Cotton Farming Tips : कापूस किंवा कपाशी (Cotton Crop) हे भारतात लागवड केले जाणारी एक मुख्य पीक आहे. या पिकाची खरीप हंगामात (Kharif Season) देशातील अनेक राज्यात लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra) देखील या पिकाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे.

महाराष्ट्रातील खानदेश विभागात कपाशीची सर्वाधिक लागवड (Cotton Farming) केली जाते. खानदेश मधील जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) कापसाचे क्षेत्र अधिक असल्याने या जिल्ह्याला कापसाचे गोदाम म्हणून देखील ओळखले जाते. मित्रांनो सध्या कापूस पीक पाते तसेच फुल धारणेच्या अवस्थेत आहे.

एवढेच नाही तर जा शेतकरी बांधवांनी कपाशी आगात लागवड केली होती अशा शेतकरी बांधवांची कपाशीमध्ये आता बोंडे विकसित होत असल्याचे चित्र आहे. मात्र, अशा परिस्थितीत हवामानाचा लहरीपणा कपाशी पिकासाठी घातक आहे. मित्रांनो, राज्यात सध्या सातत्याने पाऊस सुरू असून काही ठिकाणी पावसाची उघडीप आहे.

ज्या ठिकाणी पाऊस सुरू आहे तिथे पाते गळ होत असून ज्या ठिकाणी हवामान कोरड आहे मात्र तापमानात वाढ झाली आहे अशा ठिकाणी देखील पातेगळ अधिक प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना कपाशी पिकात होणारी पातेगळ रोखण्यासाठी वेळीच योग्य त्या उपाययोजना (Cotton Crop Management) कराव्या लागणार आहेत.

अनुषंगाने जाणकार लोकांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील दिले जात आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने देखील कपाशी पाते गळ व त्यावरील उपाय योजना सांगितल्या आहेत. आज आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कपाशी पिकामध्ये होणारी पाते गळ रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना सांगितल्या आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.

कपाशी पिकातील पाते गळ रोखण्यासाठी खालील उपायोजना ठरणार फायदेशीर

मित्रांनो मराठवाडा कृषी विद्यापीठाने जारी केलेल्या सल्ल्यात कपाशी पिकातील नैसर्गिक पातेगळ रोखण्यासाठी नॅपथेलिन ॲसीटीक ॲसीड (एनएए) 20.50 मिली प्रति 100 लिटर पाणी हे प्रमाण घेउन फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे.

कपाशी पिकामध्ये नत्रयुक्त खताचा देखील पुरवठा करावा लागतो. कपाशी पिकात नत्राचा पुरवठा करण्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाने दोन महिन्यानंतर बागायती कपाशीसाठी 52 किलो आणि कोरडवाहू साठी 31 किलो युरिया प्रति एकर या प्रमाणात देण्याचा सल्ला दिला आहे.

एवढेच नाही तर मराठवाडा कृषी विद्यापीठाने जारी केलेल्या हल्ल्यात कापूस पिकातुन अधिक उत्पादन घेण्यासाठी देखील उपाययोजना सांगितल्या आहेत. जारी झालेल्या सल्ल्यानुसार कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी कापसाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी पिकामध्ये डीएपी (2 टक्के) 2000 ग्राम अधिक 500 ग्रॅम सुक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-2 प्रती 100 लिटर पाणी अस प्रमाण घेऊन फवारावे.

मित्रांनो एवढेच नाही तर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव अशी पिकात होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील कृषी विद्यापीठाने सांगितल्या आहेत. कपाशी पिकासाठी घातक ठरणारा लाल्या रोग रोखण्यासाठी 200 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन 15 दिवसाच्या अंतराने दोन वेळा फुले लागण्याच्या आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत फवारणीचा सल्ला देण्यात आला आहे.