अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या गेल्या चोवीस तासांतील अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1326 रुग्ण आढळले आहेत, नगर शहरासह सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आता कमी होत आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

पदोन्नती झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांचा गौरव

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- सामाजिक संस्थांनी शासनाचे प्रकल्प पारदर्शकतेने राबवावे. शासनाच्या योजनांचा लाभ खर्‍या अर्थाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी शासन आणि समाज यांचा दुवा म्हणून सामाजिक संस्थांनी कार्य केल्यास शासनाच्या योजना यशस्वी होणार आहेत. जय असोसिएशन ऑन एनजीओ महाराष्ट्र राज्य संलग्न संस्था अतिशय कृतिशीलपणे समाजाच्या तळागाळा पर्यंत जाऊन कार्य करीत असल्याचे … Read more

मुख्य कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको…

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- शेतकरी, व्यापारी व हमाल-माथाडींचे नुकसान होत असल्याने शहरातील कोठी येथील मुख्य कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. मुख्य बाजार समिती सुरु करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती राजकीय दडपणाखाली निर्णय घेत असल्याचा आरोप करुन, … Read more

सख्खा भाऊ व पुतण्यांनी केली कुऱ्हाडीने मारहाण, पती-पत्नी गंंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :-  अकोले तालुक्यात सख्ख्या भावाने भावाला आणि त्याच्या पत्नीला कुऱ्हाड आणि लोखंडी गजाने मारहाण केली. ही घटना बुधवारी सकाळी पिंपळगाव खांड येथील शेरेवाडी शिवारात घडली. याबाबत अकोले पोलिस ठाण्यात मच्छिंद्र तानाजी शेळके यांच्या फिर्यादीवरून चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीत मच्छिंद्र तानाजी शेटे आणि त्यांची पत्नी मनीषा … Read more

पोलीस कर्मचारी शरीर सुखाची मागणी करत असल्याची महिलेची तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- अकोले तालुक्यातील एका पोलीस कर्मचार्‍याच्या जाचास कंटाळून तक्रारदार ग्रामस्थ व महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. सदर पोलीस कर्मचारी आरोपींना पाठीशी घालून खोटे गुन्हे दाखल करीत आहे. तर महिलेने शरीर सुखाची मागणी होत असल्याचा धक्कादायक आरोप सदर पोलीस कर्मचारी विरोधात केला आहे. या पोलीस कर्मचारीचे तात्काळ निलंबन करण्याच्या मागणीचे … Read more

भाईचा बड्डे वाजले बारा ! मुकुंदनगर लसीकरण केंद्रातही वाढदिवस साजरा !

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :-  अहमदनगर शहरात सध्या लसीकरण वादात आहे, एक कोरोना संकटात शहरातील नागरिकांचे कोरोना लसीकरण ‘राजकारणात’ सापडले आहे, आणि आरोप – प्रत्यारोप होत आहेत. चक्क भाजपाच्या शहराध्यक्ष यांच्या मुलांनी लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा केला आहे त्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत.  मनसेचे नितीन भुतारे यांनी हा प्रकार उघडीस … Read more

जुन्या मार्केट यार्ड मधील भाजी, फळ बाजारासह कापड बाजार सुरू करण्याची काँग्रेसची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने, भाजी विक्रेते यांना प्रशासनाने मुभा दिली आहे. मात्र जुने मार्केट यार्ड, कापड बाजार आणि शहराच्या सर्व भागांमध्ये असणारे नॉन इसेन्शियल गटामध्ये मोडणारे व्यवसायिक यांना देखील दिलासा मिळणे गरजेचे आहे. याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना बाजार खुले करण्यासंदर्भात मागणी करणारे निवेदन … Read more

केंद्र सरकारची ‘ती’ योजना पुन्हा झाली कार्यान्वित!

