file photo

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे सावट जिल्ह्यावर घोगावु लागले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

नुकतेची नगर शहरातील मुख्य सरकारी कार्यालयापैकी एक असलेले झेडपीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. गेल्या आठवडाभरात जिल्हा परिषदेत 16 करोना पॉझिटिव्ह आढळले असून

यात दक्षिण बांधकाम विभागातील आठ जणांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेत अर्थ विभाग, दक्षिण बांधकाम विभाग, अध्यक्षांचे कार्यालय, लघु पाटबंधारे अशा विविध ठिकाणी सुमारे सोळाजण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

यामध्ये दक्षिण बांधकाम विभागातील आठ जण, तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील दोन यासह अन्य विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

कोरोनाचा वाढता शिरकाव पाहता बांधकाम दक्षिण विभागात सर्वाधिक रुग्ण सापडल्याने हा विभाग 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

वरील कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. खूपच आवश्यक असणार्‍या कर्मचार्‍यांना दुसर्‍या विभागात शिफ्ट केले आहे.

जिल्हा परिषदेत सध्या मार्चएण्डचे वारे वाहत आहे. यामुळे याठिकाणी ठेकेेदारांची रेलचेल असून यातून बांधकाम विभागात गर्दी होताना दिसत आहे. करोना संसर्गामुळे बांधकाम दक्षिण विभाग बंद करण्याची वेळ आली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर