बापरे ! सासूरवाडीत आलेल्या जावयाला पाजले चक्क विषारी औषध

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- लग्नानंतर सासरवाडीस आलेल्या जावयाची उत्तम प्रकारे बडदास्त ठेवली जाते. त्यास काय हवे काय नको याची चांगली काळजी घेतली जाते. मात्र सासरवाडीत आलेल्या जावयाला चक्क विषारी द्रव पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. माहेरी असलेल्या पत्नीला सासरी घेऊन जायला सासरवाडीत आलेल्या जावयाला चक्क विषारी द्रव पाजून … Read more

सोसायटीच्या चेअरमनसह १२ जणांवर ‘हा’ गंभीर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जमिनीच्या वादातून श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह १२ जणांवर बेलवंडी पोलिस ठाण्यात विनयभंगासह,ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यातील ३ आरोपींना अटक केली. तर चेअरमनसह ९ आरोपी पसार झाले आहेत. येथील रोहिदास गबाजी धस यांची शेती सुमारे दीड वर्षापूर्वी इसार पावती करुन फिर्यादीने विकत घेतली असताना तीच … Read more

अरे बापरे! तब्बल सात महिन्यांपासून सुरू आहे ‘हे’ आंदोलन?

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- आजपर्यंत आपण आंदोलनाचे अनेक प्रकार पाहिले आहेत. तसेच आतापर्यंत कोणतेही आंदोलन ठराविक कालावधीनंतर समाप्त केले जाते किंवा माघार घेतली जाते. परंतु सध्या देशात असे एक आंदोलन सुरू आहे की ते मागील सात महिन्यांपासून सुरू झालेले आहे. ते अद्यापही सुरूच आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी … Read more

वडाची पूजा करायला गेल्या अन सौभाग्य लेणे गमावून आल्या !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- गृहिणींच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सण वटपौर्णिमा. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेरे मारून प्रार्थना करतात. मात्र याच दिवशी पूजेसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील सौभाग्य लेणेच चोरट्याने धूम स्टाईल पळवून नेले आहेत. वटपौर्णिमेनिमित्त घराबाहेर पडलेल्या शिक्षिकेसह दोन गृहिणींचे सौभाग्याचे लेणे दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी हिसकावून नेले आहे. … Read more

पुढील सात दिवस पावसाची शक्यता कमीच ! : हवामान विभागाचा अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये दणक्यात आगमन झालेल्या पावसाने सध्या दडी मारली आहे. गेल्या काही दिवसांपासून केवळ तुरळक सरी पडल्या आहेत. फारसा पाऊस झालेला नाही. हेच चित्र पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यात पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम … Read more

विश्वस्त मंडळाचा वाद न्यायालयात जाणार

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- उच्च न्यायालयाने घालून दिलेली नियमावली बाजूला सारून सरकार नैतिकतेच्या व्याख्येत न बसणा-यांची वर्णी साई संस्थानच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्याचे घाटत आहे; परंतु ज्यासाठी आतापर्यंत लढा दिला, ते सामाजिक कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. एकदा यादी जाहीर झाली, की त्याला आव्हान देण्याची तयारी सुरू आहे. शिवसेनेतूनही नाराजी :- साई संस्थानच्या विश्वस्त … Read more

कधी होणार अहमदनगर शहर खड्डेमुक्त ? शहराची ओळख खड्ड्यांमुळे !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर शहराची ओळख खड्डेमय रस्त्यांमुळे झालेली आहे शहरात एक-दोन पाऊस झाले तर पूर्ण शहर हा खड्डेमय बनतो सत्ताधारी फक्त फोटोमध्ये नगरकरांना विकास दाखवून आशेवर ठेवतात नगर शहरामध्ये काही ठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम सोडून दिले तर काही काम फक्त फोटो पुरते केले आहे अडीच वर्षांमध्ये शहरात एकही काम शहराला … Read more

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व जय हिंद वृक्ष बँकच्या वतीने

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व जय हिंद वृक्ष बँकच्या वतीने बहिरवाडी (ता. नगर) येथील डोंगरावर वड, पिंपळ, लिंब, उंबर व बेलचा समावेश असलेल्या 625 पंचवृक्षांची लागवड करण्यात आली. डोंगर रांगावर राबविण्यात आलेल्या या वृक्ष लागवडची सुरुवात पद्मश्री पोपट पवार, आर्दश पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे, … Read more

मालकाने पगार न दिल्याने कामगाराने दूध डेअरी पेटवली ! झाले इतक्या लाखांचे नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील एका दूध डेअरी कर्मचाऱ्याने डेअरीला आग लावल्याची घटना घडली आहे. डेअरी मालकाने पगार न दिल्याच्या रागातून गणेशवाडी येथील खाजगी दूध डेरी मध्ये काम करणार्‍या कामगार राहुल मोरे याने त्याच्या मालकाच्या दूध डेरी प्लांट चे कार्यालय , स्टोअर रूम ,जनरेटर रूम ला आग लावली.त्यात सुमारे … Read more

वासन टोयोटात नवीन फॉर्च्युनर लिजेंडर वाहनाचे वितरण

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- भारतात अव्वल असलेल्या व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या टोयोटाच्या नवीन फॉर्च्युनर लिजेंडर वाहनाचे वितरण केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट येथील वासन टोयोटा शोरुममध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. वाहनाची पहिली डिलेवरी चेतन पोपटलाल भळगट यांना देण्यात आली. यावेळी शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, दिपक जोशी, लोकेश मेहतानी, मुजाहिद (भा) … Read more

भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांना भिक मागण्याची वेळ आणली !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी गॅससह जीवनावश्यक वस्तूंची भाव वाढ केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने शहरात भिक मागो आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने चुकीचे धोरण राबवून प्रचंड प्रमाणात वाढवलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना भिक मागण्याची वेळ आली असताना सरकारचे लक्ष वेधण्यासाठी … Read more

दलित अत्याचार म्हणून जिल्हा घोषित करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- मागासवर्गीय कुटुंबीयांना सार्वजनिक पाणवठे बंद करून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण झालेल्या कुटुंबाचे भेट घेऊन सातवण करण्यासाठी आलेले ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार याची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेताना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश थोरात, महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष जितेश जगताप, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष बाळासाहेब … Read more

भयंकर : वटपोर्णिमेच्या दिवशीच पत्नीवर केले धारदार शस्त्राने वार

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-  एकीकडे वटपोर्णिमेच्या दिवशी जन्मोजन्मी हाच पती मिळावा’ यासाठी विवाहित महिला प्रार्थना करत होत्या तर दुसरीकडे अशीच प्रार्थना करत असलेल्या महिलेवर पतीनं धारदार शस्त्राने वार केल्याची घटना समोर आली आहे. यात मुलीचा कानही कापला आहे. या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेस सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले … Read more

आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- ओबीसी आरक्षण टिकविण्यात आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी सकाळी १०.३० वाजता भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याची माहीती तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर यांनी दिली. राहाता शहरातील विरभद्र चौकात होणा-या या … Read more

मुकेश अंबानींनी केली ही महत्वाची घोषणा …

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी भारतात JioPhone Next ची घोषणा केली आहे. जियो फोन नेक्स्ट हा फक्त भारतातीलच नव्हे, तर जगात सर्वात स्वस्त फोन असेल, असा दावा वार्षिक सभेदरम्यान या फोनची घोषणा करताना मुकेश अंबानी यांनी केला आहे. भारताला टूजी मुक्त करायचं असेल, तर सर्वांना परवडेल अशा … Read more

संजीवनी सिनिअर काॅलेजला सहा नवीन अभ्यासक्रमांना मान्यता

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी आर्टस्, काॅमर्स व सायन्स या सिनिअर काॅलेजला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाकडून सहा नवीन अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून मान्यता मिळाली. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण झाली, अशी माहिती संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन … Read more

भाजपची वैचारिक दिवाळखोरीच समोर आलीय !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मंजूरही करण्यात आल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यानी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, एका गंभीर प्रकरणात अटक झालेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहून वाटेल तसे बेछूट आरोप करायचे हे चुकीचे आहे. गंभीर … Read more

पाऊस होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- शेती मशागतीची कामे करून खरीपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे, रासायनिक खतांची शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे. मात्र मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. पाऊसच नसल्याने सर्व कामे थांबली आहेत. तालुक्यात ४२.२ टक्के पाऊस झाल्याचा अंदाज प्रशासनाने जाहीर केला आहे. नेवासे तालुक्यात सन २०२१ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी महागाईच्या काळात … Read more