पोलिस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार ‘ही’ सुविधा !

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- पोलिस पाटील हा सरकारचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर कार्यरत असतो. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही महत्त्वाची जबाबदारी पोलिस पाटलांवर असते. दरम्यान पोलिस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कलम ३५३चे संरक्षण मिळणार आहे. कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटलांना मारहाण झाल्यास आता सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा संबंधित आरोपींविरूदध दाखल केला … Read more

पतसंस्थेत नौकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने पतसंस्थेला गंडविले

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-एका पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवलेले डिएएचयुए कंपनीचे डीव्हीआर आणि 36 हजार 870 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. दरम्यान हि चोरीची घटना केडगावातील कल्याणी पतसंस्थेत घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, केडगावातील कल्याणी पतसंस्थेत विकास आजीनाथ सदाफुले (रा. केडगाव) हा नौकरीस आहे. दरम्यान सदाफुले हा कल्याणी पतसंस्थेत नोकर … Read more

‘किंगखान’ सोबत काम केलेल्या अभिनेत्रीने 25 व्या वर्षीच सोडली सिनेसृष्टी

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार असतात, जे एखाद-दुसऱ्या चित्रपटानंतर अचानक इंडस्ट्रीपासून दूर निघून जातात. मात्र त्या एखाद-दुसऱ्या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर मिळालेली असते. अशीच एक कलाकार आहे, ती म्हणजे झनक शुक्ला. ‘कल हो ना हो’ हा बॉलिवूडमधील अभिनेत्री झनक शुक्ला आणि शाहरुख खान यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीची मोठी चर्चा झाली होती. … Read more

कोरोनाचा धोका वाढला; राजधानीत पोहचला नवा स्ट्रेन

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-मुंबईमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. आतापर्यंत ब्रिटनसह इतर देशांमध्ये हा नवा स्ट्रेन पसरल्याची माहिती समोर येत होती. पण आता मुंबईत हा नवीन स्ट्रेन दाखल झाल्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईमध्ये युकेचा नवा कोरोना स्ट्रेन आढळला असून आतापर्यंत ही रुग्णसंख्या ४ वर पोहोचली आहे. ९० नमुन्यांपैकी एका व्यक्तीच्या अहवालात … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून प्रशासनाने वसूल केले 11 लाखांचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- मागील महिन्यापासून जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या. रात्री अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास बंदी केली. मात्र तरीही विनामास्क फिरणार्या नागरिकांची संख्या वाढल्याने प्रशासनाने अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत प्रशासनाने … Read more

श्रीराम मंदिराच्या निधी संकलनावरून फडणवीसांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-उत्तरप्रदेशमधील अयोध्येत निर्माण होत असलेले श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित हिंदुत्ववादी संघटनांनी निधी संकलनास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर टीका केली होती. तर, आज (4 मार्च) पुन्हा एकदा काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधार्यानावर … Read more

‘ह्या’ भारतीयाने मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सिस्टममध्ये शोधली ‘ही’ समस्या; कंपनीने दिले 36 लाख रुपये

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-भारतीय संशोधक लक्ष्मण मुथिया यांच्यासाठी कालचा दिवस खूप खास होता. मायक्रोसॉफ्टने त्यांना 36 लाख रुपयांचा पुरस्कार दिला आहे. कंपनीने बग बाउंटी प्रोग्राम अंतर्गत हा पुरस्कार दिला आहे. मायक्रोसॉफ्टने हे पैसे लक्ष्मण यांना दिले कारण त्यांनी मायक्रोसॉफ्टमधील अशा एका समस्येचा शोध लावला जी कोणत्याही युजर्सची मायक्रोसॉफ्ट अकाउंट हॅक होऊ शकते. लक्ष्मण … Read more

मुलीचे लग्न पडले महागात; सासर व माहेरच्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- अवघ्या पंधरा वर्षांच्या मुलीचे 22 वर्षांच्या तरूणासोबत लग्न लावून देत तिच्यावर संसार लादणार्‍या आई-वडिल, सासू- सासरे, पतीसह सात जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार व बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीनेच चाईल्ड लाईनच्या मदतीने फिर्याद दाखल केली आहे. जामखेड तालुक्यातील बालविवाहाचा एक प्रकार चाइल्ड लाइन … Read more

टाटा टियागोचे नवीन वेरिएंट भारतात लॉन्च ; मिळतील ‘हे’ शानदार फीचर

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- गुरुवारी टाटा मोटर्सने स्वयंचलित मॅन्युअल ट्रांसमिशन (एएमटी) सह एन्ट्री-लेव्हल हॅचबॅक टियागो (टाटा टियागो) लाँच केली. या शानदार कारची किंमत 5.99 लाख रुपये आहे (एक्स-शोरूम दिल्ली). टाटा मोटर्सने नवीन XTA व्हेरियंट लॉन्च केल्यामुळे ऑटोमेकरकडे आता टियागो लाइन-अपमध्ये चार एएमटी वेरिएंट आहेत. नवीन टियागो एक्सटीए व्हेरिएंट एक्सटी ट्रिमवर आधारित आहे आणि त्याला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ह्या कारणामुळे कांदा कोसळला?

