विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : अहमदनगरसह सर्वच लोकसभेचा निकाल कसा व कोठे पाहाल? आयोगाच्या या साईटवर एकाच क्लिकवर मिळेल विश्वसनीय अपडेट्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : आज बहुप्रतीक्षित दिवस आला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभेचे निकाल आता आज(४ जून) समोर येणार आहेत. त्यामुळे आज सायंकाळ पर्यंत भाजप प्रणीत एनडीए आणि इंडिया आघाडी यापैकी कोण सत्तेवर येईल ? कुणाला किती जागा मिळतील याबाबत सर्व निकाल समोर येणार आहे.

देशभरातील लोकसभेच्या निवडणुका जवळपास 7 टप्प्यात झालेल्या आहेत. 1 जून रोजी शेवटचा टप्पा झाला. आज येणारा निकाल हा महत्वपूर्ण ठरेल. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलीये.

आधी पोस्टल बॅलेटची मोजणी होणार असून त्यात पहिल्या गटात लष्कर, निमलष्करी दलाचे जवान आणि अधिकारी यांच्या मतांची मोजणी त्यानंतर दुसऱ्या गटात निवडणूक कर्तव्य बजावणारे कर्मचारी, अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची पोस्टल मतमोजणी होईल.

याची आकडेवारी झाल्यानंतर मग ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरु केली जाणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व जागांवर निकाल समोर आलेली असतील असा अंदाज आहे.

निवडणूक निकाल कुठे व कसा पाहाल?

अहमदनगर लाईव्हच्या वेबसाईट वर तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून निकाल पाहू शकता 

Ahmednagar Election Result 2024 LIVE : अहमदनगर लोकसभा निकालाचे लाईव्ह अपडेट्स

निवडणुकीचा विश्वसनीय निकाल पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या eci.gov.in या वेबसाइटवर तुम्हाला जावे लागेल. त्यानंतर तेथे जनरल इलेक्शन 2024 वर क्लिक करा. येथे तुम्हाला अपडेट मिळतील. यासोबतच निवडणूक आयोगाशी लिंक असलेल्या व्होटर हेल्पलाइन ॲप, iOS आणि अँड्रॉइड मोबाइल ॲप्सवरही तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर राज्यनिहाय, जागानिहाय आणि पक्षनिहाय निकाल त्याठिकाणी दाखवला जाईल.

Ahmednagarlive24 Office