Ahmednagar Politics : सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी एक एक मत महत्वाचे – पंकजा मुंडे

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar Politics : गोपीनाथ मुंडेची लेक एका तरूण मराठा भावाला विजयी करण्यासाठी आली असल्याची भावनिक साद पंकजा मुंडे यांनी घातली. सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी एक एक मत महत्वाचे असल्‍याचे प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. पाथर्डी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पाथर्डी येथील बाजार तळ मैदान येथे महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे,

माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, अशोक चोरमले, बापूसाहेब भोसले, मृत्यूंजय गर्जे, तुषार वैद्य, राहुल राजळे, काशिनाथ लवांडे, देविदास खेडकर, बाळासाहेब दराडे, भगवान बांगर, अंकुश चितळे, अशोक अहुजा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

त्यांनी सांगितले की, डॉ. सुजय विखे यांनी आपल्या पहिल्याच खासदारकीच्या काळात विविध विकासकामे करत आपली चुनक दाखवली आहे. यामुळे येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास करण्याची त्यांना दुसऱ्यांचा संधी देण्याची आपली जबाबदारी आहे.

यामुळे एक एक मत महत्वाचे असून त्या मतामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाची धुरा सांभाळणार आहेत. यामुळे येत्या १३ मे रोजी कमळाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी. जिल्हापरिषद अध्यक्षा शालिनीताई यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, खा. डॉ.सुजय विखे यांना करोनामुळे कमी कार्यकाल मिळाला पण त्यातही त्यांनी जिल्ह्यात ४ औद्योगिक वसाहती आणल्या. यामुळे जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच काम मिळणार आहे.

तर शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या भाषणात खा. डॉ. सुजय विखे यांच्या कार्याचा गौरव केला. तर आमदार मोनिकाताई यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडून त्यांचे समाधान सोडविण्यासाठी सुजय विखे हेच पर्याय असल्याचे सांगितले. तर खासदार धैर्यशील माने यांनी संसदेतील सुजय विखे यांच्या कामाचा गौरव करत मोदींच्या टीम मध्ये डॉ. सुजय विखे यांना पाठविण्याचे आवाहन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe