घरगुती गॅस सिलेंडरची सबसिडी बंद झाली? सबसिडीची सद्यस्थिती जाणून घ्यायचीय? सिलेंडर बुकिंगवर 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक घ्यायचाय ? ‘इथे’ जाणून घ्या सर्व माहिती

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-जर आपण एलपीजी गॅस सिलेंडरवर वर सबसिडी घेत असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. एका वर्षात प्रत्येक घरासाठी सरकार 14.2 किलो चे 12 सिलिंडर्सवर अनुदान देते. यापेक्षा अधिक सिलिंडर खरेदी करण्यासाठी ग्राहकाला बाजारभाव भरावा लागतो. त्याच वेळी, बहुतेक लोकांना हे माहित नाही की त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम किती … Read more

ठरलं! ‘ह्या’ महिन्यात सुरु होईल कोरोना लशीकरण; सरकार करणार ‘इतका’ खर्च

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-कोरोनाला पराभूत करण्यासाठी जानेवारीपासून भारतात लसीकरण सुरू होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लसींना पुढील काही आठवड्यांत तातडीच्या वापरासाठी मान्यता मिळू शकेल. दोन कंपन्यांनी त्यासाठी अर्ज केला आहे. क्लिनिकल ट्रायल्सच्या आणखी सहा लसी प्रगत अवस्थेत आहेत. आतापर्यंत भारतातील 1 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. … Read more

देशातील कोरोनाबधितांची संख्या झाली इतकी

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- देशातील कोरोना संसर्गाचा वेग जरी काहीसा कमी झाल्याचा दिसत असला तरी देखील, अद्यापही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. देशभरातातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता १ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात २५ हजार १५३ नवे कोरोनाबाधित आढळले असून, सध्या देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ४५ लाख १३६ वर पोहचलेली … Read more

भाजपच्या या माजी केंद्रीय मंत्र्याचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. असे असताना भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. शेतकरी आंदोलनावरून वातावरण चांगलेच तापले असताना माजी केंद्रीय मंत्री … Read more

कोरोनाची लस घ्यायची की नाही इच्छेवर अवलंबून,पण … वाचा काय म्हणाले आरोग्य मंत्रालय..

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- कोरोनाची लस घ्यायची की नाही हे प्रत्येक व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून राहील. मात्र, लसीचे सर्व डोस घ्यावेत असाच आमचा सल्ला असेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशभरात कोविड-१९ च्या सहा लसींच्या चाचण्या सुरू आहेत. मंत्रालयाने लसींबाबतच्या जिज्ञासांवर जारी एफएक्यूत म्हटले आहे की, भारतात उपलब्ध लसही इतर देशांत विकसित लसींएवढीच … Read more

शेअर बाजारात तेजी कायम; सेन्सेक्स ४७,००० समीप

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- आजच्या व्यापारी सत्रात बेंचमार्क निर्देशांकाने थोडी वृद्धी घेतली. या नफ्याचे नेतृत्व आयटी आणि फार्मा स्टॉक्सनी केले. निफ्टी ०.१४% किंवा १९.८५ अंकांनी वधारला व १३,७६०.५५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.१५% किंवा ७०.३५ अंकांनी वाढला व ४६,९६०.६९ अंकांवर स्थिरावला. आज जवळपास १,१२५ शेअर्सनी नफा कमावला, १,६११ शेअर्स घसरले … Read more

काय सांगता ! भारतात धावणार बिना ड्रॉयव्हरची मेट्रो ट्रेन, पंतप्रधान मोदी करणार ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-  देशातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होईल. या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजधानी दिल्लीत त्याला हिरवा झेंडा दाखवतील. ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) च्या मॅजेन्टा लाइनवर ड्रायव्हरलेस ट्रेनला मान्यता देण्यात येणार आहे. ही लाइन जनकपुरीला बोटॅनिकल … Read more

ऐकावे ते नवलंच ! PM मोदींचे संसदीय कार्यालय OLX वर विक्रीला

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- जुन्या, वापरलेल्या वस्तू खरेदी विक्रीसाठी OLX हा पर्याय सर्वाना माहिती आहे. मात्र या OLX वर एक अजबच गोष्ट विक्रीसाठी उपल्बध झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. ओएलएक्‍स या वस्तू विक्रीच्या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील कार्यालयाचे फोटो टाकून ते विक्रीला काढल्याची जाहिरात दिली. त्यासाठी साडेसात कोटी रुपयांची बोली … Read more

या ६ वेबसाइटपासून राहा सावध, अन्यथा रिकामे होईल तुमचे बँक खाते !

