शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी – भाजपच्या कुरघुड्या

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर यात सुधारणा होईल, या आशेवर शिवसेना होती. मात्र आता स्थायी समिती सभापतीच्या निवडीतही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबतच राहून शिवसेनेला दणका दिला आहे. अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अविनाश घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना भाजपने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! कामासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा विहिरीत सापडला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- राहुरी तालुक्‍यातील निंभोरे येथील गौरव नावाच्या २२ वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गौरव जिजाबापु सांगळे, वय २२ हा तरुण कामासाठी घराबाहेर पडला. तो घरी जेवणासाठी आला नाही तेव्हा त्याचा नातेवाईकांनी शोध सुरू केला. त्याची मोटारसायकल ही दाढ … Read more

धक्कादायक ! नगरसेवकाकडे अडकले भिशीचे तब्बल दोन कोटी रुपये

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- पैसे गुंतवणुकीसाठी सर्वसामान्यांकडून बँकांना प्राधान्य दिले जाते. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात सध्या भिशीचा व्यवसाय हा जोरावर असलेला दिसून येत आहे. सदाहरित असलेल्या या तालुक्यात भिशीद्वारे कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली आहे. मात्र याच भिशीच्या व्यवहारामध्ये पैसे अडकल्याने एकाने आत्महत्येचे पाऊल उचलले होते. यातच शहरातील एका नगरसेवकाकडे भिशीचे … Read more

खेळण्या बागडण्याच्या वयात तिच्या पायात लग्नाची बेडी

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- सरकारने मुला – मुलीचे लग्न करण्याचे वय निश्चित केले आहे. अल्पवयीन वयात लग्न करणे हा कायदेशीर गुन्हा असतानाही अनेक ठिकाणी हा प्रकार घडताना दिसून येत आहे. नुकतेच खेळण्या बागडण्याच्या वयात असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या पायात लग्नाची बेडी अडकवली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आई-वडिल, सासू- सासरे, पतीसह सात जणांविरूद्ध तोफखाना पोलीस … Read more

बँक खातेदारांसाठी महत्वाची बातमी; १ एप्रिल पासून होणार हा बदल

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- देशावर कोरोनाचे संकट असतानाच आर्थिक संकटात आलेल्या 10 बँकांचे विलीनीकरण नियोजित होणार असल्याची माहिती देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली होती. मोठ्या बँकेत बर्‍याच लहान बँकांचा समावेश केला जात आहे. यामुळे 1 मार्चपासून अनेक बँकांचे आयएफएससी कोड बदलण्यात आलेत. त्याचबरोबर हा बदल अनेक बँकांमध्ये 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. … Read more

तुम्हाला माहित आहे का मोदींची भाषणे कोण लिहून देतात?

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- मेरे देशवासियो… मेरे प्यारे भाई – बेहनो… असे शब्द आपण नक्कीच ऐकले असतील… हे शब्द ऐकताच एकच चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होय…आपल्या भाषणाने संबंध देशातील जनतेला मोहित करणारे देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची नेहमीच चर्चा होत असते. तर आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडला … Read more

मनपा सभापती निवडीच्या एक दिवस आधीच शिवसेनेत फाटाफूट

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- स्थायी समिती सभापतीची उद्या (गुरुवारी) 3 वाजता होणार्‍या विशेष सभेत निवड होणार आहे. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी अर्ज दाखल केला असून महापौर वाकळे यांच्या हजेरीमुळे राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे. तर शिवसेनेकडून विजय पठारे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र या निवडीच्या आदल्या दिवशीच शिवसेनेत फाटाफूट झाल्याचे समोर … Read more

चौकशी समितीने घेतली ‘जलयुक्त’ची झाडाझडती !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- सेवानिवृत्त सनदी अधिकारी विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने बुधवारी नगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या तक्रारींची झाडाझडती घेतली. यावेळी उपस्थित तक्रारदारांशी विजयकुमार यांनी थेट संवाद साधला. यावेळी तक्रारींच्या संबंधित मुद्द्यांची विचारणा संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडे केली असता त्याबाबत होणारी दिरंगाई लक्षात आल्यावर भर बैठकीत विजयकुमार यांनी अधिकाऱयांची चांगलीच कानउघडणी केली. त्यामुळे कृषी विभागाच्या … Read more

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने पार केला 76000 चा आकडा !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- आज १७६ रूग्णांना डिस्चार्ज तर २१५ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर अहमदनगर: जिल्ह्यात आज १७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार १०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८२ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा … Read more

