एसपी साहेब चोर मचाए शोर….

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-नगर शहर परिसरात वाहन चोरी, सोनसाखळी चोरी, व्यापार्‍यांकडील रोख रक्कम पाळत ठेवुन लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळीच नव्हे तर दिवसा ढवळ्याही घरफोड्या, रस्तालूट, मंगळसूत्र चोर्‍या, पळवून नेऊन होणारी लूटमार, असे गुन्हे सध्या सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाही पोलिस गस्त सुरु … Read more

शहरात धूमस्टाईल चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच दिवसात लाखोंचे दागिने लांबवले

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून धूमस्टाईल चोर्‍या करणाऱ्या चोरट्यांनी नुसता धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या रस्त्याने चाललेल्या महिलांच्या गळ्यातील दागीने हे चोरटे हिसाकावून नेत आहेत. त्यामुळे महिला वर्गात प्रचंड घबराट पसरली आहे. महिलांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. एकीकडे या घटना वाढत असताना दुसरीकडे पोलिसांकडून मात्र केवळ गुन्हे रजिस्ट्ररला दाखल करण्याचे … Read more

काळ्या बाजारात विक्रीसाठी चालवलेले रेशनचे धान्य नागरिकांनी पकडले! दोघांवर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-शासकीय स्वस्त धान्य घेवून काळया बाजारात विक्रीसाठी जात असतांना नागरीकांनीच तो टेम्पो पकडला. ही घटना शेवगाव तालुक्यातील अमरापूर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. धान्य घेऊन थांबलेला टेम्पो नागरीकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला. प्रभारी पुरवठा निरीक्षक संदीप मधुकर चिंतामण यांनी पंचनामा करून टेम्पो ताब्यात घेतला असून,चिंतामण यांनी दिलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंच निवडीदरम्यान एकावर धारदार शस्राने हल्ला!’या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-सरपंच निवडीच्या पार्श्वभुमिवर पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे शशीकांत अडसूळ या चेअरमन बाळासाहेब कोरडे गटाच्या कार्यकर्त्यावर दोघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात अडसूळ यांच्या मानेस गंभीर जखम झाली असून त्यांना नगरच्या शासकिय रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अडसूळ यांच्या प्रकृतीस कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, … Read more

गावठी कट्यासह दोघेजण जेरबंद! अल्पवयीन मुलाचा समावेश!

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-अवैधरित्या गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या दोघांना शेवगाव तालुक्यातील कानोशी परीसरात सापळा रचून पोलिसांनी जेरबंद केले. बाबासाहेब दादाबा बटूळे  (वय-२७) व अल्पवयीन मुलगा (दोघे रा. भारजवाडी ता. पाथर्डी)असे अटक केलेल्या आरोपीचे नावे असून, त्याच्याकडून एक गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत केले आहेत. पो.काँ.भनाजी काळोखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुरुषाचा धड नसलेला मृतदेह आढळला ,कुत्र्याने….

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे एका पुरुषाचा धड नसलेला मृतदेह कुत्र्याने उकरून काढला असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावापासून काही अंतरावर असणाऱ्या माळरानावर आज (८) सायंकाळी कुत्र्यांनी एक मृतदेह उकरून काढला ही बाब आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली. तहसीलदार प्रदीप पवार, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या चालकाला लुटले !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-नगर-पुणे मार्गावर म्हसणेफाटा येथील गजाननकृपा पेट्रोलियम या पंपावर रात्रीच्या वेळी सरकारी वाहनात झोपलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव सागर मोरे यांच्या वाहनाचा चालक अरूण गौतम भोले यास सोमवारी पहाटे मारहाण करून लुटण्यात आले. याप्रकरणी सुपे (तालुका पारनेर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वीय सहायक सागर … Read more

ओढणीने गळफास घेत तरूणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- राहुरी तालुक्यातील लाख येथील अजय सुरेश जाधव (वय ३०) या विवाहित तरूणाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी रात्री साडेअकरादरम्यान ही घटना घडली. सोमवारी दुपारी राहुरी येथे शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी लाख येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अजय नाशिक येथे नोकरीस होता, अशी … Read more

