अहमदनगर ब्रेकिंग : मजुराच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : शिर्डीमध्ये अवघ्या दोनशे रुपयावरुन मजुराची हत्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. इक्राम अजीज पठाण (रा.श्रीरामनगर,शिर्डी) व अनिल बाबासाहेब तळोले (रा.आण्णाभाऊ साठेनगर, शिर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि २२ जूनला दुपारी मयत अमित प्रेमजी सोला (रा. मुंबई) यास दोनशे रुपये उसनवारी दिलेल्या पैशाच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या नायब तहसीलदाराचे फेसबुक अकाऊंट हँक वादग्रस्त मजकुर व्हायरल

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : पाथर्डीचे नायब तहसिलदार पंकज नेवसे यांचे फेसबुक अकाऊंट हँक करुन त्यावर वादग्रस्त मजकुर व्हायरल करण्यात आला आहे. पत्रकार व नायबतहसिलदार यांच्यात एकमेकाबद्दल गैरसमज निर्माण होतील असा तो मजकुर आहे. नेवसे हे वाळु तस्कराकडुन हप्ते मागत असल्याचा उल्लेखही वादग्रस्त मजकुरामधे आहे. शिवाय मी मँडम पर्यंत हप्ते देतो म्हणजे या … Read more

‘त्या’ दवाखान्यात फक्त गर्भपात की अजून काही?

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : नगर तालुक्यातील जखणगाव येथील ‘त्या’ दवाखान्यातुन पोलिसांनी ऑपरेशन व गर्भपात करण्याचे साहित्य, गर्भपात झालेल्या गर्भाचे तुकडे असणारी प्लास्टिकची बाटली आदी साहित्य जप्त केले होते. आता हे गर्भाचे तुकडे तपाणीसाठी जिल्हा रुग्णालयात देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या अहवालाकडे लक्ष लागले असून हा अहवाल तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इंदोरीकर महाराज देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल!

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी आपल्या किर्तनात वक्तव्य केले होते. की, स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथिला झाला तर मुलगी होते,आणि … Read more

महापालिकेचे मोठे अधिकारी रात्री-अपरात्री घरी येऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात…

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : महापालिकेचे दोन मोठे अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात एका १४ वर्षे वयाच्या मुलाने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला आहे. संबंधित मुलाची आई देखील पालिका कर्मचारी आहे. हे अधिकारी व कर्मचारी रात्री-अपरात्री घरी येऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात. एका अधिकाऱ्याने तर जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील या मुलाने … Read more

धक्कादायक माहिती समोर : प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून मिरवणाऱ्याने अवघ्या ४५ हजारांसाठी केली भ्रूणहत्या !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून मिरवणाऱ्या डाॅ. शंकरप्रसाद दिगंबर गंधे याने अवघ्या ४५ हजारांसाठी भ्रूणहत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून आपला बळजबरीने गर्भपात केला असल्याचा जबाब पीडित महिलेने नगर तालुका पोलिसांना दिला आहे. संबंधित महिलेला गर्भपातासाठी ऑपरेशन थिएटरपर्यंत घेऊन जाणारे नेमके कोण … Read more

त्या खोटारड्या बडतर्फ सैनिकाने २० लाख रुपयांची फसवणूक केली !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :बडतर्फ सैनिक प्रशांत भाऊराव पाटील (वय- ३२) याने नगर जिल्ह्यातील आठ ते दहा तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून सुमारे २० लाख रुपयांना फसविल्याची बाब समोर आली आहे. मिलिट्री इंटेलिजन्स आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी अटक पाटील याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, ही कारवाई होताच फसवणूक झालेल्या तरुणांनी … Read more

बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली आणि ….

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर मंगळवारी रात्री बिबट्याने युवकावर हल्ला केला. सादिक फकिरमंहम्मद शेख (२३, माळेवाडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. मध्यरात्री १ वाजता सादिक शेख चुलते अहमद शेख यांना सोडवण्यासाठी निमगावजाळीला दुचाकीवरून जात होता. आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर चतुरे वस्तीलगत अंधारात बिबट्याचे बछडे त्याला दिसले. ते थांबले असता … Read more

नगर-पुणे रस्त्यावर ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने पतीचा मृत्यू ,पत्नी गंभीर

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  नगर-पुणे रस्त्यावर सुपे (ता. पारनेर) शिवारात सुपे औद्योगिक वसाहत चौकात बुधवारी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. मच्छिंद्र कोंडिबा वाबळे व त्यांची पत्नी कल्पना (घाणेगाव, ता. पारनेर) हे दुचाकीवरून (एमएच १६, बीई ४०९५) नगरच्या दिशेने जात असताना सुपे औद्योगिक वसाहत चौकात एचपी … Read more

