डॉक्टर महिलेच्या घरातील हॉलमध्ये बसवलेला सीसीटीव्हीचा ॲक्सेस घेऊन महिलेची केली बदनामी! कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एका डॉक्टर महिलेच्या घरातील हॉलमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा एक्सेस एका तरुणाने घेतला व त्यानंतर या महिलेची बदनामी करून गैरकृत्य केले. त्यामुळे या डॉक्टर महिलेने या तरुणाविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून त्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ajay Patil
Published:
crime news

Ahmednagar News: दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसून येत असून सर्रासपणे महिलांशी गैरकृत्य केल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो किंवा वाचतो. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच राहिला आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने पडतो. अशीच काहीशी लाजिरवाणी आणि तितकीच धक्कादायक अशी घटना शास्त्रीनगर, केडगाव या ठिकाणी घडली असून

या परिसरात राहणारऱ्या एका डॉक्टर महिलेच्या घरातील हॉलमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा एक्सेस एका तरुणाने घेतला व त्यानंतर या महिलेची बदनामी करून गैरकृत्य केले. त्यामुळे या डॉक्टर महिलेने या तरुणाविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून त्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 घरातील हॉलमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीचा ॲक्सेस घेऊन महिलेची गैरवर्तन

डॉक्टर महिलेच्या घरातील हॉलमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अॅक्सेस स्वतः कडे घेऊन एका तरुणाने त्यांची बदनामी करत गैरकृत्य केल्याची घटना समोर आली आहे. उपनगरात राहत असलेल्या पीडित महिला डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर नंदकिशोर वाव्हळ (वय २८ रा. शास्त्रीनगर, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादीने त्यांच्या पतीपासून घटस्फोट घेतला असल्याने त्या मुलासह उपनगरात राहतात. त्यांचे भाडोत्री गाळ्यात क्लिनिक आहे. मागील एक वर्षापूर्वी (सन २०२३) फिर्यादी त्यांच्या क्लिनीकवरून घरी जात असताना मयुरने त्यांचा पाठलाग केला होता व तुमच्यावर प्रेम आहे, असे बोलला होता.

त्यावेळी फिर्यादीने त्याला जाब विचारला असता त्याने त्यांना शिवीगाळ केली होती. तसेच ऑगस्ट २०२४ मध्ये त्याने एका व्यक्तीबरोबर फिर्यादीचे प्रेमसंबंध असल्याचे सांगून त्यांची बदनामी केली होती. २९ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास मयूर हा फिर्यादीच्या क्लिनिकमध्ये आला

व त्याने त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादीच्या घरातील हॉलमध्ये बसविलेल्या कॅमेऱ्याचे अॅक्सेस दाखवले व मला तू घरात काय करते हे सर्व दिसते असे म्हणाला. अधिक तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे केडगावात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीच्या कृत्याबद्दल नागरिकांमध्ये संतात व्यक्त केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe