कधीतरी आपलीही जबाबदारी पार पाडा; फक्त केंद्राच्या नावाने ओरडू नका!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाकडे पोहोचले पण विरोधीपक्षनेते तेथे पोहोचल्याची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली. अन् त्यांना पुरग्रस्त भागाचा दोरा करावा लागला.

एकीकडे रत्नागिरी पाण्याने वेढलेले असताना तेथील नागरिकांना मदतीची गरज असताना रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब तेथून पळून मुंबईत आले. केंद्र तर सरकार मदत करणार परंतु राज्य सरकार म्हणून आपली काही जबाबदारी आहेना.

ती आपण निभवा. फक्त उठता बसता केंद्राच्या नावाने ओरडु नका. असा टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मदतीसाठी प्रत्येकवेळी केंद्राकडे बोटे दाखविणाऱ्या खा. राऊत यांना लगावला.

त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांचे मातोश्री ते पंढरपूर ड्रायव्हिंगचे कौशल्य पाहिले. आता त्यांनी हे कौशल्य कोकणात दाखवायला हवे. तिकडे एवढी मोठी नैसर्गीक आपत्ती असताना तेथील नागरिकांना आता खरी मदतीची गरज असताना सरकारी यंत्रणा तेथे वेळेत पोहोचत नाही.

पण विरोधी पक्षनेते तेथे पोहोचतात, केंद्राची जबाबदारी केंद्र पार पाडेलच, पण म्हणून तुमचीही जबाबदारी आहे. ती तुम्ही पार पाडायला हवी.

पुरग्रस्त भागात आता मुख्यमंत्री पोहोचले त्यांचे अभिनंदन करायला हवे. अशी टीका करत राज्य सरकारने वेळेत मदत दिली नसल्याचे वाघ यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!