file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील एका व्यक्तीने अडीशे रुपयात लस देतो असे सांगत बनावट लस देऊन फसवणूक केल्याप्रकरणी सदर व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी यासाठी राहाता तालुक्यातील काँग्रेस पदाधिकार्‍यांनी तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन दिले आहे.

एकीकडे कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना लसीकरण महत्वाचे बनले आहे. याचाच फायदा घेऊन काहीजण याचा काळाबाजार करू लागले आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्यसरकार मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतले आहे.राज्यात अनेक ठिकाणी अशा फसवणुकीच्या घटना घडत आहेत.

नागरिकांनी सरकारने ठरवून दिलेल्या ठिकाणी लसीकरण करून घ्यावे . पण काही ठिकाणी बनावट लसीकरण प्रकार समोर आले आहे. दरम्यान राहता तालुक्यात हा प्रकार उघड झाल्यानंतर तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, अस्तगाव येथील एका व्यक्तीने 250 रुपयांत लस देतो असे सांगून नांदुर्खी येथील एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना 1500 रुपये घेऊन लस दिली. लस देणार्‍या व्यक्तीचा आरोग्य विभागाची कुठलाही संबंध नाही.

सदरचा प्रकार हा निंदनीय असून लोकांच्या आरोग्याशी व जीविताशी खेळण्याचा प्रकार आहे. असा प्रकार जर सुरू असेल तर भविष्यात मोठा अनर्थ घडू शकतो. तरी सदर प्रकरणाची कायदेशीर चौकशी होऊन दोषींना कडक शासन करण्यात यावी.