अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- साहित्यसूर्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रबोधनात्मक कार्य थोर आहे. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी शाहिरीच्या माध्यमातून समाजामध्ये त्यांनी जनजागृती केली.

त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक संस्थांनी सामाजिक कार्य केल्यास बदल घडणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मतदार दूत डॉ. अमोल बागुल यांनी केले. निंबेनांदूर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक व जनजागृती उपक्रमाने साजरी करण्यात आली.

यावेळी डॉ. बागुल बोलत होते. अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र), उत्कर्ष बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गावात मोफत आरोग्य शिबीर घेऊन मतदार जागृती करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

तसेच कोरोनाच्या संकटकाळात निस्वार्थ व मानवतेच्या भावनेने कार्य करणार्‍यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी आदर्श युवा पुरस्कार विजेते अ‍ॅड. महेश शिंदे, रयतेचे पोपट बनकर, ग्रामसेवक शिवाजी फुंदे,

उपसरपंच उत्तम वाकडे, शहादेव वाकडे, ह.भ.प. सुनिल तोडकर, राज्य युवती पुरस्कार विजेत्या जयश्री शिंदे, शाहीर कान्हू सुंबे, उद्योजक शरद वाघमारे, रज्जाकभाई शेख, मुख्याध्यापक भरत कांडेकर, अल्ताफ बागवान, मुख्याध्यापक संदीप सानप, डॉ. प्रभाकर बुधवंत, डॉ. प्रसाद गर्जे, डॉ. अमित मेहेर,

वसंत बडे, सुभाष बुधवंत, मीना जाधव, विनोद जाधव, नितीन गायकवाड, साक्षी बनकर, उत्कर्षाच्या अध्यक्षा नयनाताई बनकर, सचिव सिमोन बनकर आदी उपस्थित होते. अ‍ॅड. महेश शिंदे यांनी स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्यक्ष कृतिशीलपणे वैयक्तिक स्वच्छता,

परिसर व सार्वजनिक स्वच्छता राबविल्यास कोरोनासह अन्य आजारावरही मात करता येईल. स्वच्छता पंधरवाडा पूरती स्वच्छता मोहीम न राबविता ती कायमस्वरूपी अंगीकारण्याचे त्यांनी आवाहन केले. उत्कर्षच्या अध्यक्षा नयना बनकर यांनी कोरोना महामारीच्या काळात माणुसकीचे दर्शन घडवित ज्यांनी मनापासून कार्य केले.

अशा कोरोना योध्दांचा सन्मान करुन त्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे. यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता त्यांचा सन्मान केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रा.आ.केंद्र ढोरजळगावच्या कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते सुनील सकट,

गणेश ढोबळे, शाहीर चंद्रहास गवळी, उद्योजक शरद वाघमारे, प्रा. सुनिल मतकर, सिंधुबाई शिंदे, रविता खोसे, सिताराम निकम, पौर्णिमा वाकडे आदींना कोरोना योध्दा सन्मान प्रदान करण्यात आला. प्रा.आ.के. ढोरजळगावचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका,

आनंदऋषीजी नेत्रालयचे वैद्यकीय अधिकारी आदींनी युवक कल्याण योजने अंतर्गत ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. तसेच कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी मास्कचे वाटप केले. ह.भ.प. अ‍ॅड. सुनिल महाराज तोडकर यांनी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा परिधान करून हातात झाडू घेऊन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, मतदार नोंदणी करा, साडी-चोळी, दारू, पैसे घेऊन मतदान करू नका, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका,

स्वतःच्या आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असल्याचे विनोदी शैलीद्वारे भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन केले. तसेच उपस्थितांनी सार्वजनिक स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.