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- देशभरात वाढलेली ऑनलाइन फ्रॉड ची प्रकरणं लक्षात घेता सरकारने बनावट वेबसाइटची यादी जाहीर केली आहे. जर तुम्ही देखील या वेबसाइटचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुमच्या खात्यातील रक्कम आणि तुमची वैयक्तिक माहिती चोरी होण्याची दाट शक्यता आहे. पीआयबीने सहा वेबसाइटची यादी जारी केली आहे. या … Read more

जात वैधता प्रमाणपत्र प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-राज्‍य निवडणूक आयोगाने राज्यातील राज्‍यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्‍ये अहमदनगर जिल्‍ह्यातील 767 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्‍यात इच्‍छुक असलेल्‍या व ज्‍यांच्‍याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या … Read more

नेहा कक्कर लग्ना आधीच प्रेग्नंट? फोटो शेअर करत दिली गोड बातमी!

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसापासून नेहा आणि रोहनप्रीत सातत्याने चर्चेत आहेत. सध्या नेहाविषयी एक नवीनच चर्चा रंगली आहे. नेहा लवकरच आई होणार असून तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. विशेष म्हणजे नेहाचा हा फोटो पाहून ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. नेहाच्या या फोटोवर अनेकांनी … Read more

नवीन वर्षात 1 जानेवारीपासून बदलतायेत ‘ह्या’ गोष्टी ; तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे हे बदल जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-आता 2020 हे साल संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. हे वर्ष कोरोनामुळे दहशतीखालीच गेले. आता नवीन वर्ष सुरु जाईल. नव्या वर्षाकडून अनेकांच्या अपेक्षा आहेत. या नवीन वर्षात काही नियमही बदलणार आहेत. हे बदल दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे आहेत. चला जाणून घेऊयात त्याविषयी सविस्तर… – 1 तारखेपासून गाड्यांच्या किंमती वाढ होणार आहे. … Read more

अबब! अक्षय कुमारची एका वर्षाची कमाई आहे ‘इतकी’

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-अमेरिकन बिझिनेस मॅगझिन फोर्ब्सने नुकतीच 2020 मध्ये जगातील 100 सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीत अक्षय कुमार हा एकमेव भारतीय असून 52 व्या क्रमांकावर आहे. अक्षयच्या कमाईवर कोरोनाचाही परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्याचे उत्पन्न 88 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. असे असूनही, तो … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- राज्य सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना खासगी रुग्णालयात केलेल्या करोनावरील उपचारांच्या खर्चाची परतफेड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २ सप्टेंबर २०२० पासून हा आदेश लागू होईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. टोपे यांनी ट्विटरवरुन सांगितलं की, “शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी आकस्मित तसेच गंभीर … Read more

यापुढे परदेशातून कांदा आयात करण्याची गरज पडणार नाही!

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- कांद्याचे दर वाढल्यानंतर सरकारसह सर्वांच्याच अडचणी वाढल्या होत्या. मात्र भविष्यात परत अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून सरकारने यासाठी  उपाययोजना केल्या आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी देशांतर्गत कांद्याचा बफर स्टॉक वाढवण्यात आला असून, यामुळे कांद्याच्या वाढत्या किंमती वाढणार नाहीत. तसेच परदेशातून कांदा आयात करण्याची गरज पडणार नाही. कांद्याच्या … Read more

खुशखबर ! टोल नाक्यांपासून सुटका मिळणार; गडकरींची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-पुढच्या दोन वर्षांमध्ये भारताला टोल नाक्यांपासून मुक्ती देणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. रशियाच्या मदतीने केंद्र सरकार Global Positioning System (GPS) टेक्नोलॉजी वापर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं टोल उत्पन्न 1 लाख 34 हजार 000 कोटींपर्यंत वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. … Read more

सोन्याचे भाव वधारले; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- राजधानी दिल्लीत गुरूवारी सोन्याचा भाव 194 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ दिसून आली आहे. यामुळे सोन्याचा भाव 49,455 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गेल्या सत्रात सोने 48,261 रुपये प्रति 10 ग्रॅमवर भाव बंद झाला आहे. दुसरीकडे, चांदीबाबतबोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी चांदीच्या दरात वाढ … Read more

..जर ‘तसे’ झाले तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही ; उच्च न्यायालयाचा निकाल

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-लग्नाचं वचन दिल्यानंतर एखादी स्त्री दिर्घ काळापासून स्वतःच्या मर्जीने शरीर संबंध ठेवण्यास सहमत असेल तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. एका महिलेची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली असून तिने ज्यामध्ये लग्नाचे वचन देऊन बलात्कार करणाऱ्या व्यक्तीच्या सुटकेला आव्हान दिले होते. लग्नाचे वचन देऊन … Read more