file photo

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  नगर जिल्ह्यासाठी साडे आठ कोटीचा पिक विमा मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी दिली.

काकडे म्हणाल्या, जनशक्ती विकास आघाडी शेतकऱ्यांच्या वतीने २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी, तहसीलदार, व प्रांताधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे मागील वर्षाचा पिक विमा शासनाने शेतकऱ्यांना त्वरित द्यावा अन्यथा दहा दिवसानंतर अमरापूर ते प्रांताधिकारी कार्यालय पाथर्डी येथे पायी दिंडी काढून सर्व शेतकरी निषेध नोंदवतील,

असा इशारा दिला होता. या मागणीची शासनाने दखल घेत नगर जिल्ह्यासाठी साडे आठ कोटीचा पिक विमा मंजूर केला आहे. त्याबद्दल शासनाचे, कृषी विभागाचे जनशक्ती शेतकरी आघाडी आभार व्यक्त करत आहे.

येथून पुढे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विम्याचा फायदा मिळावा यासाठी सखोल चिंतन करून पीक विमा मिळण्यासाठी जी अडचण, त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, जिल्हाधिकारी यांना जनशक्ती विकास आघाडीचे पदाधिकारी लवकर समक्ष भेटून निवेदन देणार आहे, असेही काकडे म्हणाल्या.