अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू …जिल्ह्याची चिंता वाढली !

अहमदनगर Live24 टीम :-  कोपरगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित मृतांची संख्या दोन झाली आहे. मागील आठवड्यात श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील एका तरूणाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आता या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 28 जणांना लागण झाली आहे. गेल्या शुक्रवारी कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात फिरणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला पडले महागात,गुन्हा दाखल आणि गाडीही झाली जप्त !

अहमदनगर :-  संचारबंदीच्या काळात  श्रीरामपुर शहरात फिरणे राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला चांगलेच महागात पडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याची चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह सर्व नगरसेवकांना संचारबंदीच्या काळात शहरात फिरण्यास बंदी घातली होती मात्र तरीही काही लोकप्रतिनिधी हा आदेश डावलत बाहेर फिरत होते. यामुळे श्रीरामपूर पोलिसांनी सोमवारी धडक मोहीम हाती … Read more

अहमदनगरमध्ये विचित्र घटना …पोलिसांनीच दाखल केला ‘त्या’ पोलीसाविरोधात गुन्हा !

अहमदनगर :-  अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन’ सुरू असताना नियमाचे उल्लंघन करून घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुकुंदनगर, आलमगीर परिसरात सील करण्यात आला आहे. या परिसरातील एक पोलिस कर्मचारी आयुब शेख हा त्याच्या पत्नीला घेऊन दुचाकीवरून बाहेर चालला होता. हा प्रकार लक्षात येताच … Read more

हॉटेल फोडून दारूची चोरी करणारे अटकेत

राहता :- तालुक्यातील पुणतांबा येथील सम्राट परमीट बार हॉटेल फोडून १ लाख ९९ हजार २०० रुपये किमतीची विदेशी दारु चोरुन नेल्याप्रकरणी एकास व चोरीची दारु विक्री केल्याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. हॉटेल सम्राटमधून ६ एप्रिलला रात्री १ लाख ९९ हजार २०० रुपये किमतीचे विदेशी दारुचे २७ बाॅक्स अज्ञातांनी चोरुन नेले, अशी फिर्याद … Read more

महामार्गावर परप्रांतीय वाटसरुंना मदत करण्याऐवजी बेदम मारहाण

राहुरी :- तीन दिवसांपासून उपाशीपोटी घराकडे निघालेल्या परप्रांतीय वाटसरूंना मदत करण्याऐवजी मारहाण झाल्याच्या घटनेने राहुरी तालुक्याला गालबोट लागले. मारहाणीची घटना नगर-मनमाड राज्य मार्गावरील गुहा हद्दीत शनिवारी दुपारी घडली. शनिवारी दोन मालवाहू ट्रकमधून राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील महिला, पुरुष व छोटी मुले इचलकरंजीहून राजस्थानकडे जाण्यासाठी निघाले होते. गुहा हद्दीत पाणी पिण्यासाठी थांबले होते. दरम्यान, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारचाकी वाहनाचा टायर फुटून अपघात, सहा जण जखमी

संगमनेर :– तालुक्यातील ग्रामीण भागात गरजुंना जेवणाची पाकिटे घेऊन जाणाºया चारचाकी वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. यात सहा जण जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापूर गणपती मंदिर ते कोल्हेवाडी चौफुली दरम्यान घडला. बलज्योतसिंग कुणालसिंग पंजाबी (वय ३०), नरेंद्रसिंग जयसिंग पंजाबी (वय ४०) सागर जयमोहन जनवेजा (वय ३८), इंद्रजीतसिंग … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनैतीक संबंधातून स्त्री जातीचे अर्भक जंगलात फेकले.!

अकोले :- तालुक्यातील देवगाव परिसरात एका तास ते आठ महिन्यांचे स्त्री जातीचे अर्भक जंगलात फेकून दिलेल्याचे आढळले आहे. हे अर्भक मृत आवस्थेत सापडले असून ते मारले की मेल्यानंतर फेकून दिले. हे अद्याप समजले नसून या बालकाचा बहुतांशी भाग पक्षांनी खाल्याचे निदर्शनास आले. देवगावच्या परिसरात कावळ्यांनी जास्त कालवाकालव सुरू केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर राजूर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीवर पोहायला गेलेल्या मामा आणि दोन भाच्याचा बुडून मृत्यू

अहमदनगर :- अकोले तालुक्यात आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. नदीवर पोहायला गेलेल्या मामा आणि दोन भाच्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. अकोल्याच्या चास शिवारातील मुळा नदीपाञातील के.टी.वेअर मध्ये पोहायला गेलेल्या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला, ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चास गावच्या शिवारात मुळा नदीपाञात के.टी.वेअर … Read more

