एअरटेल धमाका ! आयपीएलचा प्रत्येक सामना 52 दिवसांपर्यंत फ्रीमध्ये पहा ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 14 व्या सत्राचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. टूर्नामेंटची सुरुवात 9 एप्रिलपासून मुंबई इंडियन्स आणि बेंगळुरू यांच्या सामन्याने सुरु होईल. हा सामना चेन्नईत रंगणार आहे. अंतिम सामना 30 मे 2021 रोजी मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. दरम्यान, … Read more

1 आठवड्यात कमावले 2 लाख कोटी , जाणून घ्या कोठे मिळाला इतका फायदा

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  गेल्या आठवड्यात शेवटचे दिवस वगळता शेअर बाजारामध्ये तेजी दिसून आली. याचा परिणाम म्हणून बीएसई सेन्सेक्सच्या पहिल्या 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1.94 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदली गेली. सर्वाधिक कमाई करणारी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) आहे. रिलायन्सची मार्केट कॅप 60,034.51 कोटी रुपयांनी वाढून 13,81,078.86 कोटी रुपये झाली आहे. … Read more

क्रिकेटचे मैदान देखील महिलांनी गाजवले

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- नगर क्लबच्या मैदानावर सुरु असलेल्या पीपीएल क्रिकेट स्पर्धेत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा क्रिकेट सामना रंगला होता. पंजाबी सुपर क्वीन्स विरुध्द रॉकिंग ब्ल्यूस या महिलांच्या संघात झालेल्या सामन्यात पंजाबी सुपर क्वीन्स संघाने विजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत क्रिकेटचे मैदान देखील महिलांनी गाजवले. पंजाबी युथ ऑर्गनायझेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त विशेष … Read more

संतापजनक : विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून शाळेतच बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने शाळेतच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, नराधम मुख्याध्यापकाच्या महाबळेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनीच विद्यार्थिनीवर होत असल्याच्या अत्याचाराच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील इतके शेतकरी झाले थकबाकीमुक्त !

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. या अिभयानांतर्गत जिल्ह्यातील १ लाख ३ हजार ७२० शेतकऱ्यांनी ६४ कोटी ६४ लाख रुपयांचा वीज बिलाचा भरणा करून थकबाकीमुक्त झाले आहेत. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद वाढत आहे. या योजनेंतर्गत महाविकास … Read more

कंटेनरच्या धडकेत वृद्ध जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  कोल्हार येथील बस स्थानकासमोर कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातात बबन अण्णासाहेब लेंडे (वय ७४) हे जागीच ठार झाले. ही दुर्घटना सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर चालक फरार झाला आहे. मृत लेंडे हे आपल्या वाहनाने (एमएच १७ डी ४७६५) कोल्हार बसस्थानकासमोरून जात होते. यावेळी मालट्रक (एचआर ५५ ए एच … Read more

रोहित पवार म्हणाले ‘अमृता ताई, अशीच आवड जोपासा…’

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याचा छंद आहे. आपली नोकरी सांभाळत त्यांनी आपली गाण्याची आवड जोपासली आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. कधी याच गाण्यांमुळे ट्रोल झालेल्या अमृता फडणवीसांना रोहित पवारांनी कौतुक केले आहे. अमृता फडणवीस यांनी महिला दिनाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर … Read more

नवनिर्वाचीत उपसरपंच व तलाठ्यांमध्ये ढिशुम ढिशुम…

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  गाव पुढारी व सरकारी बाबू यांच्यामध्ये कोणत्या न कोणत्या कारणावरून मतभेद असतातच. मात्र जिल्ह्यातील एका ठिकाणी तर एका पुढाऱ्याने चक्क तलाठ्यालाच चोप दिल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील निघोजच्या नवनिर्वाचीत उपसरपंच ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे यांनी निघोजच्या तलाठ्याला मारहान केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या बाबत तलाठी विनायक … Read more

कोविड लसीकरणावेळी आरोग्य कर्मचार्‍यांकडून ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  राज्य शासनाने कोविड 19 या महामारीची लस ज्येष्ठ नागरिक, मधुमेहाचा आजार असणार्‍यांसाठी मोफत लस उपलब्ध करुन दिली आहे. याचाच एक भाग म्हणून येथील देवळाली प्रवरा जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात काल सकाळी 11 वाजता लसीकरणासाठी नाव नोंदणी करुन सुरुवात करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी करोनाच्या मोफत … Read more

परीक्षा कशा घ्यायच्या आज होणार निर्णय…

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या महाविद्यालये बंद असून ऑनलाईन क्लासेस सुरु आहे. अशा परिस्थितीत परीक्षा कशा घ्यायचा हा प्रश्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनासमोर आहे. अशातच मंगळवारी पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत प्रथम सत्राच्या परिक्षेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न सुमारे साडे सहा लाख … Read more

म्हणूनच तुमच्या हाती बँकेची सूत्रे दिली!

