अहमदनगर ब्रेकिंग : वादळी पावसात वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यास काल संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. सुनील गणपत फटांगरे (वय४५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी सुनील फटांगरे बुधवारी आपल्याशेतातील हरभरा पिकाची काढणी करत होते. शेतात काम करत असताना संध्याकाळी … Read more

सरपंचाला वाळूतस्करांनी लावला कट्टा ,दिली जिवे ठार मारण्याची धमकी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- वाळू वाहतुकीस विरोध केला म्हणून वाळूतस्करांनी जाफराबादचे सरपंच संदीप शेलार यांना गावठी कट्टा लावून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी रात्री घडली. कोरोनामुळे ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून प्रमुख रस्ते काट्याच्या साह्याने बंद केले आहेत. वाळू वाहतूक करणारा रामपूर (कोकरे) येथील पोपटी हिरव्या रंगाचा टाटा कंपनीचा ६०८ टेम्पो जाफराबाद गावाकडून जुन्या … Read more

धक्कादायक : परदेशातून अहमदनगर जिल्ह्यात आलेला व्यक्ती विकत होता जीवनावश्यक वस्तू, पोलिसांनी दाखल केला गुन्हा ..

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- परदेशातून अहमदनगर जिल्ह्यात आलेला व्यक्ती विकत होता जीवनावश्यक वस्तू विक्री करताना आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. [better-ads type=”banner” banner=”27880″ campaign=”none” count=”2″ columns=”1″ orderby=”rand” order=”ASC” align=”center” show-caption=”1″][/better-ads] कोरोना संदर्भात खबरदारी म्हणून परदेशातून आलेल्या कोपरगाव शहरातील एका व्यक्तीस प्रशासनाने होम कोरंटाईनचा सल्ला देत घरात थांबण्यास सांगितले होते. परंतु त्याने उल्लंघन केल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर भावास जीवे मारण्याची धमकी देत लॉजमध्ये बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने तिच्या भावास जीवे मारण्याची धमकी देवून अत्याचार केली असल्याची घटना घडली आहे. सदर घटना ऑगस्ट 2019 ते 15 फेब्रुवारी 2020 रोजी दरम्यान घडलेली असून या अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनुसार आरोपी- अविनाश नवनाथ दरेकर, रा पारनेर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासबंधीची पोलिस सूत्रांकडून … Read more

इराणी नागरिकाची माहिती लपवून ठेवल्याने शहरातील ‘या’ हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शहरात सर्वत्र बंद असताना शहरातील एका हॉटेलमध्ये इराणी नागरिकाने स्वतः बाबत माहिती लपवून वास्तव्य केले. व तेथून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत इराणी नागरिकाविषयी माहिती शासकीय यंत्रणेपासून लपवून ठेवल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात हॉटेल मालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हॉटेल सिंग रेसिडेन्सीचे मालक कंवलजीत सिंग गंभीर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी झाले दोन मृत्यू, संपूर्ण गाव हादरले !

अहमदनगर लाईव्ह24 टीम  :- श्रीरामपूर तालुक्यात एकाच दिवशी दोन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बेलापूर-पढेगाव रस्त्यावर एका मंदिराजवळ झाडाला गळफास घेवून एका तरुणाने आत्महत्या केली. तसेच श्रीरामपूर रस्त्यावर एक वृध्द इसमाचा मृतदेह आढळून आला. एकाच दिवशी या दोन घटना घडल्यामुळे संपूर्ण गाव हादरले. आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव रवींद्र अरुण पाटोळे (वय २६) आहे. रवींद्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ मंत्र्यांच्या कारचा नगरमध्ये झाला अपघात, मंत्री थोडक्यात बचावले

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या कारला आज नगरमध्ये अपघात झाला. केडगाव बायपास चौकात त्यांच्या कारचा पुढील टायर फुटल्याने हा अपघात झाला. परंतु चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याकडेला घेत नियंत्रण मिळवल्याने ते थोडक्यात बचावले. नवाब मलिक हे आज सकाळी ते मुंबई येथून परभणीला आढावा बैठकीला जाण्यासाठी सरकारी वाहनातून नगरमार्गे जात होते. सकाळी … Read more

बिग ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 31 मार्च पर्यंत लॉकडाउन

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  महाराष्ट्रात लॉकडाउन!, कलम १४४ लागू,अत्यावश्यक सेवा वगळून सर्व गोष्टी बंद रहाणार. लॉक डाऊनमध्ये नागरिकांना त्यांचा परिसर सोडून दुसरीकडे जाण्यास मनाई. ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन; राज्यातील सर्व शहरांत कलम १४४ लागू. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेली ७५ शहरं पूर्णपणे लॉकडाऊन करा, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. या लॉक डाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नववीत शिकणाऱ्या मुलीवर त्याच गावातील मुलाने केला बलात्कार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदे तालुक्यातील नववीत शिकणाऱ्या मुलीवर त्याच गावातील मुलाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील वांगदरी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची घटना घडली. याप्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी एकाविरोधात बलात्कारासह अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. वांगदरी येथील हा अत्याचार केलेला मुलगाही बारावीच्या वर्गात शिकत आहे.  अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कुकडी कॅनॉलमध्ये दोन मृतदेह आढळले

