मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेनंतर आपण सर्वजण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत होतो.एक एक दिवसांनी दिवस पुढे सरकत असताना वसुबारस, धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी आणि काल दिपावलीचा महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मी पुजनाचा दिवस आनंद उत्साहात पार पडला.

दिपावलीचा प्रत्येक दिवस आणि दिवसांचा प्रत्येक क्षण आपल्याला हवाहवासा वाटतो आणि हे दिवस सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आनंदाचं भरपूर फराळ देऊन जातात.आजचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा अर्थात दिपावली पाडवा.नात्यांना ऋणानुबंध करणारा हा दिवस आहे.

मित्रांनो काल अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. कार्तिक महिन्यातील कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस “बलिप्रतिपदा” म्हणून साजरा होतो तसेच हा दिवस पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो.

भारतीय संस्कृतीत साडेतीन मुहूर्तांला अतिशय महत्त्व असुन साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त असल्याने हा दिवस अतिशय शुभ मानला जात असतो. अक्षय तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी म्हणजे दसरा तीन मुहूर्त असून, दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे.बलिप्रतिपदा म्हणजे दिपावली पाडवा या दिवशी सोने खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते.

सुवासिनी कडून पतीला औक्षण केले जाते.व्यापाऱ्यांसाठी हा दिवस नवीन वर्षाचा प्रारंभ असतो. हा दिवस शुभ असल्याने या दिवशी विवाह सारखे मंगल कार्य ही या दिवशी आवर्जून करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे.

बलिप्रतिपदा किंवा दिपावली पाडवा म्हणजे काय ? :-
दिवाळीतील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे “बलिप्रतिपदा” म्हणजेच दिपावली पाडवा हा दिवस बळीराजा यांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो. अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपुजन झाले की, कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिपावली पाडवा साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृतीत कृषी क्षेत्राला महत्त्वाचे स्थान असुन कृषीक्षेत्र व बळीराजा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आरंभदिन असतो.

बलिप्रतिपदा किंवा दिपावली पाडवा या दिवशी गोवर्धन पुजा करण्याची प्रथा असुन गोवर्धन पुजा ही विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या मंदिरात करण्यात येते. महाराष्ट्रात बलिप्रतिपदा यादिवशी अनेक ठिकाणी पक्वान्ने करून त्यांचा नैवेद्य दाखवून पुढील आयुष्यासाठी शुभ आशिर्वाद घेतला जातो. बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असुन दिवाळी पाडव्याच्या दिवशी अनेक ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम करण्यात येत असतात. दिपावली पाडव्याच्या नवीन वस्तू खरेदीला खुप मोठे महत्त्व आहे या दिवशी सोने, गाडी किंवा कोणतेही नवी वस्तू खरेदी करणे खुप शुभ मानले जाते.

व्यापारी वर्गाच्या दुष्टीने या दिवसाला विशेष महत्त्व असते. या दिवसापासुन व्यापारी नवं वर्षास सुरूवात होत असते. या दिवशी व्यापारी वर्ग आपले पुस्तके, नोंदी पुस्तकांना हळदी कुंकू वाहुन लक्ष्मी पुजन करतात. या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पैसे किंवा वस्त्र दानाला धार्मिक दुष्ट्या विशेष महत्त्व असुन, या दिवशी भारतीय संस्कृतीतील हिंदू स्त्रिया पतीला ओवाळतात.

शुभ सकाळ किंवा सायंकाळी पाटाभोवती सुंदर रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते आणि पतीदेव पत्नीला भेटवस्तू देत असतो. ज्या नव दांपत्याची ही पहिली दिपावली असते, हा दिपावली पाडवा पत्नीच्या माहेरी साजरी केला जातो. या दिवशी जावयाचा मानसन्मान करून त्याला गोड धोड जेवण करून त्याला आहेर देण्याची प्रथा आपणास पाहावयास मिळते.

बलिप्रतिपदा किंवा दिपावली पाडवा केव्हा आणि कधी आहे ? :-
बलिप्रतिपदा किंवा दिपावली पाडवा हा आनंद, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य वाटणारा सण उत्सव आहे.अश्विन महिन्याच्या अमावास्येला मोठ्या आनंद उत्सवात लक्ष्मी पुजन पार पडले की,कार्तिक प्रतिपदेला बलिप्रतिपदा किंवा दिपावली पाडवा असतो. या वर्षी बलिप्रतिपदा म्हणजेच दिपावली पाडवा हा दिनांक ५ ला वार शुक्रवार २०२१ रोजी आहे.
या दिवसाला धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टया खुप मोठे महत्त्व आहे.

बलिप्रतिपदा किंवा दिपावली पाडवा का बरे साजरा केला जातो ? :-
पौराणिक आणि धार्मिक कथा अशी आहे की, प्राचीन काळी बळी नावाचा एक शुर, बलाढ्य आणि दानशूर राजा होता. त्याचे राज्य धन – धान्याने संपन्न होते. बळीराजा खुप दानशूर स्वभावाचा राजा होता.

राजा बळी हा असुरांचा राजा होता. तसेच हा भक्त प्रल्हादाचा नातू तर होताच पण बळी हा विरोचनाचा पुत्र होता असे पुराणात सांगितले गेलेले आहे. बळी राजाने राक्षसकुळात जन्म घेऊनही तो प्रामाणिक, चारित्र्यवान, दानशूर, विनयशील आणि प्रजाहित पाहणारा राजा म्हणून बळी राजाची सर्वदूर ओळख होती‌.