त्या संशयीताविरुद्ध पोलिसांनी उचलले ‘हे’ पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण (वय ५२) या व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी संशयीताचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे. बेलापुरातील काही सीसीटीव्ही चित्रण तसेच स्थानिकांनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली आहे. या संशयीताविषयी काही माहिती असल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, … Read more

भाजपचा विकासवेधी विचार तळागाळापर्यंत पोहचणार

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- भारतीय जनता पक्षाचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर अहमदनगर येथील कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी जाहीर केलेल्या नवीन कार्यकारिणीत सर्व तालुक्यातील विविध क्षेत्रात व भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षापासून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना जिल्हा कार्यकारणीमध्ये संधी देण्यात आली. यानुसार सरचिटणीसपदी योगीराजसिंग परदेशी (संगमनेर), … Read more

‘छत्रपती संभाजी महाराजांनी जगावं कसं आणि मरावं कसं, हे दाखवून दिले’

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- शिवप्रतिष्ठाणचा रायगडावर सोन्याचे सिंहासन बसविण्याचा संकल्प राज्य व देशात पोचवायचा आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी जगावं कसं आणि मरावं कसं, हे दाखवून दिले आहे. त्यागाचा हा इतिहास कधीही विसरला जाणार नाही असे मत शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी व्यक्त केले. भिडे यांनी नुकतेच शनिशिंगणापूरला भेट देऊन स्वयंभू … Read more

भाजपाची कोंडी; जलयुक्तच्या कामांची होणार खुली चौकशी

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-  भारतीय जनता पार्टीच्या काळातील एक महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. मात्र आता याच कामाबाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून केलेल्या कामांची विशेष तपास समितीकडून खुली चौकशी आज करण्यात आली आहे. भाजप सरकारच्या काळात राबविण्यात आलेली ही योजना महाविकास आघाडीच्या सरकारने … Read more

वीजवाहक तारांचे शॉर्टसर्किट होऊन दोन एकर ऊस खाक!

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील भानुदास केदार व विष्णू केदार यांच्या शेतामधील विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे विजेचे लोळ पडून दोन एकर ऊस पिक जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये उसाचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. कोरडगाव (ता. पाथर्डी) येथील सेवानिवत्त मेजर भानुदास केदार तसेच त्यांचा भाऊ विष्णू … Read more

अहमदनगर मध्ये ६०० लिटर भेसळयुक्त दूध केले नष्ट !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- दूध भेसळीचे आगार बनलेल्या राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शिलेगाव (करपरावाडी) येथील दोन दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून भेसळयुक्त सुमारे ६०० लिटर दूध नष्ट करून, भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य पावडर व मिश्रण जप्त केले तर सदर दूध संकलन केंद्राचे व्यवसाय परवाने रद्द करण्याचे आदेश आले … Read more

केवळ उत्पन्ना अभावी ‘त्या’ नगरपरिषदेची ई-लायब्ररी बंद!

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- येथील श्रीरामपूर नगरपरिषदेची ई-लायब्ररी बंद पडली आहे. केवळ उत्पन्न मिळत नाही, म्हणून ई-लायब्ररीच्या टेंडरचे नूतनीकरण केले नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. आठ दिवसाच्या आत ई-लायब्ररी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहानी, … Read more

ना.तनपुरे म्हणतात ‘हा माझा तालुका ही माझी माणसे’

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- ‘माझा तालुका आहे. ही माझी माणसे आहेत’. त्यांच्या आयुष्यात नवनवीन सुख-सुविधा आणणे, त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, यासाठी मी माझ्या आमदारकीचा प्रत्येक दिवस खर्च करणार आहे. असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले. पोलिसांसाठी गृह विभागातर्फे नवीन वाहन देण्यात आले. त्याचे लोकार्पन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते … Read more

अन्यथा आत्मदहन करण्याचा भिंगारच्या व्यापार्‍याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- भिंगार येथील विशाखापट्टणम महामार्गावर विजय लाईन चौकात दुकानासमोरील अतिक्रमण न हटविता अ‍ॅट्रोसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देऊन पैश्यासाठी मानसिक त्रास देणार्‍या महिलेवर कारवाई करुन सदरचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक व्यापारी सुमित कुमार संतोष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. सदर महिले विरोधात कारवाई न झाल्यास दि.15 मार्च रोजी जिल्हाधिकारी … Read more