‘उधार घ्या किंवा चोरी करा पण ऑक्सिजन आणा, आम्ही रुग्णांना मरताना बघू शकत नाही’

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- तुम्ही कोणासमोरही गयावया करा, उधार घ्या किंवा चोरी करा पण दिल्लीत कुठूनही ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना अशाप्रकारे मरताना बघू शकत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला फटकारले. या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या खासगी … Read more

कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक : भारतात एका दिवसांत वाढले तब्बल तीन लाखापेक्षा जास्त रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- देशभरात बुधवारी तीन लाख १५ हजार ६६० नवे रुग्ण नोंदवले गेले. हा जागतिक पातळीवरचा एक दिवसातील रुग्णवाढीचा उच्चांक आहे. कोरोनामुळे २०९१ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही एका दिवशी नवी रुग्णवाढ एका लाखाच्या पुढे गेली नव्हती. कोणत्याही देशात एकाच दिवसात इतकी रुग्णवाढ नोंदवण्यात आलेली नाही. देशात कोरोनाबाधितांची एकूण … Read more

महसूलमंत्री थोरातांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणार

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोनाची वाढती रुग्ण संख्या व गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून लोहारे येथील ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रास पेसोकडून तातडीची मान्यता मिळवून दिल्याने दररोज नव्याने सातशे ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध होणार आहे. थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, भाऊराव जोंधळे, डॉ. … Read more

राजकीय वर्तुळात वादळ : आमदार लहामटेंनी माफी मागावी !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- पंचायत समिती सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर यांनी जाणीवपूर्वक धुडगूस घातला. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासमोर त्यांचा कार्यकर्ता महसूल मंत्र्यांबरोबर सभागृहात अशोभनीय कृत्य करतो, तरीदेखील आमदार काहीच हरकत घेत नसतील, तर त्याचा बोलविता … Read more

गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनामुळे पाचशे जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण पाचशे जणांचा बळी गेला आहे. फेब्रुवारीमध्ये ४८, मार्चमध्ये १२२, तर १७ एप्रिलपर्यंत १७०, असे मृत्यू झाले आहेत. त्यानंतर पोर्टलवर १०२ जणांचा मृत्यू दाखविण्यात आला. त्यामुळे तीन महिन्यांत तब्बल पाचशे जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात ज्येष्ठ … Read more

भयानक ! केवळ 48 तासात सव्वाशे रुग्ण पोहचले अमरधाममध्ये

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-इंजेक्शन तुटवडा, बेड उपलब्ध नाही, ऑक्सिजन मिळत नाही, अपुरी आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय सुविधांचा आभाव यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे मृत्यू तांडव अद्यापही कायम आहे. यातच हे तांडव विस्तृतपणे विखुरले जात असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात तब्बल 125 रुग्णांचा अंत्यविधी अमरधाममध्ये पार पडल्याचे भयानक तथा विदारक दृश्य समोर … Read more

नागरिकांची बेफिकीरी; प्रशासनाने वसूल केला दीड कोटींचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-कोरोनाविषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार संचारबंदी उल्लंघन, विनामास्क, सुरक्षित अंतर न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मंगल कार्यालयमध्ये नियमांचे उल्लंघन अशा 90 हजार 249 केसेस करून 1 कोटी 52 लाख 24 हजार 317 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यां 26 हजार 856 जणांवर गुन्हे … Read more

शिवसेना खासदारांवर गुन्हा दाखल; नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू असताना नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार लोखंडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खासदार सदाशिव लोखंडे, नानासाहेब शेळके, अण्णासाहेब वाघे, श्रीकांत मापारी, सोमनाथ … Read more

धक्कादायक ! ऑक्सिजन अभावी दोन रुग्ण दगावले

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोनाने राज्यासह जिल्ह्याला घट्ट विळखा घातला आहे. अनेक कठोर निर्बंध करून देखील कोरोनाची आकडेवारी कमी करण्यात प्रशासनाला यश येत नसल्याचे दिसून येत आहे. यातच रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यात देखील प्रशासन अपयशी ठरते आहे. यामुळे दरदिवशी अनेक रुग्णांचे बळी जात आहे. नुकतेच श्रीगोंदा येथील ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन अभावी दोघांचा … Read more

जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरुच

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविरच्या इंजेक्शनची काळाबाजारी मोठ्या प्रमाणात होत आहे. करोना रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात प्रशासनाकडून कारवाया करण्यात येत आहे मात्र तरी देखील हा काळाबाजार सुरुच असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहे. नुकतेच जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये इंजेक्शनमध्ये पाणी भरून त्याची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी सापळा रचून ताब्यात … Read more

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी इंजेक्शनसाठा राखीव ठेवा; खासदार विखेंना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाहू लागला आहे . तसेच वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच अनेकांचे प्राण देखील यामुळे जात असल्याचे दिसून येत आहे. यातच जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे कामगार संघटनेने खासदार सुजय विखे यांच्याकडे एक विशेष मागणी केली आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी अहमदनगरसाठी आणलेल्या … Read more

दोन नेत्यात जमिनीच्या वादातून झाले असे काही… तालुक्यात उडाली खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका मोठ्या गावात शेतीच्या कारणावरून दोन प्रतिष्ठित गाव नेत्यांमध्ये शाब्दिक वादाबरोबरच चांगलीच झोंबाझोंबी झाल्याचे वृत्त आहे. दोघेही राहुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडून आहेत. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यातील एक नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती नातेवाईक असून … Read more

ऑक्सीजनअभावी रूग्णाचा मृत्यू झाल्यास प्रशासनच जबाबदार राहील

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-कठीण काळात एकमेकांशी समन्वय ठेवून मार्ग काढण्याची गरज असताना वैैद्यकीय क्षेत्र आणि प्रशासनात वादाच्या ठिणग्या झडण्याची चिन्हे आहेत. ऑक्सीजनची व्यवस्था स्वत:च करा, असा सल्ला देणार्‍या जिल्हा प्रशासनाने ‘ऑक्सीजनअभावी रूग्णाचा मृत्यू झाल्यास प्रशासनच जबाबदार राहील’ असे स्पष्टपणे कळविले आहे. पळपुटेपणा करू नका, जबाबदारी घ्या असाच अप्रत्यक्ष सल्ला दिल्याचे मानले जात … Read more

लॉकडाउन होणारच पण जिल्हाबंदी होणार कि नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या वाढतच असल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

जेव्हा नामदार बाळासाहेब थोरातांना राग येतो…

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अकोले तालुक्यात रविवारी (१८ एप्रिल २०२१) झालेल्या कोरोना आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने चांगलाच गोंधळ घातल्याची घटना बघायला मिळाली. बैठकीत मंत्री बाळासाहेब थोरात नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत असताना राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याने मोठ्या आवाजात प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून बैठकीत … Read more

चक्क मटणाच्या वाटयावरून झाले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- गावामध्ये सामुहिक कापलेल्या बोकडाचा वाटा करण्यावरून झालेल्या वादात दोन गट एकमेकांवर भिडले.दोन्ही गटामध्ये काठ्या, कुर्‍हाडी, दगडाने झालेल्या हाणामार्‍यात आठ जण जखमी झाले आहेत. नगर तालुक्यातील बाळेवाडी गावामध्ये ही घटना घडली. दोन्ही गटाने नगर तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मंगल बाबासाहेब पालवे … Read more

जिल्ह्यातील चिंताजनक बातमी : कोरोनाग्रस्त तरुणाने असे संपविले …

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- नेवासे तालुक्यातील भेंडा येथील शासकीत कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील गणेश दिनकर करांडे (वय 40 वर्षे) या करोनाग्रस्त तरुणाने भेंडा येथील शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, 21 एप्रिल रोजी दुपारी घडली. भेंडा येथील 3 मजली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खासदारावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- उत्तर नगर जिल्हयातील निळवंडेच्या कालव्यांचे पिंप्री निर्मळ शिवारात खा.सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झाले,मात्र करोना संकट काळामुळे राज्यात संचारबंदी व साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कृती समितीच्या अकरा जणांवर गुन्हे दाखल झाले. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या पन्नास वर्षांपासून … Read more