महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके २९ हजार ३१७ मतांनी विजयी !

Ahmednagarlive24
Updated:
Ahmednagar Election Result 2024 Live Updates :  7.15 : अहमदनगरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके २९ हजार ३१७ मतांनी विजयी झाले आहेत. अधिकृत आकडेवारी आणि घोषणा बाकी असून. विजयानंतर लंके यांनी उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवित प्रतिक्रिया दिली आहे. आता कोणाविरूद्धही काही बोलायचे नाही. मला जनतेने निवडून दिले आहे – निलेश लंके

मतमोजणी – व निकालाचे लाईव्ह अपडेट्स पेज रिफ्रेश करून तुम्ही या पेजवर पाहू शकता 

6.42 : निलेश लंकें झाले नगरचे खासदार ! सुजय विखेंचा पराभव 

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे ५० हजार, ५२९ मतांनी विजयी. वाकचौरे यांना ४ लाख, ७४ हजार, ९०० तर महायुतीचे सदाशिव लोखंडे यांना ४ लाख, २६ हजार ३७१ मते. वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांना ९० हजार ९२९ मते.

5.40 – 21 व्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना 23 हजार 886 मतांची आघाडी

5.35 : अहमदनगरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना २१ व्या फेरीअखेर २२ हजार, ८६८ मतांची आघाडी. आता उरल्या फक्त सहा फेऱ्या. आठव्या फेरीपासून पुढील चित्र पहता महायु्तीचे डॉ. सुजय विखे पाटील यांना हे मताधिक्य तोडणे अशक्य. लंकेच्या विजयाची औपचारिकताच बाकी.

5.20 : अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा महायुतीच्या हातून जाणार. दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय होत आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २००९ नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला पुन्हा जागा आणता आली. तर शिर्डीत पक्ष फुटीनंतर गेलेली जागा उद्धव ठाकरे यांना राखण्यात यश

4.34 : १९ फेरी पर्यंत : निलेश लंके २६,५१४ मतांनी आघाडीवर

3.39 : १६ फेरीपर्यंत निलेश लंके पंधरा हजार मतांनी आघाडीवर

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांची आघाडी कायम. १६ व्या फेरीअखेर २० हजार ९०० मतांनी आघाडीवर

1.24 : अहमदनगर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपा खासदार सुजय विखे पिछाडीवर ! महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके 9967 मतांनी आघाडीवर.

1.05 :8 फेरी : निलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस) 4808 – मतांनी आघाडीवर

सातव्या फेरीनंतर चित्र पलटले, महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांची आघाडी कायम. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील पिछाडीवर. तेराव्या फेरीअखेर लंके सुमारे १३ हजार ५०० मतांनी आघाडीवर होते.

12.25 : सहाव्या फेरी अखेर सुजय विखे 9662 आघाडीवर
सुजय विखे 1,57,665
निलेश लंके 1,48,003

11.40 : चौथी फेरीत लंके – 57463 विखे – 66429 आघाडी विखे 8966

10.28 : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंकेंना पिछाडत महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनी पुन्हा आघाडी घेतली आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून 7160 – मतांनी आघाडी घेतली आहे. मतमोजणीची तिसरी फेरी पार पडली असून विखेंची घौडदौड सुरू आहे.

अहमदनगर – पहिल्या फेरीचा अधिकृत निकाल पुढीलप्रमाणे –

10.15 :  विखे 5929 मतांनी आघाडीवर

10.02 :भाऊसाहेब वाकचौरे 7325 मतांनी आघाडीवर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ७३२५ मतांची आघाडी घेतली आहे.

9.50 : सुजय विखें यांनी घेतली 3613 मतांनी आघाडी

9.46 : भाऊसाहेब वाकचौरे 2058 मतांनी आघाडीवर

9.43 : निलेश लंके 2,192 मतांची घेतली आघाडी

9.38 : 4 तालुक्यामधून सुजय विखे पुढे ! तर पारनेर आणि शेवगाव मधून लंके यांनी घेतली आघाडी.

9.30 : सुजय विखे पहिल्या फेरीत आघाडीवर आहे. सुजय विखेंना १८४४४ मते तर, निलेश लंकेंना १८२२४ मते आहेत. या आकडेवारीनुसार सुजय विखेंनी १९० मतांची आघाडी घेतली आहे

9.24 : पहिली फेरी : लंके 18254, विखें 18444, विखें 190 आघाडी

श्रीगोंदा
विखे 2013
लंके 2664

शेवगाव
विखे 4021
लंके 4872

राहुरी
विखे 6440
लंके 3862

पारनेर
विखे 2925
लंके 4475

कर्जत जामखेड
विखे 2669
लंके 2013

नगर
विखे 376
लंके 368

9.23 : महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर…तिसऱ्या फेरीनंतर 5500 मतांनी आघाडी . संगमनेर , अकोले आणि कोपरगाव मध्ये वाकचौरे याणा आघाडी..

8.59 : सुजय विखे पाटील पाेस्टल मतदानात ६३७ मतांनी आघाडी घेतली , नीलेश लंके यांना ७८ मते मिळाली आहे

8.50 : शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर

8.23 : पोस्टल मतमोजणीस सुरुवात, पहिल्या ट्रेंडमध्ये सुजय विखे आघाडी वर

वाचा इतर महत्वाच्या बातम्या

निलेश लंके आणि सुजय विखे यांना सारखी मते मिळाली तर कोण होणार विजयी? काय सांगतो नियम?

Loksabha Election Result : अशी असते लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया

विखे की लंके? निकाल यायला उशीर होणार, रात्री ८ वाजतील, काय आहे कारण? पहा..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News