शहर बनतेय चोरट्यांचा अड्डा; दिवसाढवळ्या चैनस्नॅचिंगचे प्रमाण वाढले

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे उत्तरदायित्व असलेल्या नगर शहरात पोलिसांचा दरारा कमी होऊ लागला आहे. दिवसाढवळ्या खून, जबरी चोऱ्यांसारखे गंभीर गुन्हे घडत असून, अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच आहे. गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरत असून, नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना बळावू लागली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यावर कायद्याचे नव्हे, तर गुन्हेगारांचेच राज्य … Read more

गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका आरोपीसह अल्पवयीन मुलास पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह एका आरोपीस व एका अल्पवयीन मुलास शेवगाव पोलीसांनी सोमवारी (दि.8) जेरबंद केले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोनोशीवरून नांदूरकडे जाणार्‍या रस्त्यावरील खंडोबा मंदिर जवळील लिंबाच्या झाडाखाली बाबासाहेब दादाबा ढाकणे (वय 27, रा. भारजवाडी, तालुका पाथर्डी) व एका अल्पवयीन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वृद्धाचा मृतदेह गटारीत आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील सोपान रामचंद्र नेहे (६५) या वृद्धाचा मृतदेह रविवारी पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द येथे गटारीत आढळला. मृतदेह कुजल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. नेहे भिक्षा मागून मिळेल ते खात. त्यांना दारूचे व्यसन होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस पाटील किरण उत्तम गुंजाळ यांच्या खबरीवरुन शहर पोलिसांनी अकस्मात … Read more

गोकुळ शुगरचे चेअरमन शिंदे यांचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन होते. शिंदेंनी आत्महत्या केली, अपघात घडला की घातपात झाला. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. … Read more

एकाची लाखाची फसवणूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- गृहनिर्माण संस्थेत सरकारी कर्मचार्‍यांना घर विकत घेण्याची चांगली संधी आहे. असे सांगून संभाजी जाधव यांना एक लाख तीन हजार पाचशे रुपयांना लुबाडल्याची घटना राहुरी येथे घडली. याबाबत राहुरी पोलिसांत तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संभाजी सयाजी जाधव (वय 58 वर्षे, धंदा नोकरी, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) … Read more

एका दुचाकीमुळे प्रतिष्ठित व्यापारी अडकला संशयाच्या भोवऱ्यात

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. त्यातच राहुरी तालुक्यामध्ये दुचाकी चोरट्यांनी हौदास माजवला आहे. अनेक दुचाक्या चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे दुचाकी चोरीचे सत्र सुरु आहे तर दुसरीकडे राहुरी शहर हद्दीतील एका प्रतिष्ठित व्यापार्‍याकडे चोरीची दुचाकी आढळून आली आहे. पोलिसांनी … Read more

कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; वकिलांचा बंगला फोडून 50 तोळे लंपास

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. नुकतेच शहरातील कायनेटिक … Read more

मोहटादेवी प्रकरण ; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी मंदिराच्या कामावेळी अंधश्रद्धेच्या नावाखाली सुमारे 2 किलो सोने पुरून त्यावर मंत्रोच्चारासाठी 25 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. आता याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करून ही कारवाई केली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ … Read more

हापमर्डर करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-हापमर्डर करून फरार झालेल्या आरोपीला नगर पोलिसांनी नंदूरबारमध्ये जाऊन अटक केली आहे. विशाल अशोक कोते असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डीत गाजलेल्या सागर शेजवळ खून खटल्यात कोते हा आरोपी आहे. २०१५ पासून तो जेलमध्ये होता. करोना रजेवर तो बाहेर आला होता. या काळात त्याने … Read more

पत्रकारांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या निघोजच्या माजी सरपंचाविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-पाटोद्याचे सरपंच भास्कराव पेरे यांनी पत्रकारांना अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या घटनेस ४८ तास उलटत नाहीत तोच परत निघोज येथील माजी सरपंचाने पत्रकारांनी सरपंच, उपसरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन सदस्यांच्या अपहरणासंदर्भात बातम्या दिल्याच्या रागातून जाहीर सभेत पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले आहेत. निघोज ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन सदस्यांच्या अपहरणासंदर्भात बातम्या … Read more