आमदार किरण लहामटे आमदारकी चमकविण्यात मग्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम  :- कोरोना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री करत असताना स्वतः ‘डॉक्टर’ असलेले राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे मात्र सर्व सूचना धाब्यावर बसवून लोकांच्या गर्दीत स्वतःची आमदारकी चमकविण्यात मग्न आहेत. मंगळवारी त्यांच्या हस्ते तालुक्यातील मवेशी येथे पोलिस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात 16 वर्षीय तरूणाचा दुदैर्वी मृत्यु

अहमदनगर लाईव्ह24 टीम / अकोले :-  भीषण अपघातात तरूणाचा दुदैर्वी मृत्यु झाला आहे. तालुक्यातील देवठाण जवळ निखील विनायक शहाने या 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अपघातातील समोरील वाहनावर असणार्‍या दोघांची प्रकृतीही अतिशय चिंताजनक असुन त्यांना संगमनेर येथील तांबे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी दोघेही अकोले येथील शाहुनगरचे रहिवासी आहेत. अहमदनगर Live24 वर … Read more

पोलिसांकडूनच कैद्यांचा पाहुणचार आणि शाही व्यवस्था

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  संगमनेरच्या कारागृहात काही पोलिसांकडूनच कैद्यांचा चांगला पाहुणचार ठेवला जात असल्याची धक्कादायक माहिती समजली आहे. कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना तंबाखू, गुटखा अगदी सहज पोहोचवली जात असून काहींना घरचा डबाही मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. संगमनेर पोलीस ठाण्याच्या शेजारीच कारागृह बांधण्यात आले आहे. या कारागृहात एकूण 4 बराकी आहे. एका बराकीत 6 असे … Read more

वाळू तस्करीतूनच झाला शिवसैनिक सुरेश गिर्हे यांचा गोळ्या घालून खून !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शिवसेनेचे सुरेश श्यामराव गिऱ्हे याच्या निर्घृण हत्त्येप्रकरणी पोलिसांनी संवत्सर रामवाडी येथील संशयित आरोपी रवी अप्पासाहेब शेटे व विजय खर्डे यासह सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत सुरेश गिऱ्हे याच्या विरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्यासह वाळूचोरी, जुगार असे १० गुन्हे दाखल असून त्यात खंडणी, लुटमार, वाळूचोरी आदी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेड भुतवडा तलावात बुडून अश्रू उत्तम डोंगरे (वय ५६) यांचा मृत्यू झाला. चार दिवसांनंतर सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. गळ्याभोवती टॉवेल व दगड बांधलेला होता. डोंगरे यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डोंगरे हे १३ रोजी भुतवडा तलावाशेजारी पांडववस्ती येथील घरातून बाहेर पडले होते. सायंकाळी ते घरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्न केले नाही तर तुला पेट्रोल टाकून जाळील असे म्हणत त्याने विद्यार्थिनीसोबत केले असे काही…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर शहरातील सिव्हील हॉस्पिटल नसिंग होस्टेल परिसरात एका २०वर्ष वयाच्या विद्यार्थिनीबरोबर धमकावून बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडले,  आरोपी संग्राम गिते वय २१ , रा . केडगाव याने सदर विद्यार्थिनीला चांदबीबी महाल परिसरात नेवून तिला लजा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. तिला होस्टेलवरुन उचलून नेवून बळजबरीने लग्न करण्यास धमकावले. विद्यार्थिनीने … Read more

अहमदनगर शहरात महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरात छताला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.13) रात्री सारसनगर येथे कानडे मळा परिसरातील नामगंगा जवळ घडली. रेवती रविंद्र गुंजाळ (वय 18 मुळ रा.सारसनगर, कानडे मळा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही तिच्या आजोळी मामाकडे राहत असून नगरमधील रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये इयत्ता 12 वीमध्ये शिकत होती. … Read more

‘या’ कारणामुळे झाली अहमदनगर जिल्ह्यातील त्या शिवसैनिकाची हत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव ;- तालुक्यातील भोजडे चौकी परिसरात गिरे वस्ती येथे राहणारे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश शामराव गिरे (वय ३८) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रविवारी (दि. १५) सायंकाळी साडेसहा वाजता घडलेल्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील भोजडे चौकी परिसरातील गिरे वस्ती येथे राहत असलेले … Read more

नगर-मनमाड महामार्गावर ट्रकच्या धडकेत बिबट्या ठार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर-मनमाड महामार्ग ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात ट्रकची बसल्याने तो जागीच ठार झाला.ही घटना नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेल कुबेरनजिक साई टायर्सजवळ असलेल्या ओढ्याजवळ काल रविवारी (दि.15) रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेची खबर पत्रकार सुनील भुजाडी यांनी वनखात्याला दिल्यानंतर वनपाल लोंढे व सचिन गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा मृतदेह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचा मृतदेह आढळला.. खून की आत्महत्या?