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- दुर्गम भागातील शेतकरी व सर्व सर्वसामान्य जनतेसाठी लाभदायक ठरलेली. मात्र लाभार्थिंचा उद्दीष्ट कोटा पूर्ण झाल्याने मध्यंतरीच्या काळात ठप्प झालेली प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भाग चूल विरहित करण्यासाठी प्रयत्न केले जात … Read more

नगरला लसीकरण केंद्रात पुन्हा वाढदिवसाचा धूम धडाका

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे सावट कायम आहे. यातच जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत गंभीर बनली असल्याने जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले. मात्र आता खुद्द सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना नियमांचा विसर पडला असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. म्हणून सध्या शहरात वाढदिवस पार्ट्या जोरदार रंगू लागल्या आहेत. करोनाच्या गंभीर परिस्थितीत … Read more

लाईटची डीपी बसवण्याच्या कारणावरून तिघांना शिवीगाळ करत बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :-लाईटची डीपी बसवण्याच्या कारणावरून तिघांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली असल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली आहे. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात उपसरपंचासह एक जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान उपसरपंच वरखडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून राजकीय सूडापोटी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. … Read more

करोनामुक्त गाव मोहीम जोरात… या तालुक्यात 17 गावांची करोनावर मात

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. यातच बाधितांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने आता काही ठिकाणी कोविड सेंटर देखील पुन्हा बंद करण्यात येऊ लागले आहे. यातच जिल्ह्यात सध्या कोरोनामुक्त गाव मोहीम राबवण्यात येत आहे. याला चांगला प्रतिसाद ग्रामीण पातळीवर मिळतो आहे. नुकतेच राहाता तालुक्यात 17 गावांनी … Read more

खाकीवर जिथे घडला हल्ला तिथेच पुन्हा धमकी…संगमनेरात चाललंय काय?

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी संगमनेरात घडली होती. या घटनेतील आरोपींचा धरपकड सुरु असतानाच पुन्हा एक अत्यंत गंभीर प्रकार घडला आहे. आता पुन्हा याच परिसरात अज्ञात 3 व्यक्तींनी पोलिसांना पुन्हा धमकी दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस कॉन्स्टेबल … Read more

यंदा जिल्ह्यात पाणीच पाणी…चांगल्या पर्जन्यमानाचा हवामान विभागाचा अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली. याच वेळी ते म्हणाले कि, या दरम्यान नगर जिल्ह्यात 98 टक्के पावसाची शक्यता आहे. यामुळे यंदाच्या वर्षीही नगर जिल्ह्यात पर्जन्यमानाची चांगली शक्यता आहे. महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस होण्याची … Read more

सराफ व्यापारी खुनापाठोपाठ महिलेच्या खुनाचाही उलगडा; पोलिसांकडून आरोपी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- शिरूर येथील सराफा व्यापारी विशाल कुलथे ( वय- 24 ) यांंच्या खून प्रकरणातील मास्टरमाइंड ज्ञानेश्वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड ( वय – 22 , रा . भातकुडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर ) याला मंगळवारी ( दि .1 ) नाशिक येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. शिरुर कासार येथील सराफ व्यावसायीक … Read more

संगमनेरातील सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या आत

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- गेल्या 24 तासात श्रीरामपूर तालुक्यात 57 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कालअखेर 932 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 217 होती. जिल्हा रुग्णालयात 03 खासगी रुग्णालयात 28 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 26 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात … Read more

दुचाकीच्या सायकलच्या एकजण ठार तर एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- भरधाव वेगातील दोन मोटारसायकलच्या समोरा-समोर झालेल्या भिषण अपघातात एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना – नेवासा- शेवगाव राज्यमार्गावरील भानसहिवरे शिवारात असलेल्या हॉटेल जयराज नजिक घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, या अपघातातील मोटारसायकलवरील कांतिलाल बन्सी भणगे (वय 46) रा. भानसहिवरे (ता.नेवासा) हे या अपघातात जागीच … Read more

तीन घरांवर चोरट्यांचा डल्ला; 5 तोळे सोन्यासह 10 हजार केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कोरोनाचा काळ सुरु असून जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यातच या काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. नुकतेच राहाता तालुक्यातील रूई हद्दीत चोरट्यांनी रुई-सावळीविहीर रस्त्यावर असणार्‍या म्हसोबा मंदिर नजीक तीन घरांवर घरफोडी करत 5 तोळे सोन्यासह रोख दहा हजार रुपये लंपास केले आहे. याबाबत … Read more

प्रतिक्रिया पडली महागात; लिपिक कर्मचाऱ्याला दिले साफसफाईचे काम

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- संस्थानच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी असलेल्या विठ्ठल पवार यांनी कामगार नेते असल्याने काही दिवसांपूर्वी साईबांबा संस्थानमधील कामगारांना करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लसीकरण, राखीव बेड, नैसर्गिक विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे अशी प्रतिक्रिया संस्थान प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता लोकल चॅनेलला दिली होती. त्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पवार यांना … Read more