अहमदनगर ब्रेकिंग : विषारी औषध पोटात गेल्याने तरूणीचा मृत्यू

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण येथील तरुणीचा विषारी औषध पोटात गेल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.सीमा प्रेमकुमार पासीय (वय ३०) असे तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सिमा हिला राहाता तालुक्यातील प्रवरा हॉस्पिटलमध्ये अत्यावस्थ अवस्थेत नातेवाईकांनी दाखल केले होते. तिथे उपचार सुरू असताना तिचा दुसऱ्या दिवशी ३१ … Read more

‘होमक्वारंटाइन’च्या वादातून दोन कुटुंबात झाल्या मारामाऱ्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना रोखण्यासाठी होम क्वारंटाइन केलेले दत्तू कचरू सदगीर व देवराम कचरू सदगीर (दोघेही मुथाळणे) यांना ‘तुम्ही होम क्वारंटाइन आहात, बाहेर फिरू नका’, असे सांगितल्याचा राग आल्याने या दोघांनी आपल्या घरातील १० जणांना बोलावून घेत बाळू पूंजा सदगीर यास बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी मुथाळणेफाटा येथे घडली. जखमी बाळू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना मुळे काम नसल्याने विधवा महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना रोखण्यासाठी सर्वत्र लाॅकडाऊन सुरू असल्याने घराबाहेर पडता येत नाही. हाताला काम नसल्याने जगायचे कसे या विंवचनेतून दोन लहान मुले असलेल्या मजूर विधवा महिलेने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने एका कार्यकर्त्यांच्या लक्षात ही घटना आल्याने तो अयशस्वी ठरला व या महिलेचा जीव वाचल्याची घटना सोमवारी अकोल्यात घडली. कोरोनाच्या या संकटात … Read more

विनाकारण फिरताना शिवीगाळ करनाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले : मुंबईहून आलेल्या व होम क्वरंटाईनचा शिक्का मारलेला असताना देखील कळसचे बस स्टॅण्ड व रोडवर विनाकारण फिरताना येथील दोघांना ग्रामविकास अधिकारी समजावून सांगत असता शिवीगाळ केल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कळस येथील ग्रामविकास अधिकारी कचरू पुंजाजी भोर यांनी याबाबत अकोले पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून यात म्हटले आहे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मतिमंद तरुणाला झाली कोरोनाची लागण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.  आज श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर येथील एक 28 वर्षीय तरुण कोरोना बाधित असल्याचे आज समोर आले. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी ही माहिती दिली. संबंधित तरुणाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोना बाधित रुग्ण मतिमंद असून चार तारखेला त्याला फिट … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रूग्णवाहिकेच्या चालकालाच पोलिसांकडून मारहाण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एका रुग्णास आणण्यासाठी हॉस्पीटलमध्ये जात असताना रुग्णवाहिकेच्या चालकाला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना रविवारी नगर शहरात  घडली.  या घटनेचा रुग्णवाहिकेच्या चालक संघटनेने निषेध केला असून सर्व रुग्णवाहिका चालकांनी बंद पाळला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर शहरातील एक रुग्णवाहिका एका रुग्णास आणण्यासाठी जात होती. यावेळी पोलिसांनी या रुग्णवाहिकेचा चालक अक्षय वाघमारे … Read more

या कारणामुळे झाला ‘त्या’ फार्महाऊसवर गोळीबार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव परिसरात एका फार्म हाऊसवर गोळीबार करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहरातील वॉर्ड नंबर 1 मधील दशमेशनगर येथील अमरप्रीतसिंग सरबजितसिंग सेठी यांनी दिलेल्या पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तालुक्यातील खैरी निमगाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धार्मिक द्वेष पसरविल्यावरून गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीरामपूर : धार्मिक द्वेष निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याच्या आरोपावरून येथील मनोज चिंतामणी याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिंतामणी याने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर धार्मिक द्वेष वाढविणाऱ्या पोस्ट टाकल्या. चुकीचे संदेश प्रसारित केले. या संदेशामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ॲड. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पूर्ववैमनस्यातून ‘या’ तालुक्यात झाला गोळीबार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असला तरी जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाहीय श्रीरामपूर तालुक्यात पूर्ववैमनस्यातून दोन गटात वादावादी तसेच हाणामारी होवून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक  घटना समोर आलीय  खैरीनिमगाव (ता. श्रीरामपूर) येथे काल रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.या गोळीबारात एक जण गंभीर … Read more