अहमदनगर लाईव्ह24 टीम / राहुरी :- बिरोबानगर-बारागाव नांदूर रस्त्यावर राहणाऱ्या साक्षी संदीप तोरणे (वय २१) या महिलेचा मृतदेह राहत्या घरात रविवारी सकाळी आढळला. ही महिला गेल्या काही दिवसांपासून एका व्यक्तीसमवेत राहात होती. तिचा खून करण्यात आली की, तिने आत्महत्या केली हे समजू शकले नाही. पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत. त्यांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला, मात्र उशिरापर्यंत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव :- तालुक्‍यातील झालेल्या गोळीबारात येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुरेश श्‍यामराव गिरे (वय 38, रा. भोजडे चौकी, कोपरगाव) यांचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याची चर्चा असून मृत गिरे यांच्या राहत्या घरी आज सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते.  या बाबत सविस्तर माहिती अशी, सायंकाळी गिरे हे आपल्या घरी होते. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : संभाजी महाराजांचा पुतळा बसविणा-या दहा जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शहरातील प्रोफेसर चौकात रविवारी (दि़ १५) पहाटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी विनापरवाना छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविला. हे समजताच प्रशासनाने पुतळ्याचे पावित्र्य राखत तो काढून घेत सुरक्षित ठिकाणी हलविला. या घटनेनंतर प्रोफेसर चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी … Read more

बोकड चोरण्याच्या इराद्याने गेलेल्या ‘त्याची’ नियत फिरली, आणि त्याने तिच्यावर बलात्कार करून हत्या केली !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यातील खानापूर येथील महिलेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे खानापूर येथील एका मतीमंद तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस पोलिसांनी रविवारी पहाटे म्हाळादेवी शिवारातून अटक केली. ७ मार्चला या तरुणीवर अत्याचार करुन खून झाल्याची घटना घडली. याबाबत खून व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कौन बनेगा करोडपतीच्या नावाखाली ४२ लाखांची फसवणूक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / अहमदनगर : ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला ६ करोडची लॉटरी लागल्याच्या नावाखाली एकाची ४२ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना कर्जतमध्ये घडली. या प्रकरणी सुरेश माधवराव शेजवह (वय ६८, रा.थिटेवाडी, ता.कर्जत) यांनी कर्जत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार राणाप्रताप सिंग (रा.कोलकाता) व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला … Read more

‘त्या’ बलात्कार प्रकरणात शिर्डीच्या उपनगराध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डीत एका तरुणासह कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील धक्कादायक माहिती म्हणजे या प्रकरणात संशयित आरोपींमध्ये शिर्डीच्या विद्यमान उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन यांचा समावेश आहे. पीडित तरुणीने शिर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिर्डी येथील आकाश … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शिवारात दोघांवर तलवारीने हल्ला

अहमदनगर लाईव्ह24 टीम ;- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शिवारात दोघांवर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना १२ मार्च रोजी घडली. या हल्ल्यात संदीप रामदास गायकवाड व रामदास बाळू गायकवाड हे दोघे जखमी झाले आहेत . दीपक सुरेश ससाणे यांनी १३ मार्च रोजी बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आदेश बाळू गायकवाड ( रा.नारायण गव्हाण) , … Read more

चारित्र्याच्या संशयावरून पोलिस पत्नीचा खून करून शेतकरी पतीची आत्महत्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / परभणी :- चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा वस्तऱ्याने गळा चिरून पतीने खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता.१४) खानापूर परिसरात घडली. याच घटनेत पतीने स्वतःच्या मानेवर वस्तऱ्याचे वार करून आत्महत्या केली. कमल जाधव-माने (वय २५) असे मृत पोलिस कर्मचारी महिलेचे नाव आहे. त्या शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. तर पतीचे नाव कृष्णा … Read more

खोटे लग्न लावून नवरीसह दलालही झाले ‘नॉट रिचेबल’ अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीरामपूर ;- चार जणांनी संगनमत करून लग्न लावल्याचे भासवून दलालीची रक्कम घेऊन एका व्यापाऱ्याची सोन्या-चांदीच्या दागिन्यासह सुमारे ३ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. ‘बनावट नवरी’ प्रकरणानंतर आता दलाली घेऊन लग्न जमवणाऱ्यांकडूनही फसवणुकीचे प्रकार होत असल्याने खळबळ उडाली. फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या तक्रात अर्जात म्हटले आहे, आमच्या समाजात मुलींचे प्रमाण … Read more