मोठी बातमी: भारतातील मानवी चाचण्या थांबवल्या!

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आशेचा किरण म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकडे पाहिलं जात होतं. मात्र अ‍ॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं आपल्या लसीची मानवी चाचणी सध्या थांबवली आहे. ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीचा डोस दिल्यानंतर ब्रिटनमध्ये एक व्यक्ती आजारी पडला. त्यामुळे अ‍ॅस्ट्राझेन्काने दुष्परिणामांची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सफर्ड लसीची चाचणी तूर्त थांबविली आहे. अ‍ॅस्ट्राझेन्काच्या मते ही … Read more

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालय सुरु करुन विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करावे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, जिल्हा … Read more

वर्दळीच्या ठिकाणी कोविड सेंटर नको

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आले. मात्र जामखेड येथे सुरु होत असलेल्या एका कोविड सेंटर बाबत तहसीलदारांना निवदेन देण्यात आले आहे. शहरात खासगी कोविड सेंटर सुरू करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. पण या सेंटरला शासनाने परवानगी देताना आवश्‍यक सुविधा व जागेची … Read more

पंगा पडेगा महेंगा… तुझा एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  महाराष्ट्राबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत हिच्या अडचणीत आता आणखीच वाढ झाली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी आग ओकणाऱ्या कंगना विरोधात शिवसेना एकटवली असून तिचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. नगरमध्ये शिवसेनेने आज कंगनाचा फोटो असलेल्या फ्लेक्सला जोडे मारत आंदोलन केले. तसेच … Read more

पेन्शनरसाठी खास बातमी;लाइफ सर्टिफिकेट घरबसल्या ‘असे’ करा जमा

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  निवृत्तीवेतनधारकांना (पेन्शनर) वेळेवर पेन्शन मिळण्यासाठी सर्वात महत्वाची आवश्यक गोष्ट असते ती म्हणजे लाइफ सर्टिफिकेट अर्थात जीवन प्रमाणपत्र. लाइफ सर्टिफिकेट म्हणजे पेन्शनधारकाच्या जिवंत असण्याचा पुरावा असतो.  हे वेळेवर सादर न केल्यास पेन्शनधारकांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एवढेच नाही तर पेन्शन देखील थांबू शकते. अशा परिस्थितीत संबंधित लाइफ सर्टिफिकेट … Read more

मुद्रा कर्ज न मिळाल्यास ‘येथे’ करा तक्रार; ‘हे’ आहेत प्रत्येक राज्याचे फोन नंबर

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- पंतप्रधान मुद्रा योजना (पीएमएमवाय) ही मोदी सरकारची सर्वात खास योजना आहे. ही योजना थेट व्यवसायाला आधार देण्याशी संबंधित आहे.  ही योजना छोट्या व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करुन देते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. पीएमएमवाय अंतर्गत विविध प्रकारांतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते. … Read more

SBI ने शेतकर्‍यांसाठी लाँच केली नवीन ‘ सफल’ योजना, जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) शेतकर्‍यांना सुलभ अटींवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कर्ज उत्पादन लाँच करण्याचा विचार करीत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन जर व्यवस्थित झाले तर पर्यायाने देशाचेही आर्थिक गणित व्यवस्थित बसले. यासाठी बँक शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहे.  बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, … Read more

के.के.रेंज संदर्भात राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते संरक्षणमंत्र्यांची भेट घेणार

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील के.के.रेंज हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. गावकऱ्यांपासून ते राजकीय मंडळींपर्यंत सर्वानी याविषयामध्ये हात घातला आहे. दरम्यान नगर जिल्हयातील पारनेर, नगर व राहुुरी तालुक्यातील जमीनी यापूर्वीच के के रेंज साठी लष्कराने ताब्यात घेतलेल्या आहेत. मुळा तसेच काळू धरण, कृषी विदयापिठासाठी करण्यात आलेल्या जमिनीच्या अधिग्रहनामुळे शेतकरी विस्थापीत … Read more

धक्कादायक! ‘या’ कोविड सेंटरला गेले दोन महिने डॉक्टरच नाही

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आनंद लॉन्स येथे येथील कोविड सेंटरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे इतर तीन विभागाचा अतिरिक्त कारभार पाहणाऱ्या डॉ. नलिनी थोरात यांच्याकडेच सध्या येथील कोविड सेंटरचा वैद्यकीय अधिकारी पदाचा कारभार आहे. त्यामुळे इतर सर्व कामे सांभाळून येथे राऊंड साठी येताना दररोज त्यांना मोठी … Read more