अवघ्या दोनशे रुपयांच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :   दोनशे रुपये उसनवारी घेतलेल्या वादातून धारदार चाकूने मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना शिर्डी शहरात घडली आहे. मोलमजुरी करणाऱ्या अमित प्रेमजी सोला याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपी इकराम पठाण पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. एका मजुराचा पैशाच्या … Read more

शिर्डी ब्रेकिंग : स्वत:च्या दुकानात गळफास घेत व्यावसायिकाची आत्महत्या 

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :   शिर्डीत एका 55 वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून श्रीराम चुटके असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. कर्ज आणि त्यातच कोरोनाच्या संकटकाळात व्यवसाय ठप्प असल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या व्यावसायिकाचे दुकान अहमदनगर-मनमाड महामार्गावर साईमंदिराजवळ आहे. स्वत:च्या दुकानात संध्याकाळी 5 वाजता … Read more

कोरोनील प्रकरण : सरकार बाबा रामदेवांवर गुन्हा दाखल करणार

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. यामुळे अनेक देशांच्या आर्थिक घड्या विस्कटल्या आहेत. यावर लस शोधण्याचे काम संबंध जगभरात सुरु आहे. परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजलीने यावर कोरोनील हे आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. पतंजलीकडून कोरोनिल औषध हे लवकरच बाजारात उपलब्ध केले जाणार आहे, अशी घोषणाही बाबा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाच कोटींच्या सिगारेट पकडल्या !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  पुणे जिल्ह्यातील यवत येथून आज काही आरोपीनी आयटीसी कंपनीच्या सिगरेटचा ५कोटींचा मुद्देमाल असणारे दोन ट्रक हायजॅक करून ते नगर पुणे हायवेने नगरच्या दिशेने पळून जात असताना श्रीगोंदा येथील सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी गव्हाणेवाडी चेक नाक्यावर मोठ्या शिताफीने पकडले. यवत येथून दोन ट्रक हायजॅक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 22 तोळे सोने आणि दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  जामखेड मधील पोकळे वस्तीवर तात्याराम पोकळे यांच्या घरावर बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. 22 तोळे सोने आणि दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि दरोडेखोरांनी पाठीमागचा दरवाजा कटावनीच्या सहाय्याने तोडला आणि ते आत घुसले.रात्री एक ते तीनच्या सुमारास ही चोरी झाली घरातील … Read more

अल्पवयीन मुलीचा खून करणारा कोठडीत. पण खून कोणत्या कारणाने झाला, हे गूढ कायम

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  सौ‌ंदाळे येथील अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी अप्पासाहेब नानासाहेब थोरात यास नेवासे येथील जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली. खुनाच्या कारणाचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहे. वैष्णवी सोमनाथ आरगडे (वय ९) या मुलीचा रविवारी झोपेत असताना खून झाला. सर्पदंशाने ती मरण पावल्याचे सांगितले जात होते. पोस्टमार्टेमनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा … Read more

माजी नगरसेवकाच्या भावाला मारहाण करून सव्वाचार लाख रुपये लूटले

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व्यापाऱ्याची तब्बल सव्वाचार लाख रुपयांची लूट करण्यात आली. हा प्रकार सोमवारी रात्री घडला. वैभव शेटिया असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नगर-मनमाड महामार्गावरील एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. माजी नगरसेवक विपुल शेटिया यांचे बंधू वैभव यांचे एमआयडीसीतील नवनागापूर येथे वैभव सेल्स … Read more

संतापजनक : गर्भपात करून अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केले….

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  महिलेचा बेकायदा गर्भपात करणारा नगर तालुक्यातील जखणगाव येथील डॉ. शंकरप्रसाद दिगंबर गंधे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपी डॉ. शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे यांनी त्या महिलेचा गर्भपात करून अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री उशिरा महिलेचा बेकायदा गर्भपात केला … Read more

वाचा त्यावेळी नेमकं काय घडले ? ज्यामुळे चौघांचाही जीव गेला 

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे पोहायला गेलेल्या  चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर असे की उत्तर प्रदेशातील मजूर आपल्या कुटुंबासह बाबुर्डी येथे एका गुर्‍हाळावर काम करत असून त्यातील एका कुटुंबातील मुले आपल्या आई, वडिलांना न कळविता शेततळ्यावर पोहोण्यासाठी गेले . शेत तळ्यात उतरताना त्यांनी ठिबकच्या … Read more