मुंडे प्रकरणातील ‘ त्या’ तरुणीच्या वकिलाला जीवे मारण्याच्या धमक्या !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराबाबतची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र, आता त्यांचे वकील रमेश त्रिपाठी यांना जीवे मारण्याच्या धमक्या विविध फोन क्रमांकांवरून येत असल्याचा आरोप वकील त्रिपाठी यांनी केला आहे. शुक्रवार, १५ रोजी त्रिपाठी यांनी घाटकोपर येथे पत्रकार परिषद घेऊ न ही … Read more

माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच केली उमेदवारी जाहीर !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतची आगामी निवडणुकीची रणधुमाळी अद्याप सुरू झालेली नसताना भाजपाचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी मात्र आपला प्रभाग दोनचा उमेदवार जाहीर करून बाजी मारली आहे. कर्जत नगरपंचायत मधील  नगरसेविका नीता अजिनाथ कचरे यांच्या प्रभाग क्रमांक दोन मधील सभामंडपाचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, … Read more

धनंजय मुंडे प्रकरणात खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत सध्या राज्यभर सुरू असलेल्या हनीट्रॅप चर्चेबाबत भाष्य करण्यास नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी अनुत्सुकता दाखवली. एखाद्याच्या व्यक्तिगत विषयावर टिपणी योग्य नसल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात खा. डॉ. विखे शुक्रवारी दुपारी आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी … Read more

त्या’निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून विरोधकांनी राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात असल्याचा टोला भाजप नेते निलेश राणे यांनी लगावला होता. यावर आता अजित पवार म्हणाले … Read more

पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारमध्ये भरघोस मतदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहत होते. अखेर शुक्रवारी (दि. १५ जानेवारी ) रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यातच जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल ३५ वर्षांनंतर शुक्रवारी नागरिकांनी मतदान केले. यावेळी ९१७ पैकी ८४३ म्हणजे ९३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकाधिकारशाहीच्या विरोधात निवडणूक … Read more

राहता : 19 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे, यातच जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींसाठी टक्के 78 टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत निहाय झालेली मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. हसनापूर 82, चंद्रापूर 75, जळगाव 84, एकरुखे 86, वाळकी 92, ममदापूर 82, अस्तगाव 86, नांदूर 82, रांजणगाव खुर्द 82, रामपूरवाडी 87, … Read more

राहुरी : ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८१.३१ टक्के मतदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणूक केंद्रावर काल उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात काल शुक्रवारी झालेल्या एकूण ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८१.३१ टक्के मतदान झाले. ९० हजार ३९२ मतदारांपैकी ७३ हजार ५०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ३८ हजार ८७४ पुरूष तर ३४ हजार … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ गावाच्या ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार !

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-नगर तालुक्यातील डोंगरगण येथे अर्धांगवायूचा झटका आलेल्या मातोश्रींना मतदान केंद्रावर घेऊन जात असताना, कोणतीही विचारपूस न करता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी मुख्याध्यापकास बेदम मारहाण केली. या प्रकाराने संतप्त झालेले गावकरी एकत्र येत बोरसे यांच्या अन्यायाच्या विरोधाती मतदान प्रक्रियेवर तब्बल दोन तास बहिष्कार टाकला. त्यामुळे … Read more

गावचा कारभारी कोण आज ठरणार; मतमोजणी होणार १८ जानेवारीला

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-महाराष्ट्र राज्यातील १४ हजार ग्रामपंचायती मध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला होता. कधी नाही ते या वेळेस मोठ्या हाय व्होल्टेज लढाया या निवडणुकी मध्ये पाहावयास आपल्याला मिळाल्या. आज या १४ हजार ग्रामपंच्यातींसाठी मतदान होणार आहे. मतदार राजा कोणाला मतदान करतो याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. सत्ताधारी पक्ष व विरोधी भाजप यांच्यातच … Read more

आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघात फेर मतदान घेण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा मतदार संघ असलेल्या कर्जत तालुक्यातील नांदगावमध्ये मतदान केंद्र बळकावल्याची थेट उमेदवारानेच तक्रार केली असून, फेर मतदान घ्यावे अशी मागणी केली आहे. नांदगाव मध्ये नागरिकांना स्वत:चे मतदान करण्यापासून रोखले जात असून विरोधी पार्टीच्या लोकांनी दबावतंत्राखाली मतदान प्रक्रिया चालू असून सदर व्यवस्था बंद करून फेर मतदान … Read more

जिल्हा बँके’साठी २० फेब्रुवारीस मतदान

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- एडीसीसी नावाने देशभरात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा राज्य सहकारी प्राधिकरणाकडून काल शुक्रवार रोजी करण्यात आली आहे. बँकेचे २१ संचालक निवडून देण्यासाठी दि.२० फेब्रुवारीस मतदान होणार असून दि.२१ फेब्रुवारी रोजी मतमोजणी द्वारे निकाल घोषित होणार आहे. या निवडूकीसाठी निवडणूक निर्णय … Read more

जिल्ह्यात ७०५ ग्रामपंचायतींसाठी दुपारी साडेतीन पर्यंत सरासरी ७१ टक्के मतदान मतदानासाठी युवा मतदारांसह वृद्धांचाही उत्साह

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७१.४६ टक्के मतदान झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांनी दिली. सायंकाळी उशीरापर्यंत मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे सायंकाळी मतदान संपेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी मिळण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त … Read more

मतदान केंद्रावर नारळ फोडला तहसीलदारांनी केले त्यांच्यावर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-मतदान केंद्रावर उमेदवाराचे चिन्ह नारळ असताना व केंद्राध्यक्षांनी नारळ फोडण्यास मनाई करून देखील संबधीतांनी नारळ फोडला. ही घटना पारनेर तालुक्यातील सुपा येथील पवारवाडीत घडली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी मतदान केंद्रावर जाऊन पहाणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तालुक्यातील … Read more

शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याने आखेर तो शासन निर्णय निर्गमीत

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- सहा महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत शासनाच्या वतीने शासन निर्णय निर्गमीत करण्यात आल्याने दि.1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 या सहा महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्याचा मार्ग … Read more

मुंडे प्रकरण : ‘त्या’ महिलेचा यू-टर्न?; म्हणाली तुमची…

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-  बलात्कार प्रकरणात अडचणीत सापडलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, त्यानंतर बघू अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. या संपूर्ण घटनेत पोलीस सहकार्य करत नाही असा आरोप तक्रारदार महिलेच्या वकिलांनी केला होता, धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या … Read more

मंत्री मुंडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी नगरमधून यांनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- महाविकासआघाडी सरकारमधील सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर केलेल्या अत्याचाराचा नगर शहर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने निषेध केला आहे. शहर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पै.अंजली वल्लाकटी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेवून तातडीने मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, जर तातडीने राजीनामा घेतला … Read more

अभिमानास्पद ! थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरेंचे नाव समाविष्ठ

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- राज्य सरकारने जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे. पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत सामावेश करण्यात आला आहे. सरकारने जारी केलेल्या या यादीत एकूण 41 थोर व्यक्तींचा समावेश आहे. 2021 मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे … Read more

राज्यात ठिकठिकाणी मतदानाला सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार आज राज्यभरातील जवळपास 14 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. मतदानासाठी गावागावात मतदान केंद्र सजली … Read more