आदर्श गावातील गावकरी ‘बिघडले’ ! लॉकडाऊन असतांना देखील केले असे काही…

पाथर्डी :- तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिरामध्ये लॉकडाऊन असतांना देखील ‘शासनाचा आदेश धुडकावत अज्ञात दहा ते बारा जणांनी मंदिरामधे एकत्र येवून आरती केली.त्यावरून कलम १८८,२६९ नुसार पाथर्डी पोलिस स्टेशनला पोलिस कर्मचारी ईश्वर बेरड यांनी फिर्याद दिली आहे. तर यात्रेनिमित साधत भैरवनाथ मंदिराजवळ कुस्त्या लावून जमावबंदी आदेश धुडकावल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थ सुखदेव श्यामराव गीते … Read more

खासदार सुजय विखेंनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘त्या’ युवकावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना

पाथर्डी :- तालुक्यातील माणिकदौंडी येथील युवकाने मरकजला (दिल्लीला) गेल्याची माहीती लपविली ही गोष्ट गंभीर आहे. सामाजिक आरोग्य सुरक्षा धोक्यात आणली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आणखी कोणी मरकजला गेलेले असतील व ते गावी आलेले असतील तर त्यांनी स्वत:होवुन प्रशासनाकडे आले पाहिजे असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले. शनिवारी पाथर्डी येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तहसीलदार महिलेने केली चालकास मारहाण ?

अहमदनगर – पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका कर्माचाऱ्यास मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.   बांधकाम विभागात कार्यरत असलेले चालक आबा रावसाहेब औटी यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत आबा औटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र याबाबत तहसीलदार देवरे यांनी हा बनाव असल्याचे सांगितले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चिकन बिर्याणीची पार्टी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल !

श्रीगोंदा :- तालुक्यातील मांडवगण गोसावीवाडी गोरे मळा येथील आंब्याच्या झाडाखाली ११ जणांनी विनापरवाना एकत्र येत चिकन बिर्याणी बनवण्याचा बेत आखला होता. मात्र पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे.  लॉकडाऊन मध्ये चिकन बिर्याणीची मेजवानी 11 जणांना भोवली आहे. बिर्याणीवर ताव मारण्याअगोदर या तरुणांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी रघुनाथ … Read more

गव्हाची पोती घेऊन जाणारी रेल्वे बोगी लुटली !

श्रीरामपूर :- शहरातील गोपीनाथनगर भागामध्ये गव्हाची पोती घेऊन जाणारी रेल्वे बोगी लुटल्याची घटना काल दुपारी घडली आहे. रेल्वे मालगाडी चितळीच्या बाजूने श्रीरामपूर (बेलापूर) रेल्वेस्थानकावर येत असताना ती मालगाडी अचानक शहरातील गोपीनाथनगर भागामध्ये थांबली. त्याचाच फायदा घेऊन परिसरातील काही जणांनी मालगाडीच्या एका बोगीचे कुलूप तोडून त्यातील गव्हाचे पोते लुटले. घटनेची माहिती समजताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पंधरा दिवसांपासून दारू न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या !

अहमदनगर :-  देशाभरात लॉकडाऊनमुळे 15 दिवसांपासून दारूची दुकाने बंद आहेत. दरम्यान पंधरा दिवसांपासून दारू न मिळाल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक  घटना समोर आली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे तळीरामांच्या हाताला काम नाही. तसेच पोटात दारू नाही. बाहेर फिरायला बंदी. त्यामुळे आपल्या मित्रांच्या गाठी-भेटी नाहीत, बैठका नाहीत. नेहमी दारू पिण्याची सवय असल्याने आता दारू मिळत नसल्याने अंगाचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ

अहमदनगर :-  श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर येथील २८ वर्षांच्या गतिमंद युवकाचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या युवकाला ४ एप्रिलला श्वसन व फिटचा त्रास होऊ लागल्याने हरेगाव येथे डॉक्टरकडे दाखवण्यात आले. नाऊर येथील एका डॉक्टरनेही घरी येऊन उपचार केले होते. बालपणापासून आजार असल्याने त्याला लोणी येथे पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले. … Read more

विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव : संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर फिरणाऱ्या पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केला असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,शहरात विनाकारण रस्त्याच्या मध्ये उभी राहून तोंडास मास्क न बांधता फिरताना पाच जण मिळून आले. त्याचे अशा कृ तीमुळे कोणलाही संसर्ग जन्य आजार पसरण्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कायनेटिक चौकात मोठी आग, सात दुकाने जळून भस्मसात

अहमदनगर शहरातील कायनेटिक चौक परिसरात एका भंगार दुकानाला आज गुरुवारी अचानक आग लाागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे सहा ते सात दुकाने, टपऱ्या या आगीमध्ये भस्मसात झाल्या आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सायंकाळी साडे सातच्या सुमाराला ही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले होते. या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दुकानास आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान !

नेवासा :- तालुक्यातील सोनई येथे आज पहाटे दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत माहिती अशी की सोनई बाजारपेठेतील मनोज जनरल स्टोअर्स या दुमजली दुकानाला आज गुरुवारी पहाटे आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे सामान, फर्निचर जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी मुळा कारखाना, ज्ञानेश्वर कारखाना व श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबांनी प्रयत्न केले. … Read more