दानशूर म्हणूनही बळी राजा चारही दिशेला प्रसिद्ध होता. त्याची शक्ती दिवसेंदिवस, वाढत जात होती.त्या वाढत्या शक्तीच्या जोरावर आणि प्रभावाने त्याने देवांचाही पराभव केला होता. आपल्या शक्तीत शतपटीने वाढ व्हावी म्हणून बळीराजाने एक मोठा यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची धार्मिक परंपरा पुर्वी पासुन चालत आली होती.

देवांचे देव भगवान विष्णूं यांनी वामनाचा अवतार धारण केला होता. भगवान विष्णू बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले आणि बळीराजा कडे दान मागितले तेव्हा बळी राजाने वामणाला अर्थात भगवान विष्णूनां दान मागावयास सांगितले तेव्हा वामनाने तीन पावले भूमी दानात मागितली होती.

बळीराजाने मोठ्या आनंदात आणि मोकळ्या मनाने दान केले तेव्हा वामन रुपी भगवान विष्णू यांनी प्रचंड विशाल रूप धारण केले. एक पाय पृथ्वी, दुसरा पाय स्वर्गावर वामन यांनी ठेवला. तिसरा पाय ठेवण्यासाठी जागा शिल्लक नव्हती तेव्हा वचन पुर्ण करण्यासाठी बळीराजाने आपले मस्तक पुढे केले वामन अर्थात भगवान विष्णू यांनी मस्तकावर पाय ठेवत तसेच जमीनीत बळीराजाला गाडले म्हणजे पाताळात पाठवले.

बळीराजाला पाताळात पाठवताना वामनाला बळीराजाने वर मागितला होता तेव्हा बळीराजा वामनाला म्हणाला तु मला पाताळात गाठणार आहे आणि पृथ्वीवरील माझे राज्य नष्ट होणार आहे. पण कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी मानवांनी माझे स्मरण करावयाला हवे आणि पृथ्वीवरील मानवाचे अपघात, अकाली मृत्यू पासून संरक्षण करून त्यांच्या मस्तकावर सदैव श्रीमहालक्ष्मीचा वरदहस्त रहावा असा वर मागितला आणि हा वर वामन अर्थात भगवान विष्णू यांनी बळीराजास दिला.

म्हणून कार्तिक प्रतिपदेस बळीराजाच्या दानशूरतेचे स्मरण म्हणून बलिप्रतिपदा या दिवशी बळी राजाचे पुजन करण्यात येते. या दिवशी ईडा पिडा पळो आणि बळी राज्याचे राज्य यावे त्यांच्या घरात धन धान्य संपत्ती आणि समृद्धीचे ऐश्वर्य लाभो अशी प्रार्थना करण्यात येते.

बळीराजाच्या स्मरणार्थ व कृषी क्षेत्राचा व शेतकऱ्याप्रती कृतज्ञता म्हणून बलिप्रतिपदा साजरी होते.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलिप्रतिपदा म्हणजेच दिपावली पाडवा या दिवशी शेणाचा गोवर्धन पर्वत बनवून त्याला हळदी कुंकू वाहून पुजन करण्याची प्रथा आहे.

बलिप्रतिपदा किंवा दिपावली पाडवा कसा साजरा करतात ? :-
दिपावलीचे वसुबारस, धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपुजन,बलिप्रतिपदा म्हणजेच दिपावली पाडवा आणि दिपावलीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज हे अत्यंत महत्त्वाचे असतात. या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे विशेष महत्त्व आहे.

बलिप्रतिपदा ही कार्तिक प्रतिपदेस साजरी करण्यात येते. हा दिवस बळीराजा प्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी आणि भारतीय संस्कृतीत, रूढी परंपरा यांची जपणूक व्हावी म्हणून बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते.

या दिवशी अनेक ठिकाणी गाईच्या शेणापासून गोवर्धन पर्वताची प्रतिकृती बनवून त्याला फुलपुष्प, हळदी कुंकू वाहून त्याची भक्ती भावाने पुजा करण्यात येते. तसेच या दिवशी विष्णू किंवा भगवान कृष्णांची आपल्यावर कृपादृष्टी व्हावी म्हणून त्यांची भक्ती भावाने आराधना करण्यात येते.

त्याचबरोबर या दिवशी स्त्रिया पती,सासरे,मुले किंवा घरातील इतर पुरूष मंडळींना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून औक्षण करतात. नवीन लग्न झालेले दांपत्य आपली पहिल्या दिवाळीचा दिपावली पाडवा हा पत्नीच्या माहेरी साजरा करत असतात हा दिवस जावाईसाठी खुप महत्वाचा असतो. यानिमित्ताने एकमेकांन प्रती स्नेह भाव निर्माण व्हावा. दोघांमधील नाते ऋणानुबंध व्हावे हा प्रामुख्याने उद्देश असतो.एकंदरीत वरील सर्व कारणांमुळे बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते.

बलिप्रतिपदा किंवा दिपावली पाडव्याचे महत्त्व :-
कार्तिक प्रतिपदा म्हणजेच दिपावली पाडवा होय. असे सांगण्यात येते की या दिवशी माता पार्वतीने भगवान शंकरास द्युत खेळात हरवले होते म्हणून, यास द्युत बलिप्रतिपदा असेही म्हणतात.भारतीय संस्कृतीत सण उत्सवाच्या माध्यमातून मानवाला मदत करणाऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे.

म्हणून बळीराज्याच्या चारित्र्यसंपन्न, प्रामाणिकपणा, आणि दानशूरते प्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते.साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त हा बलिप्रतिपदेस म्हणजेच दिपावली पाडव्यास असतो म्हणून बलिप्रतिपदेचे महत्त्व आहे.