file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयाचे कनिष्ठ लिपिक राहुल दिलीप पाटील यांना मारहाण आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याची चर्चा सुरु होती.

त्याबाबत पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या सहीसह एक तक्रार अर्जही व्हायरल होत आहे. मात्र, याबाबत आपण कुठलिही तक्रार केली नसल्याचा खुलासा संबंधित लिपिकाने केलाय. ‘आ. निलेश लंके यांनी मला कोणत्याही प्रकारची अरेरावी, शिवीगाळ किंवा मारहाण केलेली नाही. त्यांच्या विरुद्ध मी कोणाकडेही स्वतः अर्ज केलेला नाही.

परंतु सोशल मिडियावर आज (दि. ५) दुपारपासून आ. लंकेंकडून मारहाण झाल्याच्या पोस्ट फिरत आहेत. याद्वारे समाजमाध्यमांमध्ये माझी बदनामी होत आहे’, असा खुलासा करत लिपिक पाटील यांनी मारहाणीचा प्रकार धादांत खोटा असल्याचं म्हटलंय. या संदर्भात लिपिक पाटील यांनी पोलिस निरीक्षकांना पत्र दिलंय.

त्या पत्रात त्यांनी म्हटलंय, की दि. ४ आॅगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात गेलो असता तिथे लसीकरणाच्या टोकन वाटपावरून गोंधळ सुरु होता. या गोंधळाबाबत अज्ञात नागरीकाने आ. निलेश लंके यांना फोन केल्यानंतर काही वेळाने ते ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.

या गोंधळासंदर्भात आ. लंके यांनी लसीकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. टोकन वाटप संदर्भातील यादीची तपासणी केली असता त्यात अनेक आक्षेपार्ह नावे आढळून आली. त्यानंतर आ. लंके यांनी वैदयकिय अधिकारी मनिषा उंद्रे यांच्याकडून लेखी निवेदन घेतले. यापुढे लसीकरणात गोंधळ होणार नाही, असे सांगून डॉ. उंद्रे यांनी माफी मागितली.

त्यानंतर हा विषय तिथेच संपला. आन बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही करावी ही मी आपणास विनंती करत आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा अडसुळ यांनी सांगितलं, की दि. ४ आॅगस्ट रोजी मी ड्युटीवर असताना लसीकरण टोकन वाटपात गोंधळ झाला.

काही काळानंतर त्यांना कोणीतरी केलेल्या तक्रारीवरून शहनिशा करण्यासाठी आमदार निलेश लंके साहेब तेथे उपस्थित झाले. त्यांनी वैदयकिय अधिकारी डॉ. मनिषा उंद्रे यांना याबाबत जाब विचारला. लसीकरण टोकनची यादी तपासली आसता आमदार साहेबांना त्यात काही आक्षेपार्ह नावे आढळून आली.

झालेल्या गोंधळाबाबत डॉ. उंद्रे यांनी दिलगिरी व्यक्त करून यापुढे असे प्रकार होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर आमदार साहेब तेथून निघून गेले. यावेळी आमदार साहेबांनी कुणालाही शिविगाळ केली नाही, किंवा मारहाण केलेली नाही.