अरेरे! आईच्या निधनाची बातमी समजताच मुलानेही सोडले प्राण

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-आजकाल आईवडीलांचा सांभाळ न करणारे अनेकजण पाहायला मिळतात मात्र आईचा मृत्यू झाल्याचे समजताच देहत्याग करणारे देखील असल्याचे समोर आले आहे. नेवासा तालुक्यातील चांदा येथे अशीच समाजमन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. चांदा येथील यशोदाबाई भानुदास दहातोंडे (६५) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने चौदा एप्रिल रोजी निधन झाले. त्यांचा मुलगा शिवाजी … Read more

दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत – पालकमंत्री छगन भुजबळ

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-कोरोनाचा फैलाव वाढत असताना या संकटाशी एकजुटीने लढा दिला जात असताना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला असून ही घटना अतिशय दुर्दैवी असुन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झाले, दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अशा भावना राज्याचे अन्न, नागरी … Read more

आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण, जर बेपर्वाई झाली असेल तर त्यांना कडक शासन व्हायलाच हवे

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं, असे ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील शोक व्यक्त केला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार रेमडेसिविर इंजेक्शनमध्ये पाणी भरून त्याची विक्री …

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीस आले आहेत. सध्या राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याची परिस्थिती सर्वत्र दिसत आहेत. मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नगरसह अनेक भागांत याप्रकरणी अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये इंजेक्शनमध्ये पाणी भरून त्याची विक्री … Read more

कर्तव्यनिष्ठेला सलाम : गर्भवती असूनही डीएसपी महिला बजावतेय कर्तव्य!

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत छत्तीसगडमध्ये हाहाकार उडाला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जात असताना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. या कठिण काळात बस्तर जिल्ह्यातील दंतेवाडा येथील पाच महिन्यांची गर्भवती असणाऱ्या डीएसपी शिल्पा साहू या हातात लाठी घेऊन रस्त्यावर उतरल्या आहेत. भर उन्हात रस्त्यावर उतरुन कर्तव्य बजावणाऱ्या या डीएसपी शिल्पा साहू … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २३८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २१ हजार ६२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३११७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

ऑक्सिजन गळती : दोषींना शिक्षा करणार

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशी करून दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरू राहील, याची दक्षता घेऊ, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. नाशिक महापालिकेच्या … Read more

नगर जिल्‍ह्यातील ऑक्‍सीजन संपल्‍यानंतरही तीन मंत्र्यांची कर्तबगारी शुन्‍यच

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  महाभकास आघाडी सरकारचे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन पुर्णपणे कोलमडले आहे. कुठल्‍याही यंत्रणेवर सरकारचे नियंत्रण राहीलेले नाही. सरकारचा टास्‍कफोर्स करतोय काय? असा सवाल उपस्थित करतानाच नगर जिल्‍ह्यातील ऑक्‍सीजन संपल्‍यानंतरही तीन मंत्र्यांची कर्तबगारी शुन्‍यच दिसली. पालकमंत्र्यांनाही जिल्‍ह्यातील गंभिर परिस्थितीपेक्षा गोकुळ दूध संघाची निवडणूक महत्‍वाची वाटत असल्‍याची घणाघाती टिका भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे … Read more

कोव्‍हीड केअर सेंटर मधील रुग्‍णांना विखे पाटील परिवाराच्‍या वतीने आज पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  रामनवमीचे औचित्‍य साधुन शिर्डी येथील कोव्‍हीड केअर सेंटर मधील रुग्‍णांना विखे पाटील परिवाराच्‍या वतीने आज पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण देण्‍यात आले. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्‍वत: उपस्थित राहुन रुग्‍णांच्‍या आरोग्‍याची विचारपुस केली. शिर्डीच्‍या दृष्‍टीने रामनवमी उत्‍सवाचे महत्‍व खुप मोठे आहे. कोव्‍हीड संकटामुळे सलग दुस-यावर्षी शिर्डीतील रामनवमी उत्‍सव … Read more

नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना दुर्दैवी; मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोना संकटाशी लढत असताना … Read more

गुंड गजा मारणेला मदत करणे पडले महागात माजी खासरादाराची तुरूंगात रवानगी

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कारागृहातून सुटल्यानंतर तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत गुंड गजा मारणे याने मोठी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीला मदत करण्याऱ्या भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांना पुण्याच्या गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत गुंड गजा मारणे मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत जवळपास … Read more

आता ऑक्सिजन टँकरला असेल ‘यांचे’ सुरक्षा कवच!

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  आतापर्यंत आपण महत्त्वाच्या व्यक्ती किंवा पुढाऱ्यांना, गोपनीय वस्तू यांना पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येत असल्याचे पाहिले आहे. परंतु आता चक्क टँकरला असाच बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचे कारण तो टँकर ऑक्सिजनचा आहे.त्याचे झाले असे की, मंगळवारी नगर जिल्ह्यासाठी येणारा ऑक्सिजनचा टॅंकर पुणे जिल्ह्यात अडवण्यात आला होता.  मात्र महत्प्रयासाने … Read more

महाराष्ट्र शोकमग्न आहे! —मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना … Read more

अखेर जिंकून घेतले मरणाने : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  संपूर्ण राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणव आहेत. मात्र नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्यामुळे २२ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील दारु पिणाऱ्यासाठी खुशखबर !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- जिल्ह्यातील परवानाधारक दारू विक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोहोच मद्य विक्री करण्यास तसेच देशी, विदेशी मद्यांच्या ठोक विक्रेत्यांना मद्य पुरवठा करण्यासाठी सकाळी 7 ते 11 ही वेळ बंधनकारक करण्यात आल्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी काढले आहेत. जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने … Read more

कुटुंबीयांच्या निरोगी अरोग्यासाठी कोरोना लसीकरण आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी निमगाव वाघा व नेप्ती येथील दीडशे ग्रामस्थांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. आरोग्य पर्यवेक्षक राहुल कोतकर यांनी कोरोना लसीचा लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सचिन कळमकर, ग्रामपंचायत … Read more

कोरोनाचे संक्रमण वाढत असताना पोलीस प्रशासनास एन 95 मास्कचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- कोरोना महामारीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या पोलीस प्रशासनास शेवगाव, पाथर्डीचे नेते अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांच्या वतीने एन 95 मास्कचे वाटप करण्यात आले. काकडे यांच्या वतीने तुकाराम विघ्ने यांनी एन 95 मास्क स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पो.नि. अनिल कटके, कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.नि. राकेश मानगावकर, नगर तालुका पोलीस स्टेशनचे … Read more

टाळेबंदीत सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवून उत्तम काम केल्याबद्दल भिंगारला पोलीस उपनिरीक्षकाचा नागरी सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- टाळेबंदीत नियम मोडणार्‍यांवर कारवाई करणारे पोलीस व सर्वसामान्य नागरिकांमध्ये खटके उडतानाचे चित्र पहावयास मिळते. मात्र टाळेबंदीत नागरिकांचे समुपदेशन करुन त्यांचे प्रश्‍न हाताळणार्‍या अधिकार्‍याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल भिंगार येथील नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय ज्ञानदेव पोटे यांचा सन्मान केला. यावेळी सुमित गुप्ता, आदेश शिरसाठ, अशोक शिंदे, कुणालसिंग चव्हाण, नितीन सोले आदी … Read more