अहमदनगर शहरातील ‘या’ कारच्या शोरूमला लागली आग, मोठा अनर्थ टाळला …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर – मनमाड रोडवरील एमआयडीसी परिसरातील सह्याद्री चौकाजवळ असलेल्या टाटा शोरुमला शनिवारी दि. 4 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली. या आगीत एक टाटा सुमो जळाली आहे. तातडीने महानगरपालिकेचे अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणली. एमआयडीतील टाटा शोरुम असून सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या संचारबंदी मुळे ते बंद आहे. शोरुम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चोरांचा मंदिरावर डल्ला, एक लाखाचे दागिने लंपास !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पाथर्डी तालुक्यातील सोनोशी गावाचे ग्रामदैवत ब्रम्हनाथ महारांच्या मूर्तीच्या अंगावरील दोन ते अडीच तोळ्याचे सोन्याचे दागीने कानातील बाळ्या व गळ्यातील लॉकेट असा सुमारे एक लाख रुपयाचा ऐवज दोन चोरट्यांनी गुरुवारी रात्री चोरुन नेला. मंदिरात व परीसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. सोनोशी गावात नदीच्या जवळच ब्रम्हनाथ महारांजाचे मंदिर आहे. मंदिरात ब्रम्हनाथ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मशिदीत २३ जणांना लपवले, गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीरामपूर वॉर्ड नंबर दोनमधील उमर फारूख मशिदीमधून पोलिसांनी बुधवारी २३ नागरिकांना ताब्यात घेतले. या सर्वांना होम क्वारंन्टाइन करण्यात आले आहे. या प्रकरणी तबलीक जमातीचे सचिव अब्दुल रेहमान मोहम्मद शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला. उमर फारुक मशिदीमध्ये अमरावती, पुणे, वर्धा, तसेच उत्तरप्रदेशातील २३ नागरिक थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बुधवारी तपासणी केली … Read more

बांधाचा वाद : सुनेला कुऱ्हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नेवासे तालुक्यातील लेकुरवाडी आखाडा येथे मुलाला व सुनेला कुऱ्हाडीने व गजाने मारहाण केल्याप्रकरणी सोपान सुखदेव महारनोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊ नामदेव व वडील सुखदेव यांच्यासह सात जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोपान महारनोर यांनी जबाबात म्हटले आहे, कुटुंबात सामायिक बांधाचा वाद सुरू असून २५ मार्चला धाकटा भाऊ नामदेव … Read more

ब्रेकिंग न्यूज : कार पेटवून देत ठाकरे कुटुंबियांना जीव मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशभरात लाॅकडाउन असताना राहाता तालुक्यातील निमगाव कोर्राळे गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब काळु ठाकरे यांच्या घरासमोर उभी केलेली स्विप्ट डिझायर ही चार चाकी गाडी उभी असताना सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पेटवून कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला यात गाडीचे मोठे नुकसान झाल्यामुळे निमगाव कोर्राळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे याबाबत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावात चोरट्यांचेच झाले एप्रिल फूल !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सर्वत्र संचारबंदी असतानाही मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास कुकाण्यात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण नागरिकांच्या जागरूकपणापुढे चोरट्यांच्या टोळीला पळ काढावा लागल्याने नागरिकांच्या प्रसंगावधानपणाने चोरट्यांचे एप्रिल फुल झाले. मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास वंदेमातरम नगरात चोरटयाच्या टोळीने प्रवेश केला त्याच वेळी या नगरतील कुत्रे जोराने भुंकत असल्याने नागरिकंाना संशय आला. … Read more

प्रेयसी व तिच्या वडिलांवर इम्प्रेशन मारण्यासाठी तो झाला बीएसएफ जवान आणि अडकला पोलिसांच्या ‘जाळ्यात’

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- दिल्ली पोलिसांनी बदरपूर भागात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तोतया असिस्टंट कमांडंटला अटक केली आहे. हा आरोपी स्पर्धात्मक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला होता. यामुळे त्याने प्रेयसी व तिच्या वडिलांवर इम्प्रेशन मारण्यासाठी बीएसएफचा गणवेश घालून तो फिरत होता. साऊथ ईस्टचे पोलिस उपायुक्त आर. एस. मीणा यांनी सांगितले, २७ मार्च रोजी पोलिस गस्तीवर असताना रात्री ९ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पतीनेच केली पत्नीची हत्या,नंतर सांगितले ‘हे’ कारण

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अकोले तालुक्यातील चैतन्यपूर येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या मृत्यूनंतर सासरच्या लोकांनी बनाव तयार करून मृत विवाहिता ही गोठ्यात गाईचे दूध काढण्यासाठी गेली असता गाईने लाथ मारल्यानंतर ती दगडावर जाऊन आदळली व त्यातच तीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. सविता भगवान हुलवळे असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे … Read more

अफवा पसरविणे महागात तब्बल ५१ गुन्हे दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने चुकीची माहिती पसरविणे अनेक महाभागांना महागात पडले आहे. महाराष्ट्र सायबरने मार्च महिन्यात तब्बल ५१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सर्वाधिक गुन्हे हे सातारा, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सायबर शाखेकडून व्हॉट्सॲप, फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम, टिकटॉकसह यूट्यूबवर वॉच ठेवण्यात येत आहे. चुकीची पोस्ट, व्हिडीओ आढळून आल्यास … Read more