Samsung ची झोप उडवायला येतोय OnePlus चा ‘हा’ फोल्डेबल फोन, जबरदस्त लूक व फिचर्स

Ahmednagarlive24
Published:
OnePlus Open

OnePlus च्या फोल्ड होणाऱ्या फोनची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. OnePlus 11 च्या लाँचिंग इव्हेंटमध्ये कंपनीने आपला फोल्डेबल फोन लवकरच लाँच करणार असल्याची घोषणा केली. वनप्लसने अद्याप आपला फोल्डेबल फोन लाँच केलेला नाही.

वनप्लस ओपन या नावाने हा फोन लवकरच लॉन्च होऊ हाकतो. हा फोन ऑक्टोबर अखेर पर्यंत लाँच केला जाण्याची शक्यता आहे. आता वनप्लस ओपनचा टीझर समोर आला आहे. कंपनीने अद्याप लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही.

एक्स वरील पोस्टमध्ये कंपनीने आपला आगामी फोल्ड फोन टीज केला आहे. टीझर इमेजमुळे हा फोल्डेबल फोन असल्याची पुष्टी होते व आणखी काही गोष्टी स्पष्ट होतात. आगामी वनप्लस फोल्डेबल फोन ओप्पो फाइंड एन 3 फोल्डचे रिब्रँडेड व्हर्जन असल्याची चर्चा आहे.

गीकबेंच लिस्ट आणि भारतीय अभिनेत्री अनुष्का शर्माने अपलोड केलेल्या फोटोवरून या गोष्टीला पुष्टी मिळते, जी फाइंड एन 3 फोल्डरच्या मागील रेंडरशी जुळते.

OnePlus Open चे स्पेसिफिकेशन
वनप्लस ओपन भारतात 19 ऑक्टोबरला लाँच होण्याची शक्यता आहे. वनप्लस ओपनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 7.8 इंचाचा 2K इंटरनल डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. या फोल्डेबल फोनमध्ये 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 SoC प्रोसेसर असू शकतो. याव्यतिरिक्त, हे 4,800 एमएएच बॅटरी सपोर्ट करू शकते, जे 67 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe