अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  मागील पाच वर्षाच्या भाजप सरकारच्या काळात मतदारसंघात विकासाची प्रचंड कामे झाली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या काळात अनेक विकास कामांना निधी मिळाला नाही. भाजप सरकारच्या काळात जो निधी मंजुर केला होता. त्यालाही स्थगीती देण्यात आली.

राज्य सरकारकडून फक्त सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघातील विकास कामासाठी निधी दिला जात आहे. विरोधकांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा सरकारकडे आपले वजन वापरून तालुक्यात विकास कामांना निधी आणावा असे प्रतिपादन शेवगाव – पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.

पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर इजदे येथील विविध विकास कामाचे उद्घाटन आ. राजळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या कि, दीड वर्षापासुन करोनाचे संकट असून ते अद्यापही कायम आहे.

मात्र, दुसरीकडे तालुक्यातील विरोधक जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीला लागले असून कोणत्या व्यासपीठावर काय बोलावे याचे भान त्यांना राहिले नाही. करोना सेंटरचे उद्घाटनात विरोधक भाजप,

पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, माझ्यावर यांचावर टीका करत आहे. मात्र, त्यांच्याकडे कोणाच ठोस मुद्दा नसल्याचे जोरदार उत्तर आ. मोनिका राजळे यांनी दिले आहे.