Cotton Rate Maharashtra : कापूस एक जागतिक कमोडिटी मध्ये मोडते. आंतरराष्ट्रीय बाजाराचा कापसाच्या दरावर कायमच प्रभाव पाहायला मिळतो.

अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वधारले म्हणजेच देशांतर्गत कापूस दर वधारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर नरमले की देशांतर्गत बाजारात कापूस दर नरमतात.

आता जागतिक बाजारात कापसाच्या दरात तूट पाहायला मिळत आहे. याचा परिणाम आता देशांतर्गत झाला असून कापूस दरात पुन्हा एकदा नरमाई आली आहे.

खरं पाहता, आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला असता चीन हा कापसाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. चीन कापसा प्रमाणे सोयाबीनचा देखील मोठा ग्राहक आहे. आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना डोकं वर करू पाहत आहे. अशा परिस्थितीत चीनमध्ये निर्बंध शिथिल होत नाहीयेत. परिणामी चीनमध्ये कापसाची मागणी कमी होत आहे. तूर्तास तरी चीनमधील मार्केट पूर्ण क्षमतेने सुरू होणार नसल्याचे चित्र आहे.

म्हणजे याचा परिणाम म्हणून कापसाची मागणी कमी राहणार आहे. चीनमधून कापसाची मागणी कमी राहणार असल्याने याचा कापूस दरावर दबाव बनत आहे. यामुळे सध्या कापूस दरात नरमाई असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे. आज देखील कापूस दरात चढ उतार पाहायला मिळाली. आज दिवसाच्या सुरुवातीला कापूस दर नरमले, मात्र दुपारी पुन्हा एकदा कापूस दरात उभारी पाहायला मिळाली.

सकाळी 79.71 प्रति पाउंडने कापसाचे व्यवहार झाले मात्र तीन वाजेपर्यंत कापसाचे व्यवहार 80.88 प्रति पाउंडने झाले. मात्र असे असले तरी देशांतर्गत आज कापूस दर दबावात होते. आज देशांतर्गत कापसाला 8300 रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार आठशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. कापसाचे दर दबावत असल्यामुळे शेतकरी बांधव तूर्तास कापूस विक्रीसाठी तयार नसल्याचे चित्र आहे.

देशांतर्गत आज कापसाची आवक खूपच कमी होती. जाणकार लोकांच्या मते कापूस दरात सुधारणा झाल्यानंतर शेतकरी बांधव कापूस विक्री करू शकतात. सध्या कापूस दरात चढ-उतार सुरू असून पुढील एक महिना ही चढ-उतार कायम राहणार असल्याचा जाणकारांनी दावा केला आहे.

जानेवारी महिन्यापासून मात्र कापसाचे दर पूर्वपदावर येणार आहेत. जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना 9 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव ध्यानात ठेवून कापसाची विक्री करण्याचे नियोजन आखण्याचा सल्ला दिला आहे.