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आशिया खंडातील नावाजलेली बँक आहे. बँकेचा मोठा नावलौकिक आहे. सहकारी चळवळीमध्ये व जिल्ह्याच्या आर्थिक विकासामध्ये जिल्हा बँकेचे मोठे योगदान आहे. जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार  तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या हाती जिल्हा बँकेची सूत्रे दिले आहेत. तुम्हाला बँकिंग क्षेत्राचा … Read more

अर्बन बँक फसवणूक प्रकरण : आणखी दोघेजण ताब्यात!

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत झालेल्या तब्बल २२ कोटींच्या फसवूणक प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. जयदीप वानखेडे व आशुतोष लांडगे अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्याची संख्या चार झाली आहे. याबाबत सविस्तर असे की, नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत बँकेची तब्बल २२ … Read more

‘ माजी मंत्री कर्डिले म्हणतात लस आली असली तरी काळजी घ्यावीच लागेल!

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  गेल्या वर्षभरापासून सर्वांच्याच आरोग्यासाठी धोकादायक ठरणार्‍या कोरोणावर लस आली असली तरी या कोरोणाचा प्रादुर्भाव अजूनही वाढतच असल्याने स्वतःबरोबरच सर्वांनीच आपल्या कुटुंबाची आणखी काही दिवस काळजी घेण्याची गरज आहे. असे आवाहन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले आहे. कर्डिले यांनी नुकतीच कोरोणाची लस घेतली. यावेळी डॉक्टर व इतर पदाधिकारी उपस्थित … Read more

कर्मचाऱ्यांअभावी राहुरीचे रुग्णालय आले व्हेंटिलेटरवर

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना जिल्ह्यातील काही ठिकाणच्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची पोकळी निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नुकतेच राहुरी तालुक्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयातील लॅबरेटरी विभाग कर्मचार्‍यांविना बंद असल्याने नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. … Read more

अ‍ॅक्टिव्ह पोलिसांनी चोरी गेलेली अ‍ॅक्टीवा तासाभरात सापडवली

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  कोरोनानंतर महागाई देखील झपाट्याने वाढली आहे. यातच आर्थिक चलन उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यातच दिवसाढवळ्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यात दुचाकी चोर आता सक्रिय झाले आहे. नुकतेच जामखेड शहरातील बाजारतळ येथुन चोरी गेलेली मोटारसायकल तातडीने पोलिसांनी सुत्रे फिरविल्याने … Read more

डाळिंबाची बाग पेटली; सात लाखांचा माल जाळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- आधीच कोरोना, शासनाचे बदलते धोरण तसेच आस्मानी संकट यामुळे हतबल झालेला बळीराजावरील संकटाचा पाढा सुरूच आहे. नुकत्याच एका शेतकऱ्याच्या सव्वा एकर क्षेत्रातील सुमारे 202 डाळींब झाडे आगीत जळाली आहे. हि दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील हसनाबाद (तळेगाव दिघे) शिवारात घडली आहे. अचानक आग लागून डाळींब बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे 7 … Read more

48 तासात तपास लावून हिरण कुटुंबीयाना न्याय देऊ

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  श्रीरामपूर शहरातील रहिवासी बेलापूरचे बेपत्ता झालेले व्यापारी गौतम हिरण यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. दरम्यान हिरण यांच्या मारेकऱ्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा गौतम हिरण यांच्या नातेवाईकांसह बेलापूर ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनी पवित्रा घेतल्याने परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र या घटनेतील गुन्हेगार दोन दिवसात निष्पन्न … Read more

बसला ओव्हरटेक करायला गेला अन् जीव गमावून बसला!

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- भरधाव वेगाने जाणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या शिवशाही बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात तोल सुटून बसवर आदळून झालेल्या या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर दोनजण जखमी झाले आहेत. ही घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात   घडली. याबाबत सविस्तर असे की, शिवशाही बस (क्र.एमएच १४ जीयू ०६४२) ही नाशिक -पुणे महामार्गाने पुण्याच्या … Read more