अहमदनगर लोकसभेत पुन्हा ‘सगेसोयरे’ फॅक्टर ! प्रचंड फायदा होणार पण सुजय विखेंना की निलेश लंके यांना, पहाच..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी राहिलेले राजकारण आहे. अनेक मातब्बर नेते अहमदनगरच्या राजकारणात आपापले वर्चस्व राहावी यासाठी प्रयत्नशील असतात. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील सगेसोयरे हा फॅक्टर फार चालतो.

जिल्ह्यातील अनेक मातब्बर घराण्यांचे एकमेकांशी स्नेह आहे, सोयरिकी आहेत. त्यामुळे निवडणुकी आल्या की जिल्ह्यात सगेसोयऱ्यांचं राजकारण हे प्रभावी होऊ लागते. जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, मोनिका राजळे, चंद्रशेखर घुले, राजेंद्र नागवडे,

शिवाजी कर्डीले आणि संग्राम जगताप यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध असून हे नातेसंबंध अनेकदा निवडणुकीतील जय पराजय बाबतीत मोठी निर्णायक भूमिका बाजवतात. आता यंदाच्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीत सगेसोयरे फॅक्टर चालणार का? चालला तर त्याचा फायदा कुणाला होणार? पाहुयात…

सगे-सोयऱ्यांचे राजकीय गणिते
तसा विचार केला तर सगेसोयऱ्यांचे राजकारण हे विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकर्षाने इफेक्टिव्ह ठरते परंतु लोकसभेला जास्त परिणाम कारक ठरत नसले तरी निवडणूक निकालावर कमी अधिक प्रमाणात याचा परिणाम झाल्याचे दिसून येते.

हे एकमेकांचे सगेसोयरे असणारे बडे नेते जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी आपापले मतदारसंघ वाचवण्यासाठी ते एकमेकांना मदत करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हे सर्व सगे-सोयरे काय निर्णय घेतात यावर अनेक राजकीय गणितं अवलंबून असतील यात शंका नाही.

फायदा कुणाला? विखे की लंके ?
जेव्हा सगे सोयऱ्यांच्या नात्याचा विषय येतो तेव्हा यात महत्त्वाचे नेते असलेले भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि त्यांचे जावई राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना महत्वाचे वलय प्राप्त होत असते. आणि हे दोघेही सध्या महायुतीत एकत्रित असल्याने सगेसोयऱ्यांच्या राजकारणाचा सुजय विखे यांना फायदा होईल असे शिवाजी कर्डीले यांनी म्हटलेले आहे.

दुसरीकडे आ. बाळासाहेब थोरात यांच्याशी नातेसंबंध असलेले राजळे, घुले, नागवडे, गडाख हे थेट थोरात किंवा त्यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात असते तर उघडपणे विखेंच्या विरोधात भूमिका घेतली असती परंतु निलेश लंके यांच्यासाठी थोरतांच्या सांगण्यावरून ते ते विखे यांच्या विरोधात भूमिका घेणार नाहीत असा एक अंदाज वर्तवला जात आहे.