अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेचा सारीसदृश आजाराने उपचारांदरम्यान मृत्यू

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- कोपरगाव शहरातील मनाई वस्ती संवत्सर येथील २२ वर्षांच्या विवाहितेचा शुक्रवारी सकाळी दहाच्या दरम्यान सारीसदृश आजाराने उपचारांदरम्यान मृत्यू झाला. संसर्गजन्य आजाराचा तालुक्यातील हा तिसरा बळी आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले, या महिलेला सर्दी, खोकला व कफ झाल्याने दम लागत होता. शुक्रवारी सकाळी दहाच्या दरम्यान ग्रामीण … Read more

संगमनेर शहरातील काही भाग कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- संगमनेर शहरातील काही भाग कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर करण्यात आला असून घोषित केलेल्‍या कन्टेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री सेवा इ. व बफर झोन क्षेत्रातील अत्‍यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्‍थापना, दुकाने, वस्‍तु विक्री सेवा इ. दिनांक २४ मेपासून दिनांक ०१ जून, २०२० रोजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: पोलिसांना सापडला मद्याचा लाखोंचा साठा

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील एकाने बेकायदा दारुचा साठा करून ठेवलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. तेथून अडीच लाखांचा दारुचा साठा जप्त केला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे एकाला बिअर शॉपी चालविण्याचा परवाना आहे. बियर शॉपी चालक बेकायदा देशी-विदेशी दारु विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस … Read more

भांडण सोडवण्यास गेलेल्या काकाचा पुतण्यानेच केला खून !

चाळीसगाव :- पिलखोड येथे भांडण सोडवण्यास गेलेल्या काकाचा पुतण्यानेच चाकू खुपसून खून केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या या हल्ल्यात काकाचा मृत्यू झाला तर मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा सख्या भावांना ताब्यात घेतले आहे. धोंडू सुपडू पाटील (वय ५५) असे मृत काकाचे नाव असून, त्यांचा मुलगा महेश धोंडू पाटील (वय … Read more

क्वारंटाइन कालावधी संपताच युवती प्रियकराबरोबर ‘सैराट’ !

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- मोठ्या शहरामध्ये नोकरीला असलेली एक युवती काेरोना विषाणूच्या लॉकडाऊनमध्ये आपल्या गावी आली. तिला गावातील प्राथमिक शाळेत असलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर या युवतीला घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, घरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही युवती आपल्या प्रियकराबरोबर निघून गेली. उक्कलगाव परिसरातील ही युवती मोठ्या … Read more

राहुरीत एकाच दिवशी आत्महत्येच्या दोन घटना

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- राहुरी तालुक्यात एकाच दिवशी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या. पहिली घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता बारागाव नांदूर येथे, तर दुसरी घटना देवळाली प्रवरा येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. बारागाव नांदूर येथील विजय अशोक बर्डे (वय २१) या तरुणाने गावातील संत तुकाराम विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या लिंबाच्या झाडाला दोर अडकवून गळफास … Read more

बेवारस पुरुष मयताची माहिती कळविण्‍याचे आवाहन

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- नगर तालुका पोलिस स्‍टेशनच्‍या हद्दीतील नगर तालुक्‍यामधील कामरगाव शिवारातील हॉटेल स्‍माईल स्‍टोनजवळ सुरेश चंद्रभान ठोकळ यांचे शेततळेमध्‍ये दिनांक 18 मे 2020 रोजी बेवारस अनोळखी पुरुषाचे प्रेत तरंगतांना आढळून आले आहे. या इसमाचे अंदाजे वय 30 वर्षे असून बेवारस मयत पुरुषाच्‍या नातेवाईकांचा शोध लागला नाही. या अनोळखी इसमाबाबत कोणास काही … Read more

भावानेच केला भावाचा कुऱ्हाडीने खून

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  जिंतुर तालुक्यातील सायखेडा येथे भावानेच किरकोळ भांडणातून भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेषेराव किसनराव जाधव असे मृताचे नाव आहे.मृताची पत्नी सावित्रीबाई शेषेराव जाधव यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी , घरासमोरील कडबा शेळीने खाल्ल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर शेषेराव आपल्या आईला आपल्या भावाच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दुचाकीच्या भीषण अपघातात तरुण ठार

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द- शिबलापूर रस्त्यावरील आश्वी खुर्द शिवारात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीला भीषण अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वैभव मच्छिद्रं वाघमोडे (१९) (रा. अंभोरे, ता. संगमनेर) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंभोरे येथील दोन … Read more

अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीस सापळा रचून अटक

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- नेवासा तालुक्यातील माका येथील तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील पसार आरोपीला सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सापळा रचून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, माका येथील तरुणीशी प्रेमसंबंध संबंध वाढवून तिच्यासोबत तिचे इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला. याबाबत तरुणीने फिर्याद … Read more

