सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते.
सीडीएस रावत यांच्या पत्नी मधुलिका रावतही हेलिकॉप्टरमध्ये होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्व नेत्यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

तामिळनाडूतील कुन्नूरजवळ बुधवारी दुपारी हा भीषण अपघात झाला. ज्या हेलिकॉप्टरसोबत हा अपघात झाला ते भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 होते.
दुहेरी इंजिन असलेले हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानले जाते. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत हे होते, त्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
आज सकाळी तामिळनाडू आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या कुंनूर येथील लष्कराच्या बेस कॅम्प जवळ निलगिरी पर्वत रांगेत हा अपघात झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा मृत्यू या ठिकाणाहून काढण्यात आलेले आहेत.
तेरा जणांचा यात मृत्यू झाल्याचे ANI ने स्पष्ट केले आहे या हेलिकॉप्टरमध्ये एकूण चौदा जण होते त्यामध्ये चार जण क्रू मेंबर होते. तर दहा प्रवासी होते , हे सर्व लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते.
त्यात ब्रिगेडीयर एल एस लीडर, लेफ्टनंट कर्नल रजिंदर सिंह, नायक गुरू सेवक सिंग,नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल आदी चौदा जण होते यातील अकरा जणांचे मृतदेह येथून आढळल्याचे स्थानिकांनी माहिती दिलेले आहे.