कोरोनाने 24 वर्षीय युवकाचे निधन वडिलांच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- शेंडी (ता. नगर) येथील संदेश ससाणे याचे वयाच्या 24 व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. त्याला तीन बहिणी असून, एक बहिण दिव्यांग आहे. घरातील कर्ता मुलगा गेल्याने सदर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मयत मुलाचे वडिल बाळासाहेब ससाणे यांना देखील कोरोनाची बाधा झाली असून, ते शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार … Read more

वर्चुअल चित्रकला स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांसह युवकांना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- शहरातील लायन्स क्लब अहमदनगर प्राइड तर्फे शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींसाठी वर्चुअल (ऑनलाईन) चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या चित्रकला स्पर्धेचे प्रत्यक्ष आयोजन करण्यात येते, परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही स्पर्धा वर्चुअल घेण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. पायल धूत, सचिव … Read more

लोकप्रतिनिधींच्या एक पाऊल पुढे जाऊन लंगर सेवेने सर्वसामान्यांना मदत दिली -खा.डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या संकटकाळात घर घर लंगरसेवेने दिलेले निस्वार्थ योगदान कौतुकास्पद आहे. या संकटकाळात गरजूंना लंगर सेवेचा आधार मिळाल्याने संकटाची भीषणता कमी होण्यास मदत झाली. निस्वार्थ देवा देण्यासाठी मोठे मन लागते. मोठ्या मनाने सर्व देवादार योगदान देत आहे. लोकप्रतिनिधींच्या एक पाऊल पुढे जाऊन लंगर सेवेने सर्वसामान्यांना विविध प्रकारची मदत दिली. … Read more

भाजीपाला विभाग 1 जून पासून पुर्ववत सुरू करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- दीड महिन्यापासून बंद असलेला कोठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य भाजीपाला विभाग मंगळवार दि.1 जून पासून पुर्ववत सुरू करण्याची मागणी अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. सदर मुख्य भाजीपाला विभाग सुरु न केल्यास … Read more

जुगार खेळणाऱ्या ११ जणांना रंगेहात पकडले

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-  अकोले येथे कॉन्स्टेबल विठ्ठल शरमाळे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने गुरुवारी कोतूळ येथे छापा टाकून मटका, जुगार खेळणाऱ्या ११ जणांना रंगेहात पकडले. सार्वजनिक मुतारीच्या आडोशाला हसन उस्मान अत्तार, रोहिदास भिमा कचरे, सुरेश विष्णू खंडवे, भाऊसाहेब भिमा मधे, पप्पू पिनाजी खंडवे, बारकू बाळू पारधी, संपत दगडू बुरके, सुधाकर महादू देशमुख, … Read more

देशातील लोक सात वर्षांपासून १५ लाख रुपयांची वाट बघताहेत…

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- यास चक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना मोठा फटका बसला आहे. तर वादळामुळे झालेल्या नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई पाहणी केली. मात्र, त्यानंतर झालेल्या मोदी यांच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशिराने पोहोचल्या. त्यामुळे पंतप्रधानांना वाट बघावी लागली. त्यानंतर ममतांना झालेल्या विलंबावरून भाजपा नेत्यांनी … Read more

संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका विचारात घेऊन लहान मुलांवरील उपचारांसाठी शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत अद्ययावत कोविड सेंटर सुरू करावे. नगरपालिकेने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली. कोपरगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीची कोल्हे … Read more

नगर शहरात आमदार संग्राम जगतापांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचेही राजकारण होत नाही…

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय देशाचे राजकारण होत नाही, त्याप्रमाणे नगर शहरात आमदार संग्राम जगतापांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचेही राजकारण होत नाही. आमदारकीला त्यांचा पराभव झाला, ते नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नाहीत. त्यासाठी काम करावे लागते, पण यांनी फक्त काड्या केल्या, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे … Read more

कांद्याचे लिलाव त्वरित सुरू करा !

