तंबाखू, सुपारी व पान मसाला सेवन करणे आणि थुंकण्यावर बंदी !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असतानाच २८ राज्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानरहित तंबाखू, सुपारी व पान मसाला सेवन करणे आणि थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. थुंकीच्या लाळेतून कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, आसाम आणि दिल्लीसह अनेक … Read more

‘चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांना बारामतीत आणावे’

पुणे कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे उद्योग मोडकळीस आले आहेत. याबाबत चीनला दोष देत अनेक उद्योग चीनमधून बाहेर पडणार असल्याचे चित्र आहे. देशाने ग्रामीण अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांचे स्वागत करावे. ते उद्योग बारामतीच्या रिकाम्या भूखंडात आणावे, अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन ने केली आहे. बारामती, जेजुरी, कुरकुंभ येथील औद्योगिक … Read more

आता ‘या’ उद्योगपतीने स्टेटबँकेसह इतर काही बँकांना घातला ४०० कोटींचा गंडा

स्टेट बँक आणि अन्य काही बँकांकडून ४०० कोटी रूपयांचं कर्ज घेऊन त्यांना गंडा घालण्यात आल्याचे नवीन प्रकरण उघडकीस आले आहे. बासमती तांदळाचा व्यापार करणारी कंपनी रामदेव इंटरनॅशनल लिमिटेडच्या मालकानं बँकांना गंडा घालून परदेशात पलायन केलं आहे. तब्बल चार वर्षांनंतर तक्रार दाखल करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार रामदेव इंटरनॅशनल या कंपनीनं ४१४ कोटी रूपयांचं कर्ज घेतलं होतं. … Read more

मजुरांची दैना संपेना;पुन्हा अपघात, ५ ठार तर ११ गंभीर

लॉक डाऊनमुळे अडकलेल्या व त्यामुळे गावी निघालेल्या मजुरांची दैना काही केल्या संप्याचे नाव घेत नाही. रेल्वे मार्गावर १६ कामगारांच्या मृत्यूची घटना ताजी असताना शनिवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमधील पाथा गावाजवळ आंब्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. या एका घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे तर ११ जण गंभीर जखमी झाले आहे. या ट्रकमध्ये १८ मजूर … Read more

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ४ नक्षलवादी ठार

रायपूर : सर्वत्र कोरोनाचे सावट असून त्या संकटाबरोबर सर्व यंत्रणा लढत आहे. परंतु यातही दहशतवादी, नक्षलवादी यांच्या कुरापती सुरूच असल्याचे चित्र आहे. रात्री उशिराने छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त राजनांदगाव जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. यात चार नक्षलवादी ठार झाले. व एक एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे. मदनवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा पोलीस उपनिरीक्षक श्याम किशोर … Read more

कोरोनावर भारताने बनविली लस ? प्राण्यांवर होणार ट्रायल

दिल्लीः कोरोनानं जगभरात थैमान घातले आहे. सर्व उपाययोजना करूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. संपूर्ण जग यावर लास शोधण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनावर लस तयार करण्यासाठी भारतानं महत्त्वाची पावलं उचलली असून, त्याची चाचणी पहिल्यांदा प्राण्यांवर घेण्यात येणार आहे. अनेक देशातील वैज्ञानिक कोरोनावरची लस तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. भारतही कोरोनावर लस तयार करण्याच्या फक्त एक … Read more

चिंताजनक! कोरोना आता पोहोचला लष्करात; दोन जवानांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  कोरोना विषाणूने देशभर धुमाकूळ घातला असून याचा धोका वाढतच चालला आहे. आता याने आणखीन चिंता वाढवून ठेवली आहे. कोरोनाने आता लष्करात घुसखोरी केली आहे. यामुळे दोन बीएसएफ जवानांचा मृत्यू झाला असून नवीन 41 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता कोरोनाची बाधा झालेल्या जवानांची संख्या 193 झाली आहे.दरम्यान, देशभरातील … Read more

धक्कादायक ! दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीला घातल्या गोळ्या

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- पत्नीने दारु खरेदी करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने गर्भवती पत्नीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात ही घटना घडली. राज्यांतर्गत मद्यविक्रीला शासनाने परवानगी दिली आहे. परंतु याचे विपरीत परिणाम झाल्याच्या अनेक घटना या दोन दिवसांत घडलेल्या आहेत. या आरोपीने आपल्या २५ वर्षीय … Read more

कोरोनाच्या संकटातच या आजाराचा झाला शिरकाव!