कंगनावर गुन्हा दाखल करा; शिवसेनेची मागणी

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  मुंबई आणि महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत विरोधात सर्वत्र निदर्शने केली जात आहे. कंगनावर आता पाथर्डीत गुन्हा दाखल करण्याची मागण करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानौत यांनी महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल … Read more

शैक्षणिक शुल्क रद्द करा; मनसेची मागणी

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-पाथर्डीत अकरावी प्रवेशासाठी चालु शैक्षणिक वर्षात सरसकट सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी पाथर्डी तालुका मनसेच्या वतीने प्रांताधिकारी देवदत्त केकान यांच्याकडे करण्यात आली. कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील सहा सात महिन्यांपासून सर्वत्र आर्थिक उलाढाल ठप्प आहे,सध्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता तालुक्यातील अनेक महाविद्यालयात ११ वी प्रवेशासाठी … Read more

नियमांचे पालन न करणारे दुकाने तहसीलदारांनी केले सील

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली जारी करण्यात आली असून हे नियम पाळणे सर्वाना बंधनकारक आहे. मात्र अशाच या नियमांना डावलणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पारनेर शहरामध्ये दोन दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स पालन न केल्याने व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन न केल्यामुळे या दुकानावर कारवाई करत तहसीलदार ज्योती … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात जनता कर्फ्यूला विरोध

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उपाययोजना म्हूणन जिल्ह्यातील काही तालुके हे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. नुकताच राहुरी तालुक्‍यात 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यानंतर राहुरी फॅक्‍टरी येथील श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशनने राहुरी फॅक्‍टरी व देवळाली प्रवरा परिसरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत जनता कर्फ्यू पाळण्यास … Read more

रोजगारासाठी तरुणांचे पंतप्रधानांना साकडे

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- आम्ही सत्तेत आलो कि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ यांसह अनेक पोकळ घोषणा करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने तरुणांच्या अपेक्षाभंग केल्या आहेत. उलट कोरोनाच्या या महामारीमुळे सुरु झालेल्या या लॉकडाउनमध्ये अनेकांच्या नौकऱ्यांवर गदा आली. बेरोजगारीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. सुशिक्षित व गरजू तरुणांना तातडीने नोकऱ्या द्याव्यात, अशी … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात चार बोकड व तीन शेळ्या फस्त

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढू लागला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान; संगमनेर तालुक्‍यातील आश्‍वी खुर्द शिवाराजवळच कान्हू गिते यांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार बोकड व तीन शेळ्यां ठार झाल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार झाल्या असून सुमारे 1 … Read more

वादळी वा-यासह पावसाने हाती आलेल्‍या पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीचे पंचनामे करा – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- वादळी वा-यासह पावसाने हाती आलेल्‍या पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीचे पंचनामे करण्‍याच्‍या सुचना माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी महसुल आणि कृषि विभागाच्‍या आधिका-यांना दिल्‍या आहेत. मागील दोन दिवसात तालुक्‍यात मोठ्या स्‍वरुपात वादळी वा-यासह पाऊस झाला. या पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्‍ये सोयाबीन, तुर, मुग, ऊस, बाजरी हे हाती आलेले … Read more

शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण द्या; या समाजाने केली मागणी

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राज्यातील मुस्लीम समाजाला नौकरी व शिक्षणामध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मुस्लिम आरक्षण निर्णय आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वहाब सय्यद, अफजल सय्यद, मुक्ती अल्ताफ, वसीम सय्यद, रफिक सय्यद, कादीर शेख आदी उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची कायदेशीर … Read more

कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तरी कोरोनाच्या लक्षणाने त्याने जीव गमावला

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना तपासण्यांचा वेग वाढू लागला आहे तसतश्या कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागली आहे. बहुतांश जणांना कोरोनाची लक्षणे आहे मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र अशाच एका व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तरी कोरोनाच्या लक्षणाने त्याने जीव गमावला. पारनेर तालुक्यातील दामू मारूती शेळके (वय ५५) यांना … Read more