Ahmednagar News : संगमनेर तालुक्यात संदीप पंढरीनाथ रहाणे (वय ४२, रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) या तरुणाने विषारी द्रव्य घेत आत्महत्या केली होती. परंतु आता त्याच्या पत्नीने फिर्याद दिल्याने याला वेगळे स्वरूप मिळाले आहे. विवाहित तरुणाला कर्जाच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आली होती.
मानसिक, शारीरिक त्रास दिल्याने तरुणाने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. याप्रकरणी मयत तरुणाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून त्याचे कुटुंबीय, नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संजय पंढरीनाथ रहाणे, जालिंदर तबाजी रहाणे (दोघेही रा. चंदनापुरी. ता. संगमनेर) कविता राजेश अंमराळे, राजेश अंमराळे (रा. छत्रपती संभाजीनगर), विश्वनाथ तबाजी घुले, उज्ज्वला विश्वनाथ घुले (रा. सावरगाव घुले, ता. संगमनेर, हल्ली रा. संगमनेर), संतोष किशोर गुंजाळ (रा. गुंजाळवाडी ता. संगमनेर),
रामदास दादा चत्तर (रा. खराडी, ता. संगमनेर), बाळासाहेब भाऊसाहेब कढणे, भाऊसाहेब त्रिंबक कढणे (दोघेही रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दहा जणांनी नावे आहेत. त्यांच्याविरोधात राजश्री संदीप रहाणे (वय ३९, रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
कर्जाच्या कारणावरून संदीप रहाणे यांना चंदनापुरी येथे मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. तसेच तुझ्यामुळे वडिलांना त्रास झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले.
असे म्हणून त्यांना संगमनेरातील एका रुग्णालयात शिवीगाळ, मारहाण करत मानसिक, शारीरिक त्रास दिला. त्यामुळे त्यांनी विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.