file photo

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले.

घरी कोणी नसल्याचे पाहून घारगाव येथील तरुणाने पीडित मुलीचा हात पकडून छेडछाड केल्या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारगाव सुद्रीक येथे घारगाव येथील सोन्याबापू बाळासाहेब चौरे याचा लिंबाचा काटा आहे.

काट्यावर घेतलेल्या लिंबाचे पैसे देण्याच्या बहाण्याने पिडीत मुलीशी ओळख वाढवत त्याचे मोबाईलमध्ये दोघांचे फोटो काढत आपण पळून जाऊन लग्न करु असे बोलतच पीडित मुलीने त्यास नकार दिला.

त्याने आपले दोघांचे फोटो साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. २५ जुलै रोजी सोन्याबापू चौरे याने सोशल मीडियावर पीडित मुली सोबत काढलेले फोटो टाकून मुलीची बदनामी केली.

त्यानंतर २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून आरोपी चौरे याने पीडित मुलीची छेड काढली.

या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करीत आहेत.