file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- शेवगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीनुसार मुलीची आई, आजी, मामासह बोधेगाव येथील नवरदेवावर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हिंगेवाडी अल्पवयीन मुलीच्या वडिलाने आपली अल्पवयीन मुलीचा विवाह बोधेगाव येथील युवकासोबत १८ ऑगस्ट रोजी बोधेगाव येथील कुढेकर वस्तीवर होणार असल्याची माहिती मिळाली.

त्यावरून १७ ऑगस्ट रोजी चाइल्डलाइन यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्याने बोधेगाव येथील पोलिस दूरक्षेत्र व ग्रामविकास अधिकारी यांनी बालविवाह होणार असलेल्या घटनास्थळी भेट देऊन खात्री केली. त्यानंतर ही घरे बंद आढळून आली,

तर याची कुणकुण लागताच संबंधितांनी १६ ऑगस्ट रोजी हा बालविवाह गायकवाड जळगाव (ता. गेवराई जि. बीड) येथे अंध, अपंग शाळा येथे करण्यात आल्याची २२ रोजी खात्री झाल्याने अल्पवयीन मुलीचे वडील यांच्या फिर्यादीनुसार त्याची पत्नी, मेव्हणा, सासू व नवरदेव,

रा. बोधेगाव यांच्यावर अल्पवयीन मुलीचा विवाह लावला म्हणून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, मुलीचे वडील व आई यांच्यात कौटुंबिक वाद झाल्यामुळे विभक्त असून पत्नी शिक्रापूर-पुणे येथे तीन मुली व एक मुलगा याच्या सोबत,

तर पती गावी हिंगेवाडी येथे आई-वडिलांना सोबत राहत आहे. या विवाहाची पत्रिका मोबाइलवर पाठवल्याने हा बालविवाह होणार असल्याचे उघड झाले.वडिलांच्या फिर्यादीवरून आई-आजी मामासह नवरेदवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.