रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात तृतीय पंथीयांचा प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- शहरातील तृतीय पंथीय व प्रेमदान हडको येथील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) प्रवेश केला. आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी तृतीय पंथीय व इतर कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करुन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांच्या आदेशान्वये विविध पदी नियुक्त्या केल्या. तृतीय पंथीय आघाडीच्या शहराध्यक्षपदी वर्षा रत्नपारखी, शहर उपाध्यक्षपदी … Read more

परत लॉकडाउन परवडणारे नाही ; म्हणून काळजी घ्या!

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात केलेल्या सर्व प्रकारच्या उपाययोजना व नागरिकांच्या सहकार्यामुळे आपण कोरोनावर नियंत्रण मिळविले. त्यामुळे राज्यात, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. मात्र मागील काही दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढणारी संख्या … Read more

विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  आज माणसाचे जगण्यापेक्षा मरण अधिक स्वस्त झाले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशी घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील खांबे येथील एका तरुणाचा विहिरीतील वीज पंपाची केबल काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नितीन बापू भोंडे असे त्या तरुणाचे … Read more

आनंदवार्ता: मागील वर्षीचा ‘त्या’ शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार!

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  जिल्हयातील सन २०१९ – २० चा खरीप  व रब्बी हंगाम (आंबे बहार फळबाग) मंजूर झालेला परंतु शेतकऱ्यांना न मिळालेला पीक विमा जिल्हा बँकेचे संचालक व पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. वंचित शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी किंवा पारनेर बाजार समितीशी … Read more

मुलाला सोडवायला गेली अन स्वतःच तुरूंगात जाऊन बसली!

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- पुत्र प्रेमापोटी हिरकणी या मातेने चक्क रात्रीच्या वेळी अवघड डोंगर उतरल्याचे आपण ऐकले आहे. असाच काहीसा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. तो असा पोलिसांनी पकडलेल्या आपल्या मुलाला सोडविण्यासाठी गेलेल्या आईने पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला. यामुळे त्या मुलाला सोडणे तर दूरच राहिले मात्र पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी त्या आई … Read more

चोरटयांनी मंदिरातील दानपेटीत पळविली

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घेतला आहे. यामुळे पोलीस प्रशासन देखील चांगलेच हैराण झाले आहे. नुकतेच कर्जत मध्ये अशीच एक धाडसी चोरीची घटना घडली आहे, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरांनी पळविली. शुक्रवारी सकाळी भविकांसह पुजारी आरती करण्यास गेल्यावर ही बाब लक्षात … Read more

राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी पाळला निषेध दिन केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- केंद्र सरकार कोरोना महामारीची ढाल पुढे करुन कामगार विरोधी धोरण राबवित असल्याच्या निषेधार्थ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने निषेध दिन पाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालया समोर सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करुन, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी … Read more

मंत्री व त्यांचे हस्तक धार्मिक स्थळांचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- महाराष्ट्रातील सत्तेत असणारे मंत्री व त्यांचे हस्तक धार्मिक स्थळांचा दुरुपयोग करीत असून, त्यांच्यावर दिखाव्यापुरती कारवाई न करता त्यांना मंत्रीपदापासून कार्यमुक्त करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. महाराष्ट्रातील सत्तेत असणारे मंत्री व त्यांचे हस्तक धार्मिक स्थळांचा दुरुपयोग प्रतिबंधक … Read more

‘या’ तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे नव्याने आरक्षण जाहीर!

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- पारनेर तालुक्यातील गेल्या महिन्यात सरपंच पदाचे आरक्षण सोडतीमध्ये भोयरे गांगर्डा वडझिरे वडगाव दर्या वाघुंडे बुद्रुक पाबळ‌ ५ ग्रामपंचायतीचे नव्याने आरक्षण सोडत प्रांत अधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी शुक्रवारी जाहीर केले आहे. तहसील कार्यालयाच्या दालनात जय भाऊसाहेब खेडेकर प्रांत अधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे … Read more

मास्क न वापरणाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन  मनापाची गांधीगिरी   

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  गेल्या काही दिवसांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. मात्र अद्यापही अनेकजण मास्क वापरात नाहीत.अशा नागरिकांना मनापाच्यावतीने बॅण्डच्या आवाजात मास्क वापरण्यासाठी गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली. दिलासा दिलेल्या कोरोनाने परत एकदा आपले गुण दाखवले आहेत.त्यामुळे … Read more

आता बाळ बोठेसमोर उरले दोनच पर्याय !

