फळबागधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंत्री तनपुरेंनी दिले मदत मिळवून देण्याचे आश्वासन

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या डाळिंब फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना फळपीक विम्याची रक्कम संबंधित विमा कंपन्यांकडून मिळवून देण्याचे आश्‍वासन राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहे. राज्यमंत्री तनपुरे यानू नुकताच पाथर्डी तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी … Read more

धक्कादायक ! दोघांवर कोयत्याने केले वार; एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील एका परिसरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या दोघांवर परिसरातील एकाने जीवघेणा हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील नवी दिल्ली परिसरामध्ये मुजू कुरेशी यांच्या खोलीमध्ये मजुरी काम करणारे अर्जुन कानिफनाथ भोसले हे … Read more

पालकमंत्री म्हणतात : कोरोना संपलेला नाही;  निर्बंध पाळा… अन्यथा परत ?

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- राज्यासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही. मात्र, जिल्ह्याचा रुग्ण बाधितांचे प्रमाण आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता या निकषांच्या बाबतीत आपला जिल्हा स्तर एक मध्ये आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरु होणार आहेत. मात्र, धोका संपलेला नाही.  दुसऱ्या लाटेत कोरोनाची भीषणता आपण अनुभवलेली आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. … Read more

आनंदवार्ता : आजपासून  जिल्ह्यात लाल परी धावणार!

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कोरोनाच्या धुमाकूळामुळे अहोरात्र प्रवाशांच्या सेवेत हजर असलेली लाल परी मागील तब्बल ६४ दिवसांपासून थांबली होती. परंतु आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने निर्बंध शिथील झाले व परत एकदा ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ जिल्ह्यांतर्गत लाल परीची चाके धावणार आहेत. सुरूवातीला  ५० टक्के फेऱ्या सुरू होणार असून नंतर शंभर टक्के क्षमतेने लालपरी धावणार … Read more

म्युकरमायकोसिसमुळे 39 वर्षीय हॉटेल व्यवसायीक तरूणाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- देशात दररोज म्युकरमायकोसिस रुग्णांच संख्या वाढतच आहे. आधीच कोरोनामुळे हैराण झालेल्या नागरिकांवर म्युकरमायकोसिसचं संकट आलं आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू आटोक्यात येत आहे. मात्र, म्युकरमायकोसिसचं नवीन संकट उभं राहिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातही सध्या म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत आहेत,कोरोना विषाणू संक्रमणावर मात करून बाहेर पडलेल्या रुग्णांना रोग प्रतिकारशक्ती … Read more

अहमदनगर पोलिस दलात खळबळ ! हेड कॉन्स्टेबल वर गुन्हा…

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-अकोले तालुक्यातील राजुर पोलिस ठाण्यात सेवेत असलेले हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव याने महिला पोलिस कॉन्स्टेबल वर मैत्री करण्याचा दबाव आणून “त्या’ महिला पोलीस कर्मचाऱ्याचा हात धरून मिठी मारल्याची घटना घडली होती. संबधित महिला कॉन्स्टेबल यांनी याबाबत थेट जिल्हा पोलिस कार्यालय येथे जात आपल्यावरील अन्यायाला वरिष्ठ अधिकार्यां पुढे वाट मोकळी … Read more

बा… विठ्ठला यंदा तरी भेट घडू दे रे !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कोरोनामुळे शेकडो वर्षांपासून अखंडित सुरू असलेली वारीची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी देखील खंडित होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. मागील वेळा झाले ते झाले मात्र या वर्षी वारीची परंपरा खंडित होता कामा नये. यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात का होईना पण पायी वारी सोहळ्याला परवानगी द्या. आम्ही कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन … Read more

गॅस कटरने ATM मशीन फोडून लाखो रुपये लंपास !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात तळेगाव दिघे येथे असलेले टाटा इंडिकॅशचे एटीएम रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केले असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शनिवारी रात्री संगमनेर … Read more

अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील डेथ ऑडिटचे आदेश दिले !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कोविड काळात तहसीलदार प्रदीप पवार व प्रांत दाभाडे यांनी योग्य उपाय योजना न केल्याने श्रीगोंदा तालुक्यातील अनेक निरपराध लोकांचे बळी गेले आहेत. त्या सर्व परिस्थितीला तहसीलदार व प्रांत हे दोघे आधिकारी या परिस्थितीला जबाबदार असल्याचा आरोप नाहाटा व भोस यांनी करत जिल्हाधिकारी यांकडे दि.३१ मे रोजी तक्रार दाखल … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणाची मोबाईल सेवा विस्कळीत !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- सध्याच्या ऑनलाईनच्या काळात अँड्रॅाईड मोबाईल असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात आहे.त्यामुळे सहाजिकच हे मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मोबाईलसाठी लागणारा डाटा म्हणजेच इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांची देखील संख्या मोठी आहे. परंतु ग्रामीण भागात आजही या कंपन्यांकडून अखंडीत सेवा दिली जात नसल्याचे वास्तव आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील … Read more

सोमवारपासून ‘या’ बससेवा सुरू होणार

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-सोमवार दिनांक  ७ जुन पासुन पुणे, नाशिक, औरंगाबाद ,अहमदनगर कोपरगाव, शिर्डी बस सेवा सुरु करण्यात येणार असुन प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे अवाहन श्रीरामपुर आगार प्रमुख राकेश शिवदे व प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड  यांनी केले आहे. श्रीरामपुर आगारातुन पुणे बस सेवा सुरु करण्यात आली असून त्यास मिळालेला प्रतिसाद … Read more

मारुती मंदिराजवळ मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- सोनई येथील कौतुकी नदीपात्रातील मारुती मंदिर परीसरात काल सकाळी दत्तू किसन शिंदे वय ४० याचा मृतदेह सापडल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी भेट देवून पाहणी केली. नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात शिंदे यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या खबर नुसार सोनई … Read more

चांगल्या पावसाचे संकेत, कपाशी, बाजरी, मका आणि मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- यंदाच्या वर्षी राहुरी तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्यांचे नियोजन कृषी विभागाकडून केले जात आहे. या वर्षी पावसाचे चांगले संकेत असल्याने कपाशी, बाजरी, मका आणि मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील १७ गावे खरिपाची मानली जातात. खरिपाचे १८ ते २० हजार हेक्टर क्षेत्र असले … Read more

साई संस्थानचे कोविड सेंटर ठरतेय रुग्णांना वरदान

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील श्री साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे १५० बेडचे ६० डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सुरु करण्यात आलेले कोविड सेंटर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. येथे सुमारे ८०० रुग्ण उपचार घेऊन … Read more

आम्ही पोलीस आहोत असे सांगायचे आणि दरोडा घालायचे ! आता अखेर….

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- पोलिस बतावणी करून दरोडा घालणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. तौफिक सत्तार शेख, साजिद खालिद मलिक उर्फ मनुधून व जावेद मुक्तार कुरेशी (तिघे रा. श्रीरामपूर), आरबाज जाकिर मन्सूर उर्फ पिंजारी व शाम भाऊराव साळुंखे अशा पाचजणांना जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९१४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाळाचे अपहरण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-पतीकडून होणाऱ्या रोजच्या मारहाणीला कंटाळून तक्रार देण्यासाठी विवाहिता पोलीस ठाण्यात गेली असता, तिच्या १३ महिन्यांच्या बाळाचे पती, सासू व दिर यांनी अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की शिर्डीच्या द्वारकानगर येथील पूनम रतन धिवर या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी दि. ४ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हनी ट्रॅप प्रकरणात एक आरोपीला झाली अटक !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-नगर तालुक्यातील जखणगाव येथे घडलेल्या तीन कोटी रुपयांच्या हनी ट्रॅप प्रकरणाच्या संदर्भात फरार असलेल्या आरोपी महेश बागले (रा. नालेगाव) याला आज नगर तालुका पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले आहे. दरम्यान नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणाचे 2 गुन्हे या अगोदरच दाखल आहेत. त्यातील हा आरोपी मिळून आला असून, … Read more