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  कोरोनाच्या संकटामुळे देश त्रस्त असताना आसाममध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लूमुळे जवळपास २५०० डुकरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आसाम राज्यातील सात जिल्ह्यांच्या तब्बल ३०६ गावांमध्ये रविवारपर्यंत इतक्या डुकरांचा मृत्यू झाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे; पण यामुळे मानवाला धोका नसल्याचा दावा करण्यात आला आहे. देशात आफ्रिकन स्वाइन फ्लूचा शिरकाव … Read more

परराज्यातील ५० प्रवासी त्यांच्या गावाकडे रवाना, आपुलकीने सांभाळ केल्याबद्दल मानले प्रशासनाचे आभार

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- केंद्र शासनाने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात अडकलेल्या विविथ स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, इतर नागरिक यांना त्यांच्या राज्यात पाठविण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी खास पथकाची स्थापना केली.जिल्ह्यात विविध ठिकाणी तसेच निवारागृहात अडकलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यात येत आहे. आज रात्री नगरहून राजस्थानसाठी प्रवासी बस रवाना करण्यात आली. लॉकडाउन काळात या … Read more

धक्कादायक! तरुणीवर सामूहिक बलात्कार, भावाला विहिरीत ढकलले

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  एका १८ वर्षीय तरुणीवर ७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेपूर्वी आरोपीनी पीडितेच्या भावळविहिरीत ढकलून दिले. ही घटना मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यात घडली आहे. यातील ५ आरोपीना ताब्यात घेतले आहे. तरुणी आणि तिचा भाऊ मोटरसायकलने पाधर शहरातून परतत होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमाराला रस्त्यात त्यानी … Read more

शेजारणीला बाईक शिकवायला गेला..आणि त्याच्यासोबत झाले असे काही !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडू नका असं प्रशासनाने वेळोवेळी ओरडून सांगितलं आहे. परंतु काही बहाद्दर ऐकायचं नाव घेत नाही. यात अनेक मजेशीर घटनाही घडल्या आहेत. अशीच एक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोलिसांना  एक महिला बाईक चालवत असल्याचं दिसलं. तिच्या पाठीमागे एक तरुण होता. पोलिसांना बघून ते बहुधा … Read more

कोरोनावर लवकरच निर्णायक विजय मिळवू !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :-नवी दिल्ली : ‘कोरोना व्हायरसविरोधातील युद्धात भारत सर्वच मापदंडांवर अन्य देशांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांतच देश या जागतिक महामारीविरोधात निर्णायक विजय मिळवेल, असा ठाम विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी व्यक्त केला. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २५.१९ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने यावेळी … Read more

किराणा आणायला गेला अन् सून घेऊन आला

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील तरुण किराणा माल खरेदी करण्यासाठी गेला आणि लग्नच करुन आला. हे प्रकरण येथेच थांबे नाही तर हे पाहून त्याची आई बेशुद्ध पडली. त्यानंतर घरात बराच वाद झाला. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत न्यावं लागलं. अखेर या सर्व प्रकरणावर संमतीने तोडगा काढण्यात पोलिसांना यश आले. या तरुणाचे गुड्डू आणि त्याच्या बायकोचे नाव सविता … Read more

Big Breaking : मंदिराच्या आवारातच दोन साधूंची धारदार शस्त्राने हत्या !

अहमदनगर Live24 :- महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधूंच्या मॉब लिंचिंगची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशमध्ये दोन साधूंची हत्या घडली आहे. बुलंदशहरमधील अनुपशहर कोतवालीच्या पागोना गावात मंदिर परिसरात झोपलेल्या दोन साधूंवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. जमावाने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साधू जगन दास (55 … Read more

पत्ते खेळण्यासाठी जमलेल्या चाळीस जणांना संसर्ग!

विजयवाडा : वेळ घालविण्यासाठी ट्रकचालकांचा पत्ते खेळण्याचा नाद आंध्र प्रदेशातील विजयवाडा जिल्ह्यातील जवळपास ४० जणांच्या कोरोना संक्रमणाचे कारण ठरला. अशा दोन घटनांमुळे चिंतेत वाढ झाल्याची माहिती कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद इम्तियाज यांनी शनिवारी ही माहिती दिली. पहिल्या घटनेत विजयवाडा येथील कर्मिकानगर भागात संक्रमित ट्रकचालकामुळे इतर १५ जणांना कोरोनाची बाधा झाली. तर काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुसऱ्या … Read more

८ ऐवजी १२ तास होणार कामाची वेळ

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संसर्गाला रोखण्यासाठी जारी असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांवर परिणाम झाला. या लॉकडाऊनमधून सूट मिळण्यानंतर संबंधित उद्योगांना झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी अनेक राज्यांनी फॅक्टरी कायद्यातील आठ तासांच्या कामाची वेळ वाढवून १२ तास केली आहे. काही राज्यांनी अतिरिक्त तासांसाठी दुप्पट वेतन देण्याचा निर्णयही घेतला आहे. कारखान्यांमध्ये काम करताना व्यक्तींमध्ये अंतर ठेवून काम करण्याचा … Read more

‘या’ 91 वर्षीय माजी आमदारांना आला मोदींचा फोन ! काय बोलले फोनवर वाचा सविस्तर

कोरोना विषाणूला हरवण्यासाठी देशभरात लॉकडाउन लागू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अनेक डॉक्टर, नर्स आणि वृद्ध लोकांशी सातत्याने संपर्ग साधत आहेत. शनिवारी पंतप्रधान मोदींनी अचानक बिहारचे माजी आमदार चंद्रमौली मिश्रा यांच्याशी फोनवर सम्पर्ग साधत परिस्थितीची चौकशी केली. सकाळी ९.३० च्या दरम्यान भभुआचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रमौली मिश्रा हे वर्तमानपत्र वाचत असताना … Read more