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी अजित पाटील यांनी तब्बल १ हजार ५०० पानांचे दोषारोप पत्र पारनेर न्यायालयात सादर केले आहे. मात्र जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही फरार असल्याने त्याच्याविरोधात तो अटक करण्यात आल्यानंतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दुध टँकर चालकाचा अपघातात मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-   नगर‌-दौड रोडवर लोणीव्यंकनाथ बसस्थानकासमोर उस घेवून जाणारा टॅक्टरव दुधाचा टँकर यांची धडक होऊन झालेल्या अपघातात टँकर चालक ठार झाला आहे. बाळासाहेब बबनराव यादव (वय ६०, रा.तांदुळवाडी, ता.बारामती) असे अपघातात ठार झालेल्या टँकर चालकाचे नाव असून हा अपघात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. दुधाचा टँकर बारामतीवरून नाशीकला … Read more

ह्या तालुक्यात कोरोनाचा रुद्रावतार ! दोन दिवसांत १०१ कोरोना रुग्ण वाढले…

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  संगमनेर शहरासह तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोना बाधित आढळत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाची धावपळ वाढली. गुरुवारी ५३, तर शुक्रवारी ४८ अशा १०१ रुग्णांची भर पडल्याने बाधित संख्या ६ हजार ७१७ झाली. संगमनेरात बंद पडलेली कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.बाधितांची वाढती संख्या बघता संगमनेर पालिकेने … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल केला जप्त

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. दरम्यान पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून 8 हजार 720 ची रोकड, तीन मोटारसायकल असा 3 लाख 58 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत अधिक माहिती … Read more

कारभार चव्हाट्यावर येण्याच्याभीतीमुळे सरकार चर्चेपासून पळ काढतेय !

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-   सत्तेसाठी एकमेकांना वाचवण्याचा समान कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबरोबरच सामान्य माणसांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. घरात बसून केलेला कारभार चव्हाट्यावर येण्याची भीती असल्यानेच सरकार अधिवेशनात चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार विखे यांनी … Read more

ग्रामस्थांचे तीन तास रास्ता रोको आंदोलन ठरले यशस्वी

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- निघोज, देविभोयरे, वडनेर व पठारवाडी ग्रामस्थांनी तीन तासाच्या रास्ता रोको आंदोलनानंतर त्यांना यश आले असून सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत निघोज वीज कार्यालयाचे उपअभियंता शेळके यांना घेराव घालण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी निघोज-पारनेर रास्तारोको आंदोलन सुरू केले. हे आंदोलन दीड वाजेपर्यंत सुरु होते. आंदोलनकर्त्यांनी शेळके यांना वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय … Read more

पैसे अडकल्याने वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीच्या युवकांची नियुक्ती !

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- संगमनेरातील सय्यद बाबा चौकातील एका भिशीचालकाने भिशीचे पैसे वसूल होत नसल्याने त्रस्त होऊन विषारी पदार्थ सेवन केला होता. या प्रकारामुळे शहरातील इतर भिशीचालक सावध झाले आहेत. यामुळे सर्व भिशीचालक एकवटले असून त्यातील काहींनी पैसे वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीच्या युवकांची नियुक्ती केली आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान काही … Read more

तीन महिने झाले तरी ‘त्या’ चोरट्यांचा शोध घेण्यात पोलीस अपयशी

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  19 नोव्हेंबर 2020 रोजी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवी मंदिराच्या गाभार्‍यातील 17 किलो वजनाच्या चांदीची चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरीच्या घटनेला तब्बल 3 महिने झाले मात्र पोलिसांना अद्यापही चोरटे सापडलेले नाही. यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ अनेकदा आंदोलने … Read more