कत्तलखाण्यावर छापा:तब्बल साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- शहरातील झेंडीगेट परिसरातील एका बंद रुममध्ये गोवंशीय जनावराची कत्तल चालु असलेल्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकुन एकुण १३ लाख ५२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात १४०० किलो वजनाचे गोवंशीय मासाचे मोठ-मोठया आकाराचे तुकडे व ११ लाखांचा एक आयसेर टेम्पो (क्र.एम.एच १६ सी.सी. ०६१४ ) ताब्यात घेण्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ चिमुकल्याचा खून;मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील वेदांत देशमुख या चिमुकल्याची अमानुष हत्या झाल्याच्या घटनेला पाच वर्ष पूर्ण झाले. वेगवेगळ्या एकूण 17 पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला मात्र अद्याप देखील तपास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे तपास पूर्ण होऊन आरोपीला शासन कधी होणार ? असा सवाल उंचखडक येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना … Read more

‘त्या’ गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तैनात

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले. त्यांतर संगमनेरमध्येही त्याची व्याप्ती पोहोचली. तेथेही लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात अटक करण्यात आलेल्या करीम शेखसह यापूर्वीच्या सर्व आरोपींना … Read more

तडीपार आरोपीला वाढदिवस पडला महागात…पोलिसांनी केली अटक

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना काही काळासाठी तडीपार केले जात असते. मात्र असाच एक आरोपी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आज शहरात आला मात्र त्याचे बर्थडे गिफ्ट म्हणून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातून दोन वर्षांकरीता तडीपार असलेला विजय राजू पठारे (रा. सिद्धार्थनगर) हा त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नगर शहरात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार; पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चाव्हाटीवर येऊ लागला आहे. जिल्ह्यात दरदिवशी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. नुकतीच नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षांच्या तरुणीवर घरात घुसून तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या पीडित तरुणीवर ऑगस्ट २०२० ते सप्टेंबर २०२० या … Read more

खंडणीसाठी दोघांचे अपहरण करणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी सध्या पोलीस प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. दरदिवशी चोरी, लुटमारी, खंडणी वसुली आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. खंडणीसाठी दोघांचे अपहरण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक करत या घटनांना लगाम लावण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. नगर औरंगाबाद रोडवरील खोसपुरी (ता. नगर) शिवारातील हॉटेलमधून शेतकर्‍यासह वाहनचालकाचे खंडणीसाठी अपहरण करणार्‍या आरोपींपैकी … Read more

या कारखान्यात झाली सव्वा तीन लाखांची चोरी

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी , लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. नुकतीच जिल्ह्यातील एका कारखान्यात चोरट्यांकडून सव्वा तीन लाखांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीगोेंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा येथील साईकृपा शुगर अ‍ॅड अलाईड इंडस्ट्रियल लिमीटेडमध्ये चोरी झाली आहे. घटनेत कारखान्याच्या ट्रान्सफॉर्मरमधील 3 लाख 25 हजार रूपयांचे … Read more

धक्कादायक! साठ वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-  देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून आधीच संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे महिलांच्या रक्षणासाठी आंदोलन रॅलीचे आयोजन केले जात आहे. तर दुसरीकडे अशा घटना अद्यापही सुरूच आहे. श्रीगोंदा तालुययातील पुई फाट्याजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करणार्‍या वेटरकडून दि. 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11 चे सुमारास मद्यपान करून शेजारी राहणार्‍या 60 वर्षीय … Read more

‘त्या’ तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- पुणे जिल्ह्यातील म्हसे बुद्रूक येथून पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथे शेळ्या, मेंढया चारण्यासाठी येणाऱ्या तरूणास जातीवाचक शिविगाळ करून, मानसिक त्रास देत आमच्या गावात मेंढ्या चारायला यायचे नाही, अशा वारंवार देण्यात येणाऱ्या धमक्यांना कंटाळून परसराम लालचंद्र काळे या २५ वर्षीय तरूणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी म्हसे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा ११.६६ लाखांचा गुटखा जप्त

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- एकलहरे परिसरातील आठवाडी शिवारात गेल्या मंगळवारी गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अर्धा कोटींचा गुटखा पोलिसांनी जप्त केला होता. त्याच भागातील बंद खोलीत गुटखा असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली. पोलिस पथकाने तपासणी केली असता तेथे ११ लाख ६६ हजारांचा गुटखा व सुगंधी तंबाखू मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी करीम … Read more

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिघांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये आणावेत, या कारणावरून सासरी होणाऱ्या जाचास कंटाळून पूनम अमोल कासार (२३) हिने शनिवारी सकाळी निमगाव खुर्द येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सासरच्या तिघांवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पूनमचा विवाह अमोलशी २०१९ मध्ये झाला होता. अनेक कारणावरून तिचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या आदिवासी तरुणाची आत्महत्या की खून ?

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी या भागातील आदिवासी समाजामध्ये खून, बलात्कार, जाळपोळ, आत्महत्या असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडत आहेत. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी व समाज कल्याण अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या आदिवासी भटके … Read more

अवैध धंद्यांचा व गुन्हेगारी प्रवृत्तीचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुका, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे. दारू, मटका, जुगार, अमली पदार्थ, गांजा विक्री सर्रासपणे चालू आहे. टाळेबंदीच्या काळात देखील पोलीसांच्या वरदहस्ताने सर्व व्यवसाय चालू होते. टाळेबंदीत युवकांच्या हाताला काम नसल्याने अनेक युवक नशेच्या आहारी गेले. घरातील सामान व महिलांचे दागिने विकून अनेक … Read more

सराफ व्यापाऱ्याची लूट करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सराफ व्यावसायिकी संतोष मधुकर कुलथे यांच्या कारची काच फोडून सुमारे लाखोंचे सोने – चांदी चोरीस गेल्याची घटना ०८ ऑकटोबर रोजी घडली आहे. याप्रकरणी लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने घडलेल्या घटनास्थळी सीसीटिव्ही फुटेज तपासले … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  शहरात सारसनगर चिपाडे मळा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा वैभव विजय औटी, वय २६ रा. नेवासा, ता. नेवासा हल्ली रा. भोसले आखाडा, नगर याने विनयभंग केला आहे. सदर अल्पवयीन विद्यार्थिनीस माझ्याबरोबर लग्न कर, आपण संबंध ठेवू, असे म्हणून वेळोवेळी पाठलाग करुन त्रास दिला. विद्यार्थिनीने लग्नास नकार … Read more

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून सासरीच विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे घडली आहे. पूनम अमोल कासार (वय 23) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाने संगमनेर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पती, सासरा व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २५ वर्षीय तरुणाचा ३६ वर्षीय महिलेवर हॉटेलवर नेवून बलात्कार

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  नगर परिसरात बुऱ्हाणनगर भागात राहणाऱ्या एका ३६ वर्षं वयाच्या महिलेला २५ वर्ष वयाच्या तरुणाने बळजबरीने हॉटेलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार करुन जिवे मारण्याची धमकी दिली. हा खळबळजनक प्रकार १५/९/२०२० रोजी दुपारी २ते २.४५ च्या सुमारास घडला. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिलेच्या घरी २७ एप्रिल २०२० रोजी … Read more

शहरातील या भागातील जुगार अंड्यावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु झाले आहे. यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे. यातच शहरातील सारसनगर परिसरातील येथे सनशाईन हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर सोमवारी (दि.१२) रात्री पोलिसांनी छापा टाकला. भिंगार पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात छापा टाकून 3 लाख 58 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत … Read more