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोना लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद आहेत. राज्यभरात मात्र लिलाव सुरु आहेत. पावसाळ्यात कांदा साठवण क्षमता नसल्याने तो पूर्ण खराब होण्यापूर्वीच विकणे गरजेचे आहे. त्यामुळे बाजार समितीने लिलाव तत्काळ सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यासंदर्भात अगस्ती कारखान्याचे संचालक महेश नवले, शिवसेना नेते प्रदिप हासे, शेतकरी अतुल लोहोटे, … Read more

उसने पैसे परत मागणाऱ्याचाच केला गेम ! न्यायालयाने आरोपीस दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- दैनंदिन जीवनात आपण अनेकवेळा एकमेकांना मदत करतो व इतरांची देखील मदत घेतो. यात अनेकदाआपण पैसेही देतो अथवा घेतो. यात अनेकदा वादविवाद देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र उसने घेतलेले ५०० रुपये वारंवार परत मागितल्याच्या कारणावरून एकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे . बसवराज (वय … Read more

पहिल्या लाटेत ‘हॉटस्पॉट’ तर दुसर्‍या लाटेत ‘कोरोनामुक्त’

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- सध्या काश्मीरमधील हिरपोरा हे गाव पहिल्या लाटेत कोविड हॉटस्पॉट होते. श्रीनगरपासून ६२ कि.मी. अंतरावर असलेल्या काश्मीर खोऱ्यातील हेच  गाव, जे दुसर्‍या लाटेत कोरोनामुक्त असलेले एकमेव गाव आहे. कारण या खेड्यातील लोकांनी सर्व काही सरकारवर सोडून दिले नव्हते. तर या लोकांनी ही लढाई स्वबळावर लढविली आणि शंभर टक्के लस घेऊन … Read more

अरे बापरे! ‘या’ शहराला  म्युकर मायकोसिसचा विळखा एकाच दिवसात वाढले पावणेदोनशे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अद्याप कोरोनाच्या संकटातून नागरिक पुरते सावरत नाहीत तोच म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने आता धुमाकूळ घातला आहे . आतापर्यंत बोटावर मोजण्याइतपत असलेली रुग्ण संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे . औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु आता म्युकर मायकोसिसचा घट्ट विळखा पाहता औरंगाबादमधील नागरिकांच्या … Read more

दुधाला ३२ रुपये दर द्या; अथवा १० रुपये अनुदान द्या!

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने राज्य सरकारने राज्यात तात्काळ टाळेबंदी लागु केली. टाळेबंदीने दुधाची मागणी घटली, परिणामी दुधाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे दुधाला प्रति लीटर ३२ रुपये दर द्या किंवा दुध उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर थेट … Read more

अण्णा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात: ‘या’आमदाराचे काम देशासाठी दिशादर्शक!

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- देशात अनेक आमदार आहेत, मात्र आमदार लंके यांच्यासारख्या सर्वसामान्यांच्या सेवेसाठी २४ तास वाहून घेणारा लोकप्रतिधी विरळाच. मानवसेवा हीच माधवसेवा आहे. या भावनेतून कोरोना संकटकाळात आ. लंके करीत असलेले काम केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्शवत, दिशादर्शक आहेत. तळागाळातील दीननदुबळ्यांची सेवा करण्यासाठी आमदार लंके यांना १०५ वर्षे दिर्घायुष्य लाभावे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! अंगणात झोपलेल्या माय – लेकरांना वाळू तस्करांनी गाडी घालून जखमी केले

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अंगणात झोपलेल्या माय – लेकरावर तस्कराने वाळू वाहतूक करणारी गाडी घालून जखमी केले आहे. हि धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर परिसरात घडली आहे. याबाबत जखमी महिला सुनीता सुनील पवार (वय 30) हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत फिर्यादीने म्हंटले आहे … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील बाधितांच्या आकड्यात होतेय घट

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नगर जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. यामुळे दरदिवशी जिल्ह्यात बाधितांची संख्येंचा विक्रमी आकडा दिसून येत होता. मात्र आता काहीशी दिलासादायक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. दुसऱ्या लाटेत अत्यंत सक्रिय झालेला कोरोनाचा विषाणू आता हळूहळू जिल्ह्यातून काढता पाय घेत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होऊ लागले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी … Read more

अकरा जुगाऱ्यांसह दोन अवैध दारू विक्रेत्यांना अकोले पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-अकोले पोलिसांनी तालुक्यातील कोतुळ येथे कल्याण मटका खेळताना छापा मारून 22 हजार 200 रुपये मुद्देमालासह 11 जणांना ताब्यात घेतले तर टाहाकारी व निळवंडे येथे अवैद्य दारु विक्री करताना दोघांना 1800 रूपयांच्या मुद्देमालासह अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक महिती अशी की, गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली कि, … Read more

पाण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक; मुख्याधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. एवढेच काय तर जिल्ह्याती धरणे, तलाव , नद्या, बंधारे आदी तुडुंब भरून वाहिले. एवढे सगळं असताना जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नेवासा शहरातील सावतानगर उपनगरातील नगरपंचायतीच्या पाईपलाईनवर … Read more