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी कांद्याची आवक कमी असूनदेखील कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झालेली पहायला मिळाली. मागील तिन महिन्यांपूर्वी ४० रूपये प्रतिकिलो या दराने विकाला जाणारा कांदा आता तब्बल १९रूपये प्रतिकिलोवर आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून उंच भरारी घेतलेला कांदा अत्यंत वेगाने कोसळत आहे. मात्र हा कोसळणारा दर शेतकऱ्यांच्या … Read more

बंपर ऑफर! फक्त 45 हजारांमध्ये खरेदी करा बजाज अ‍ॅव्हेंजर 220

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- पैशांअभावी आपण वाहन विकत घेऊ शकत नसल्यास आपणास काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुमच्यासाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. यात तुम्ही बजाज अ‍ॅव्हेंजर 220 बाईक केवळ 45 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही बाईक शानदार फीचर्स आणि दमदार इंजिनने सुसज्ज आहे आणि यासह आपल्याला बर्‍याच ऑफर्स मिळतील. ही बाईक … Read more

घरातील सदस्य विवाहसमारंभात व्यस्त कामगार महिलेने केले काम मस्त

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- घरातील सर्वजण लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेल्याचे तसेच इतर कामामध्ये व्यस्त असल्याची संधी साधून कामगार महिलेने घरातून तब्बल अडीच लाखांची रक्कम लंपास केली. याबाबत हर्षल नरेंद्र शेकटकर (रा.भराडगल्ली चितळेरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्पना गवळी (रा.तोफखाना) या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, येथील चितळेरोड परिसरातील व्यावसायिक शेकटकर … Read more

शिवसेनेचं खुलं आव्हान ; तर टोलनाके सुरूच करून दाखवा

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-शिर्डीतील मालमत्ता धारकांकडून नगरपंचायतचे सत्ताधारी कोविड काळातील मालमत्ता कर व पाणीपट्टी सक्तीने दंड-व्याजासह वसूल करत आहे. आता टोलनाके सुरू करण्याचा निर्णय घेऊन भक्तांकडून करवसुली करण्याचा प्रयत्न करत आहे. जर सत्ताधारी गटात हिंम्मत असेल तर टोलनाके चालु करुनच दाखवा, असे आव्हान शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी दिले आहे. शिवसेनेच्या … Read more

तुम्हाला चेकबुक हवेय ? ‘अशा’ पद्धतीने घरबसल्या मिळवा

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-डिजिटलच्या या टप्प्यात मोठ्या प्रमाणात बँकिंग सेवा देखील डिजिटल करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला चेकबुक मिळवायचे असेल तर आपण हे कामही घरातून डिजिटल पद्धतीने करू शकता. तसे, जवळजवळ सर्व बँका ही सुविधा देत आहेत. परंतु, येथे एचडीएफसी बँकेचे उदाहरण देऊन आम्ही सांगत आहोत की आपण ही सेवा कशा वापरू … Read more

मनसेच्यावतीने चक्क घातले खड्ड्याचे श्राध्द!

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- नगर -जामखेड महामार्गावरील चिचोंडी पाटील शिवारात भातोडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पाटबंधारे विभागाचा मोठा खड्डा आहे. या खड्ड्यामध्ये राजरोसपणे लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे मनसेच्या वतीने या खड्ड्याचे श्राद्ध घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने येथे अनेकदा अपघात घडले आहेत. रात्रीच्या वेळी हा खड्डडा लक्षात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार ३७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७१ ने वाढ … Read more

अखेर न्यायालयाने बोठे बाबत ‘तो’ आदेश काढला

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी हत्याकांडाचा सूत्रधार सूत्रधार पत्रकार बाळ. ज. बोठे याच्या अटकेसाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहे, मात्र पोलिसांना यश येत नाही आहे. जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेला पारनेर न्यायालयाने फरार घोषित केले … Read more

स्थायी समितीच्या सभापदाची कमान राष्ट्रवादीच्या हाती

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-महापालिकेतील सर्वांत मोठा पक्ष असूनही गेली दोन वर्षे शिवसेना विरोधी बाकांवर आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या नावाखाली राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्र आले असले तरी नगरमध्ये मात्र राष्ट्रवादी-शिवसेनेचं मनोमिलन झालेलं नाही. याचाच प्रत्यय नगरमध्ये मनपाच्या स्थायी सभापदी पदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक असूनही एकाकी पडलेल्या शिवसेनेने आज स्थायी समिती सभापतीच्या … Read more