गाडी लावल्याचा रागातून बाप-लेकास तलवारीने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- गाडी रस्त्याच्या कडेला लावल्याचा राग आल्याने चौघांनी नवनाथ साप्ते व त्यांच्या मुलावर जिवघेणा हल्ला केला. यामधे साप्ते व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. नगरच्या खासगी हाँस्पीटलमधे ते उपचार घेत आहेत. यावेळी काही लोकांनी मध्यस्ती केली नसती तर अनर्थ घडला असता. या प्रकरणातील चौघे जण पसार झाले असून यामधील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील गुटखामाफिया पोलिसांच्या जाळ्यात,आश्रमातून चालू होता गुटख्याचा गोरखधंदा !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- जामखेडचा गुटखामाफिया अंबड पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पोलिसांनी रोहिलागडच्या कानिफनाथ आश्रमातून सात लाखाचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. येथील मृत पुजाऱ्याच्या आश्रमातील खोल्या ताब्यात घेऊन करीत होता, त्याचा हा गोरखधंदा जोरात सुरु होता. अंबड पोलिसांनी भल्या पहाटे रोहिलागड व जामखेड येथे धाडसत्र केले. अंबडचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना … Read more

वाहनचालकांना अडवून लुटमार करणारी गुन्हेगारांची टोळी गजाआड

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-वाहनचालकांना अडवून लुटमार करणारी गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. आरोपींनी शिर्डीजवळील रांजणगाव देशमुख येथे महिंद्रा पिकअपचालकाला अडवून लुटमार केली होती. उमेश तान्हाजी वायदंडे (गणेशनगर), आकाश दीपक गायकवाड (लक्ष्मीनगर, शिर्डी), संदीप दिलीप रजपूत (बाभळेश्वर) व आणखी एक अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी साकीर जाकिर इनामदार हा सोनू नजीर … Read more

धक्कादायक : 14 क्वॉरंटाईन सदस्यांनी ठोकली धूम !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  एकिकडे कोरोनाची लढाई प्रशासन शर्थीने लढत असून, दुसरीकडे मात्र क्वॉरंटाईन केलेल्या दोन कुटूंबातील तब्बल १२ ते १४ सदस्यांनी अक्षरश: धूम ठोकल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात दोन ठिकाणी घडल्या. या दोन्ही घटना मंगळवारी (दि.१९) उघडकीस आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. तालुक्यातील केंदळ खुर्द येथील क्वॉरंटाईन एक जोडपे दुसऱ्याची मोटारसायकल … Read more

‘त्या’ खुनातील आरोपीस जामीन मंजूर

पुणे : कुख्यात वाळू माफिया गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे.अप्पा लोंढे वाळू तस्करीत सक्रिय होता. २०१५ मध्ये लोणीकाळभोरमध्ये त्याचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात विष्णू यशवंत जाधव यास अटक केली होती. परंतु सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून किरकोळ तसेच गंभीर गुन्ह्य़ातील आरोपींना जामीन देण्यात … Read more

पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

लॉकडाऊनमध्ये एकीकडे जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण झाले आहे. नागरिक थोड्या गोष्टींसाठी आपला जीव काढत आहेत. तर दुसरीकडे बिहारमध्ये 10 हजारात दारू, खोली आणि कॉलगर्ल उपलब्ध करून दिली जात होती. पोलिसांनी याठिकाणी धाड टाकत सेक्स रॅकेट उघडकीस आणलं आहे. बिहारमधल्या पाटणा भागातील पत्रकारनगरात पोलिसांनी एका घरावर छापा टाकून कॉलगर्ल, दलाल आणि खोलीची देखभाल करणारा नोकर यांना … Read more

धक्कादायक! ‘त्याने’पत्नीचा मृतदेह सोबत घेऊन केला प्रवास..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. परंतु यामुळे अनेक मजूर विविध भागांमध्ये अडकून पडले. त्यामुळे मजुरांनी गाकडची वाट धरली. या दरम्यान अनेक मजुरांना जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. असाच प्रसंग गुदरलाय मूळचा झांशी येथील देवरीसिंहपुरा गावातील दामोदरवर. दामोदर आपल्या कुटुंबासह पानिपत येथे कपडा बनवणाऱ्या कारखान्यात नोकरी करायचा. लॉकडाऊन लागू झाल्यावर त्याची पत्नी त्याला गावी जाण्यासाठी … Read more

तीन मित्रांनीच केली तरुणाची कुऱ्हाडीने हत्या;कारण ऐकून व्हाल थक्क

उत्तर प्रदेश येथील फतेहपूर येथे तीन तरुणांनी आपल्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. बायकोची छेड काढल्याच्या रागातून ही हत्या झाली आहे. प्रदीप कुमार असे मृत तरुणाचे नाव आहे. एका वृत्तानुसार, फतेहपूर येथील मलवा गावातला प्रदीप कुमार हा तरुण रविवारी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी शोध सुरू केला. तेव्हा त्यांना शेतातल्याच एका झोपडीत त्याचा रक्तबंबाळ … Read more