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत दोन मृतदेह आढळले आहेत. कुकडी कॅनॉलमध्ये घोटवी गेट येथे एक पुरूषाचा (वय ५० ते ५५) मृतदेह  तसेच कोळगाव साकेवाडी येथे एका स्त्रीचा (वय ३० ते ४०) बेवारस मृतदेह आढळून आला. यामुळे तालुक्यात  खळबळ उडाली आहे. बेलवंडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. या संदर्भात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना व्हायरसच्या भीतीने महिलेची आत्महत्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना व्हायरसच्या भीतीने महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. शनिवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. नगर तालुक्यातील एक महिला काही दिवसांपासून आजारी होती. तिला सर्दी, खोकल्याचा त्रास सुरु होता. त्या महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. कोरोनो व्हायरसच्या भितीने त्या महिलेने आत्महत्या केली असावी, … Read more

आमदार डॉ. किरण लहामटेंच्या बनावट ट्विटर अकाउंट वरून फेक पोस्ट

अहमदनगर लाईव्ह24 टीम / अकोले :- कोरोनाचा अकोल्यात रुग्ण सापडला अशा आशयाचे ट्विट करणारी आ.डॉ. किरण लहामटे यांच्या अकौंटवरील पोस्ट फेक असून याची चौकशी करावी, अशा आशयाची तक्रार खुद्द आ. डॉ किरण लहामटे यांनी अकोले पोलीस ठाण्यात दिली आहे. आ. डॉ. लहामटे यांच्या नावाने ट्विटरवरील पोस्ट गुरुवारी रात्री सामाजिक माध्यमावर फिरत होती. यानंतर डॉ. लहामटे … Read more

महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार जेरबंद

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- खानापूर परिसरात आदिवासी महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेला गर्दनी येथील तिसऱ्या आरोपीला पोलिसांना गुरुवारी जेरबंद केले. शिवराम खोडके (वय ४५) त्याचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी सोमनाथ गायकवाड (वय ३७, राहणार टाकळी) यास अटक केली आहे. या दोघांनी संगनमताने हे कृत्य केल्याचे तपासातून स्पष्ट झाले. संगमनेर येथील बाजारात आरोपीने … Read more

त्या चारही आरोपींना विचारली शेवटची इच्छा तेव्हा म्हणाले…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या आरोपींची नावं आहेत. दरम्यान फाशी टळावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आरोपींनी प्रयत्न केले. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास दोषींची याचिका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुरेश गिरे खून प्रकरणातील आरोपींना अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे पूर्ववैमनस्य झालेल्या सुरेश गिरे खून प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. नितीन सुधाकर अवचिते, शरद मुरलीधर साळवे, रामदास माधव वलटे, आकाश मोहन गिरी अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी दि.१५ मार्चला सायंकाळी ६.४५ वा.सुमारास भोजडे (ता.कोपरगाव) येथे सुरेश शामराव गिरे … Read more

नगर-मनमाड महामार्गावर थरार : चोरांचा पाठलाग करताना पोलिसांसोबत झाले असे काही .

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर-मनमाड महामार्गावर डिझेलचोरांचा पाठलाग करताना आज पहाटे शहरात वाहन उलटून झालेल्या अपघातात दोन पोलीस जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताचा फायदा घेत चोरांनी मात्र धूम ठोकली. हवालदार नारायण ढाकणे हे गंभीर जखमी झाले असून, पोलीस नाईक सोमनाथ जायभाये यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. नगर-मनमाड महामार्गावर मंगळवारी (ता. १७) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणी दोघांना अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव  :- तालुक्यातील शिवसेना उपतालुका प्रमुख सुरेश शामराव गिर्‍हे यांची भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील भोजडे चौकी नजीक असलेल्या गिर्‍हे वस्ती येथिल त्यांच्या घरी सहा हल्लेखोरांनी रविवार हल्ला करून हत्या केल्या प्रकरणी पसार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. सुरेश शामराव गिर्‍हे याची हत्या केल्यानंतर त्यातील आरोपी रवी आप्पासाहेब शेटे व विजय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेवर कोयत्याने हल्ला !

अहमदनगर लाईव्ह24 टीम  :- कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एक माथेफिरूने महिलेवर कोयत्याने वार केले. महिलेच्या आईलाही ढकलून देत मारहाण केली. बुऱ्हाणनगर येथील गुगळे कॉलनीत सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी किशोर भुजंग (भोसले आखाडा, नगर, हल्ली राहणार स्वामी समर्थ हॉस्पिटल, बुऱ्हाणनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत स्मिता किशोर वाव्हळ (स्वामी समर्थ हॉस्पिटल, बुऱ्हाणनगर) … Read more