. शेळके याला पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले होते. वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी … Read more

बेपत्ता व्यापारी प्रकरणाचा मुद्दा थेट गृहमंत्र्यांच्या दरबारी

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- श्रीरामपूर शहरातील रहिवासी बेलापूरचे बेपत्ता झालेले व्यापारी गौतम हिरण यांच्या तपासाला गती मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण बेपत्ता होऊन आतापर्यंत पाच दिवस झाले तरीही पोलीसांना त्यांचा ठावठिकाणा लागेना. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शनिवार दिनांक 6 मार्च रोजी … Read more

सासरच्या जाचाला कंटाळवून विवाहितेने माहेरी आत्महत्या केली

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सौ. प्रतिभा दीपक दाणे, वय २४ हिला नवरा दीपक याने वेळोवेळी दोन वर्षापासून दारु पिवून शिवीगाळ करणे मारहाण करणे असा त्रास दिला. ३ मार्च २०२१ व ४ मार्च २०२१९ रोजी वाढदिवसासाठी रहाते गावी माहेरी जाण्याच्या कारणातून आरोपी नवरा दीपक दाणे व सासरा प्रभाकर दाणे … Read more

सख्खे भाऊ पक्के वैरी; जमिनीच्या वादातून भावाचे डोके फोडले

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- संगमनेर तालुक्‍यातील चंदनापुरी शिवारात सुनील लहानु रहाणे, वय ४५ थंदा नोकरी रा. शारदा कॉलनी संगमनेर हे त्यांच्या शेतात गव्हाच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता पाईपचे झाकण काढत असताना तेथे आरोपी भाऊ संदीप लहानु रहाणे रा. चंदनापुरी हा आलला व सुनील याच्या डोक्यात दगड मारुन शिवीगाळ करत डोके फोडले. पुन्हा … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात चाललंय काय? सोशल मीडियाद्वारे होतेय भामटेबाजी

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- सोशल मीडियाचा गैरवापर करुन उद्योजक व समाजातील नामांकित व्यक्तींच्या नावाने ऑनलाईन पैशांची मागणी करणारे प्रकार वाढत आहेत. नुकताच असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेरातील उद्योजक संजय मालपाणी यांच्या फेसबुकवर असलेल्या अकाऊंट शिवाय त्यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर जसेच्या तसे खाते उघडले असल्याची धक्कादायक घटना संगमनेरात घडली आहे. … Read more

पोलीस असल्याचे बतावणी करत महिलेवर केला अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-सोशल मीडियाच्या माध्यमातून शिर्डीतील महिलेशी ओळख करून शिर्डी येथे पोलीस असल्याचे सांगून पोलीस भरतीत मदत करण्याचे आश्वासन देत बीडच्या तरुणाने अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राहाता पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तरुणाला अटक केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण किरण महादेव शिंदे याची शिर्डी येथील महिलेशी मिशो ॲपच्या … Read more

प्राध्यापिकेला अश्लील व्हिडीओ पाठविणाऱ्या प्राध्यापकाला न्यायालयाने धाडले तुरुंगात

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- सहकारी प्राध्यापिकेला अश्लील चित्रफितीची लिंक पाठवणं प्राध्यापकाला चांगलंच महागात पडलं आहे. आरोपी प्राध्यापकाला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात नोव्हेंबर 2017 मध्ये हा प्रकार घडला होता. बीड शहरातील एका शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या गजानन करपे याने याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेला व्हॉट्सअपवरुन अश्‍लिल व्हिडीओ असलेली लिंक … Read more

अवघ्या सात महिन्यातच नवविवाहितेची आत्महत्या!

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- अवघ्या सात महिन्यापूर्वी विवाह झालेल्या वीस वर्षीय अश्विनी गौतम नरोडे या नवविवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून शेततळ्यात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चिंचविहीरे येथे घडली. मात्र ही आत्महतया नसून पती, सासरा आणि दोन सासू यांनी अश्विनी हिस बुधवारी पहाटे घरात मारुन शेत तळ्यात टाकले व आत्महत्या केल्याचा बनाव केला. … Read more

आता तर हद्दच झाली; चोरट्यांनी सौर पॅनलच चोरले!

