अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- नगर तालुक्यातील देवगांव येथील रहिवासी व नगर शहरातील शारदा एजन्सीचे संचालक गणेश विश्वनाथ शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.

मृत्यू समयी ते 32 वर्षांचे होते. देवगांव येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई-वडिल, दोन बहिणी, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

बाजार समितीचे माजी सभापती विलास शिंदे यांचे ते पुतणे होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी शिंदे परिवाराचे सांत्वन केले.