अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- शिवसेनेचे मुखपत्र सामना च्या अग्रलेखात बीफच्या मुद्द्यावरुन भाजपवर टीका करण्यात आली त्यानंतर चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टिका केली होती.

त्यांच्या टिकेला प्रत्यूत्तर देताना शिवसेना प्रवक्ता मनिषा कायंदे यानी चित्रा वाघ यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता. पण त्यांचा प्रवेश शिवसेनेने नाकारला. म्हणूनच त्या शिवसेनेवर आगपाखड करत आहेत, असा गौप्यस्फोट केला आहे.

मनिषा कायंदे म्हणाल्या की, यांनी चित्रा वाघ यांची नेमकी पोटदुखी काय आहे ? असे आहे की, चित्रा वाघ यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता. पण त्यांचा प्रवेश शिवसेनेने नाकारला.

म्हणून त्या शिवसेनेवर आगपाखड करत आहेत. त्यांनी आपले काही झाकण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचा हा आटापीटा चालला आहे,” अशी मार्मिक टिपणीही कायंदे यांनी केली.

सोनियासेना प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने त्यांचा केंद्रसरकारबद्दलचा द्वेष उफाळून येणारच होता. म्हणूनच आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावं लागतंय.

मागील 2 वर्षात ठाकरे सरकारने ‘फटे लेकीन हटे नही’चे धोरण कसं राबवलं ते जनतेला माहिती आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.