Lok Sabha Election 2024:- सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधुम असून सगळीकडे प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीसाठीची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच विविध पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना देखील दिसून येत आहेत.
संपूर्ण देशामध्ये ही लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडणार असून महाराष्ट्र मध्ये या निवडणुकीचे पाच टप्पे करण्यात आलेले आहेत. त्यातील महाराष्ट्रातील अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, बुलढाणा आणि अकोला इत्यादी मतदारसंघांमध्ये 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
यासाठीचे अर्ज प्रक्रिया देखील पार पडली असून जवळपास 11 उमेदवारांनी यामध्ये अर्ज भरलेले आहेत. अर्ज भरताना दिलेल्या संपत्ती विवरणातून या उमेदवारांच्या संपत्ती बद्दलची माहिती देखील समोर आलेली आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण कोणत्या उमेदवाराकडे किती संपत्ती आहे व कोणावर किती कर्ज आहे? याबाबतची माहिती बघणार आहोत.
कोणत्या उमेदवाराकडे किती आहे संपत्ती आणि कोणावर आहे किती कर्ज?
अमरावती मतदारसंघ–
नवनीत राणा( भाजपा)- जंगम मालमत्ता 5.32 कोटी,स्थावर मालमत्ता 5.25 कोटी= एकूण मालमत्ता 10.57 कोटी आणि कर्ज 7.27 कोटी
बळवंत वानखेडे( काँग्रेस)- जंगम मालमत्ता 67.29 लाख, स्थावर मालमत्ता 85.46 लाख= एकूण मालमत्ता 1.52 कोटी आणि कर्ज 31.07 लाख
वर्धा मतदार संघ
रामदास तडस( भाजपा)- जंगम मालमत्ता 74.77 लाख, स्थावर मालमत्ता 4.69 कोटी= एकूण मालमत्ता 5.43 कोटी आणि कर्ज 19.73 लाख
अमर काळे( शरद पवार गट)- जंगम मालमत्ता 2.49 कोटी, स्थावर मालमत्ता 2.78 कोटी= एकूण मालमत्ता 5.18 कोटी आणि कर्ज 36.33 लाख
यवतमाळ–वाशिम मतदारसंघ
राजश्री पाटील( शिवसेना शिंदे गट)- जंगम मालमत्ता 1.39 कोटी, स्थावर मालमत्ता 1.45 कोटी= एकूण मालमत्ता 2.84 कोटी आणि कर्ज 11.87 लाख
संजय देशमुख( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)- जंगम मालमत्ता 1.85 कोटी, स्थावर मालमत्ता 17.09 कोटी= एकूण संपत्ती 18.94 कोटी आणि कर्ज 2.91 कोटी
बुलढाणा मतदार संघ
प्रतापराव जाधव( शिंदे गट)- जंगम मालमत्ता 2.22 कोटी, स्थावर मालमत्ता 4.65 कोटी= एकूण मालमत्ता 6.87 कोटी आणि कर्ज 14.67 लाख
नरेंद्र खेडेकर( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)- जंगम मालमत्ता 1.59 कोटी, स्थावर मालमत्ता 2.17 कोटी= एकूण मालमत्ता 3.76 कोटी आणि कर्ज शून्य
अकोला मतदारसंघ
अनुप धोत्रे( भाजप)- जंगम मालमत्ता 2.61 कोटी, स्थावर मालमत्ता 4.03 कोटी= एकूण मालमत्ता 6.64 कोटी आणि कर्ज शून्य रुपये
डॉ. अभय पाटील( काँग्रेस)- जंगम मालमत्ता 9.44 कोटी, स्थावर मालमत्ता 30 कोटी= एकूण मालमत्ता 39.44 कोटी आणि कर्ज 6.37 कोटी
ॲड. प्रकाश आंबेडकर( वंचित बहुजन आघाडी)- जंगम मालमत्ता 45.92 लाख, स्थावर मालमत्ता 37 लाख= एकूण मालमत्ता 82 लाख आणि कर्ज शून्य रुपये