पारनेर तालुक्याचे भाजपा अध्यक्ष राहूल शिंदे यांच्यावर लंके समर्थकानी गाडी अडवून हल्ला केला. पराभव समोर दिसू लागल्याने आता आशा गुंडप्रवृतीतून दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे उघड झाले आहे.
पारनेर तालुक्यातील या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून राहूल शिंदे यांना जाणीवपुर्वक लक्ष बनवून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.
यापुर्वी सुध्दा शहर आणि तालुक्यात आशाच पध्दतीची दहशत निर्माण करून मतदार संघातील वातावरण कुलषित करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे.
शहरात प्रचार फेरी दरम्यान एका कुटूबाला झालेली मारहाण तसेच महायुतीच्या उमेदवारला यापुर्वी जीवे मारण्याची लंके समर्थकांकडून आलेली धमकी गंभीर आहे.