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- सध्या ग्रामीण भागातील जनता अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत वावरत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शेतमालाचे कोसळते बाजारभाव अन् वाढती महागाई त्यात पर भर पडली ती भुरट्या चोरट्यांची. या सर्व परिस्थितीमुळे सध्या सर्वसामान्यांची अवस्था दुष्काळात तेरावा अशी झाली आहे. अलीकडे भुरट्या चोरट्यांनी नुसता उच्छात मांडला आहे. दिवसा, रात्री अवेळी कधीही शेतकऱ्यांची … Read more

‘त्या’ एका ट्रकमुळे झालेत तब्बल ५० जण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- आपण अपघातात दोन तिन अथवा यापेक्षा कमी अधिक वाहनांचा अपघात झाल्याचे ऐकले किंवा वाचले असेल. मात्र श्रीगोंदा तालुक्यात एकाच ट्रकमुळे चक्क५०दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. ओला कात घेवून जाणारा ट्रक रस्त्यावर उलटला. परिणामी या ट्रकमध्ये असलेले रसायन रस्त्यावर पसरून चक्क ५० दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आता राज्यातील ‘ह्या’ महिलेची एण्ट्री, म्हणाल्या बाळ बोठेला सहकार्य….

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  रेखा जरे हत्याकांड प्रकरणांमधील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अटक करावी या मागणीसाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे आणि त्यांच्या परिवारातील इतर सदस्य पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत . जो पर्यंत आरोपीला अटक करत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका रेखा जरे यांच्या … Read more

पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला ! त्या महाराजांसह…

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- मोठ्या आशेने ते दोघेजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले. ते पंढरपूर जवळ आले देखील, मात्र मालवाहू ट्रकची धडक बसली अन एका क्षणात सर्व काही संपलं. त्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील बबन महाराज घोडके (वय ५७) व रमेश … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेने बाथरूममध्ये गळफास घेवून संपविले जीवन, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का..

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- नगर शहरातील तपोवन भागातील एका विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.या घटनेमुळे नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वाढदिवसासाठी नेवासा येथे जाण्यावरून झालेल्या वादातून ‘ति’ने बाथरूममध्ये गळफास घेत जगाचा निरोप घेतला. नगरच्या तपोवन रोडवरील साईनगरमध्ये गुरूवारी घडलेल्या या घटनेचा गुन्हा आज तोफखाना पोलिसांत दाखल … Read more

सरकारी योजनेतून तुम्हाला १२ हजार रूपये मिळवून देतो भामट्याने वृद्ध महिलेसोबत केलं असं काही..

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- सरकारी योजनेतून तुम्हाला १२ हजार रूपये मिळवून देतो, असे सांगून भामट्याने वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. नगरपरिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळील वाहने पार्किंगमध्ये बुधवारी दुपारी ही घटना घडली. कमरूनिसा शेख (राहुरी फॅक्टरी) या राहुरी येथील खाटीकगल्लीतील भाच्याला भेटण्यासाठी आल्या होत्या. बाजारपेठेतून जात असताना भामट्याने त्यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मोबाईल घेवून न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  वडिलांजवळ अॅंड्रोईड मोबाईल घेऊन देण्याचे हट्ट धरला मात्र त्यांनी मोबाईल घेवून न दिल्याने दहावीत शिकणा-या विद्यार्थ्याने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे.ओम दत्तात्रय वाघ (वय-१६) असे मृताचे नाव असून त्याचे मामा सुनिल म्हस्के यांच्या खबरीवरुन पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  या घटनेने … Read more

लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रकचालकास लुटले ; या महामार्गावरील घटना  

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- अलीकडे संपूर्ण जिल्ह्यात खून,दरोडे,चोरी,लुटमार या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नुकतीच नगर औरंगाबाद रोडवरील वांबोरी फाट्यावर लघु शंका करण्यासाठी थांबलेल्या एका ट्रक चालकास पल्सरवरून आलेल्या तिघांनी  कोयता व चाकूचा धाक दाखून जबर मारहाण करून दोन मोबाईल व रोख रक्कम असा ४६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर … Read more

बेपत्ता व्यापार्याची माहिती देणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरणा संदर्भात अचुक माहिती देणाऱ्यास बेलापुरातील व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले. घटनेच्या निषेधार्थ शनिवार दिनांक ६ मार्च रोजी शाळा, महाविद्यालय व अत्यावश्यक सेवेसह १०० टक्के गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बेलापुरातील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण … Read more

ग्रामीण भागात ‘या’ चोरट्यांचा सुळसुळाट !

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  दिवसेंदिवस ग्रामीण भागात चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, हे भामटे कोणत्या वस्तू चोरतील हे सांगणे अवघड आहे. गेल्या महिना भरापासून शेवगाव तालुक्यातील बोधेगाव भागात विद्युत मोटार चोरांनी रात्री- अपरात्री शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटार, केबल आणि स्टार्टर चोरून नेत धुडगुस घातला आहे. आधीच अनेक अडचणीत असलेला शेतकरी या चोरीच्या घटनामुळे पुरता … Read more