अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटताना आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

एकीकडे दिलासादायक परिस्थिती असली तरी दुसरीकडे एकट्या नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोरोनाने अनेक विक्रमी आकडेवारी पार केली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महसूलमंत्र्यांचा तालुका संगमनेर मध्ये आढळून आले आहे. जिल्ह्यातील दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. जिल्ह्यात शुक्रवारी चारशेहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नगरकरांची चिंता कायम आहे.

गेल्या २४ तासात जिल्ह्यात ४४५ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये १८७ , खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४६ आणि अँटीजेन चाचणीत १२ रुग्ण बाधीत आढळले.

यामध्ये सर्वाधिक रुग्ण म्हणजे तब्बल १४९ कोरोनाबाधित एकट्या संगमनेरात आढळून आले आहे. तर सर्वाधिक कमी ३ कोरोनाबाधित रुग्ण संख्या जामखेडमध्ये आढळून आले आहे.