अहमदनगर चे नाव बदलले ! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अहमदनगरमध्ये ही घोषणा केली. अनेक दिवसांपासून अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी होत होती.

औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. याशिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, स्वागताध्यक्ष आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, रमेश शेंडगे यावेळी उपस्थित होते.

हे पण वाचा : अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ह्या पाच नेत्यांची नावे चर्चेत ! कोणाला मिळणार दक्षिणेतून उमेदवारी

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगरच्या चोंडी येथे आले होते. यानंतरच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव लगेच मान्य केला.

हे पण वाचा : खा. सुजय विखे पाटलांनी करून दाखवलं ! अहमदनगर जिल्ह्यातील तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर …

त्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब !
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी डिसेंबर 2022 मध्ये राज्य विधान परिषदेत सांगितले की त्यांनी अहमदनगरच्या पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्याचे नाव 18 व्या शतकातील माळव्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मागितला आहे. आता या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.

हे पण वाचा : अहमदनगर ब्रेकिंग : लोकसभेला आ. बाळासाहेब थोरात VS सुजय विखे पाटील लढत होणार ?

अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी
गेल्या वर्षी महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर शिंदे-भाजप युती सरकारने इतर काही शहरांची नावेही बदलली आहेत. गेल्या वर्षीच सरकारने महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबादचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामकरण करण्यास मान्यता दिली होती. तेव्हापासून भारतीय जनता पक्ष अहमदनगरचे नाव बदलून अहिल्या नगर करण्याची मागणी करत होता.

ह्या कारणामुळे होणार बदल !
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जूनमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाव बदलण्याची मागणी केली होती. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगरच्या चौंडी गावात झाला होता आणि त्यांचा अहमदनगर संबंध होता, त्यामुळे या शहराचे नाव त्यांच्या नावावर ठेवावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते.

अहमदनगरच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा