विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

राहाता तालुक्यातील वाकडी येथील गणेशनगर रोड जाधव वस्ती येथील आदिनाथ भास्कर जाधव (वय ३८) या शेतकऱ्याचा विहिरीत तोल जाऊन मुत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे वाकडी परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, वाकडी – गणेशनगर रोडवर असलेल्या जाधव वस्ती भागात राहणारा अल्पभूधारक शेतमजूर आदिनाथ भास्कर जाधव हा शुक्रवारी (दि. २४) दुपारनंतर … Read more

विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकविला धडा

शिर्डी : पहिल्यांचा दांडक्याचा प्रसाद, त्यानंतर दंडात्मक कारवाई, भररस्त्यात उठबशा, हातजोडुन विनंती, अन्य गांधीगिरी मार्गाचा अवलंब करूनही शिर्डीत विनाकारण फिरणाऱ्या चाकरमान्यांना लगाम बसत नसल्याने अखेर शिर्डी पोलीस व वाहतूक शाखेने संयुक्तरित्या विशेष मोहीम हाती घेत विनाकारण दुचाकी किंवा पायी फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतानाच त्यांना पकडून थेट रुग्णवाहिकेत टाकून आरोग्य तपासणीसाठी साईसंस्थानच्या रुग्णालयात पाठविले. या अनोख्या … Read more

अज्ञात व्यक्तींकडून घरांवर दगडफेक, ग्रामस्थ भयभीत !

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे गेल्या एक महिन्यापासून अज्ञात व्यक्तींकडून घरांवर दगडफेक होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून हा मूर्खपणा कोण करतो आहे,याचा शोध घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली असुन आवश्यक ती पावलेही उचलली आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या लॉकडाऊन असल्याने लोक घरातच थांबलेले आहेत. अशातच सोनेवाडीमध्ये गेल्या एक महिन्यापासून विचित्र … Read more

रणरागिणींनी उद्ध्वस्तकेला अवैध गावठी दारूचा अड्डा !

नेवासे :- तालुक्यातील मुकिंदपूर येथे अनेक दिवसांपासून खुलेआमपणे सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा स्थानिक महिला बचत गटाच्या रणरागिनींनी एकत्र येत नेवासे पोलिसांच्या मदतीने उद्ध्वस्त केला. मुकिंदपूर येथील गट नंबर ७६ मधील सुरेखा चव्हाण यांच्या येथे चालू असलेला गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याने या परिसरात तळीरामांचा उपद्रव वाढला होता. तळीरामांच्या आरडाओरड तसेच अश्लील भाषेतील शिव्यांनी महिलांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांचा कांदा दुबईला

राहुरी: किसान विकास महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड वांबोरीने परीसरातील शेतकऱ्यांचा कांदा दुबईच्या बाजारपेठेत रवाना करण्यात आला. वातानुकूलित कंटेनरमध्ये भरून हा माल शुक्रवारी पाठवण्यात आला. लॉकडाऊनमुळे देशातील बाजार समित्या बंद आहेत. शेतकऱ्यांचा हजारो टन कांदा विक्रीच्या प्रतिक्षेत शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन किसान विकास शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाचपुते पिता-पुत्राकडून व्यवस्थापकाला मारहाण

अहमदनगर Live24 :- काष्टी सेवा संस्थेतील गैरव्यवहार व व्यापारी कमिशन साखळी उघड केल्याच्या रागातून ज्येष्ठ संचालक भगवानराव पाचपुते, त्यांचा मुलगा प्रताप यांच्यासह सहा ते सात जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार व्यवस्थापक जालिंदर पाचपुते यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात सोमवारी केली. तक्रारीत म्हटले आहे, गेल्या काही महिन्यांत संस्थेच्या कारभारात भगवानराव यांचे चिरंजीव प्रताप यांचा काहीही संबंध … Read more

दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

अहमदनगर Live24 :- राहुरी तालुक्यातील तहाराबाद येथील वाळू वाहतूक करतांना पकडलेला ट्रॅकटर सोडण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी करणारा तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. अशोक रामचंद्र थोरात असे आरोपीचे नाव असून दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार यांचे मालकीचे ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना आरोपी लोकसेवक यांनी रविवारी पकडले होते. सदर ट्रॅक्टरवर कोणतीही … Read more

पुरुषांच्या बाबतीत राष्ट्रीय गुन्हे विभागाने दिली ‘ही’ धक्कादायक माहिती 

नवी दिल्ली : राज्यात महिलांच्या आत्महत्येचे प्रमाण असले तरी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने नुकतीच विवाहित पुरुषांच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की महिलांच्या तुलनेत विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट आहे.  तसेच  पत्नीचा मृत्यू झाल्यास किंवा तिच्यापासून घटस्फोट झाल्यास पुरुषांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले असल्याचे या अहवालात नमूद आहे. … Read more

धक्कादायक! आधी चिरला बापाचा गळा नंतर दातानं तोडलं गुप्तांग

नागपूर: हुडकेश्वरमधील नंदलाल चौकातील विघ्नहर्ता कॉलनी मध्ये शनिवारी रात्री धक्कादायक प्रकार घडला. २८ वर्षीय मुलाने बापाचा धारदार चाकूने गळा चिरून खून केला. एवढ्यावरच न थांबता त्याने दाताने वडिलांचे गुप्तांगही तोडले. इंजेक्शन आणि स्टेरॉइड पावडर न मिळाल्याने मुलाने असे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. विजय पिल्लेवार (वय ५६) असे मृताचे, तर रोहित ऊर्फ विक्रांत पिल्लेवार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोटच्या मुलीवर बापाने केला बलात्कार; पोलिसांनी केली अटक !

अहमदनगर : जन्मदाता बापानेच स्वताच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सुरु आहे आरोपीची पत्नी आणि मुलगा शेजारी मामाच्या घरी गेले असताना रात्री घरी असणारी १५ वर्षाची पोटची पोरगी एकटी पाहून ३५ वर्षाच्या नराधम बापाने तिच्यावर अमानुष पणे दोन वेळा बलात्कार केला. सकाळी तिची … Read more

अवैध दारू विक्रीची माहिती पोलिसांना दिल्याने नवऱ्यानेच केले बायकोसोबत हे धक्कादायक कृत्य

अहमदनगर Live24 :-  अवैध दारू विक्रीची माहिती गावकरी व पोलिसांना दिल्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीला धारधार हत्याराने भोकसून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लुक्यातील म्हाळादेवी (ता. अकोले) येथे शुक्रवारी घडली. जखमी महिलेस उपचारासाठी अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु महिलेची प्रकृती नाजूक असल्यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका २४ वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटेच्या देवळाली प्रवरा परिसरातील गांधीवाडी येथे घडली. कोमल प्रदीप वाघ हे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता गांधीवाडी (देवळाली प्रवरा) येथील कोमल वाघ राहत्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साखर कारखान्याला आग लागून सुमारे 35 कोटी रुपयांचे नुकसान !

अहमदनगर Live24 :- संगमनेर तालुक्यातील युटेक शुगर या साखर कारखान्याच्या गोदामाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे 35 कोटी रुपयांचे नुकसान झाले. आज पहाटे ही घटना घडली आगीने रौद्र रूप धारण केल्याने संगमनेर, प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखाने, देवळाली प्रवरा व राहुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ज्वलनशील पदार्थ अधिक असल्याने आग भडकली. या आगीच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाण्यात बुडणाऱ्या पुतणीला वाचविताना इंजिनियरचा पाण्यात बुडून मृत्यु

अहमदनगर :- अकोले तालुक्यातील उंचखडक खुर्द येथे पाण्यात बुडणाऱ्या पुतणीला वाचविताना इंजिनियर राजू मुरलीधर घोडके यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात पुतणी संस्कृती घोडके (वय ७). हीला डॉ. भांडकोळी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिच्यावर योग्यवेळी उपचार केल्याने ती बचावली. मात्र, राजू घोडके … Read more

मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

कोपरगाव : शहरातील सुभाषनगर येथे मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला असून दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून याप्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. मुजाहिद मज्जीद कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि. २२) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर सुभाषनगर येथील आरोपी योगेश संजय शिंदे, संजय रामभाऊ … Read more

मॉर्निंग वॉकला गेले आणि दंड भरून आले ….

शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सध्या लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. तरीही भल्या सकाळी मॉर्निंगवॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या शंभराहुन अधिक नागरिकांवर शिर्डी पोलीस व नगरपंचायत यांनी संयुक्त कारवाई केली. सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करत सर्वांना दीड तास कवायत करायला लावली. दंड आकारल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. शिर्डीत मॉर्निंगवॉकसाठी मोठ्या संख्येने नागरीक घराबाहेर पडत असतात. त्यामुळे शिर्डी पोलीस … Read more

मास्क न वापरणाऱ्यांकडून झाला ‘इतका’ दंड वसूल

अहमदनगर Live24 :- आदेश देऊनही अनेकजण मास्क न वापरता रस्त्यांवर फिरतात. त्यामुळे मनपाच्या पथकांनी नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला गती दिली आहे. गुरूवारी दिवसभरात सुमारे साडेदहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईसाठी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी चार पथके नेमली आहेत. प्रभाग १ ते ४ समित्यांसाठी ही पथके आहेत. बुधवारी पथकाने कचरा संकलित करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावला. … Read more

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल

नेवासा :- तालुक्यातील तेलकुडगाव येथील मीरा संतोष गटकळ या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पती, सासरा, सासूसह पाच जणांवर गुन्हा नोंदवला. मिराचा मृतदेह विहिरीतील पाण्यात सोमवारी आढळला होता. तिचे माहेर व सासर गावातीलच आहे. मीराचे वडील हरी भिका गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत विहीर खणण्यासाठी माहेरून दीड लाख रूपये आणावेत, यासाठी मीराचा छळ करण्यात आल्याचे नमूद केल्याने पाेलिसांनी … Read more